रायगड - युक्रेन - रशिया दरम्यान युद्ध सुरु असताना शिक्षणासाठी गेलेले महाराष्ट्रातील ( Indian students stuck in Ukraine ) अनेक विद्यार्थी तेथे अडकले आहेत. तर सरकारकडून त्यांना मायदेशी परत आणले जात आहे. रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील अनुजा जायले ही विद्यार्थिनी ( Student Anuja Jayale ) नुकतीच आपल्या घरी परतली आहे. मुलगी सुखरूप घरी परतल्यानंतर पालकांचा आनंदाचा अश्रूंचा बांध फुटला. अनुजाने युक्रेन मधील आपबिती माध्यमांशी बोलताना सांगितली आहे.
वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी अनुजा जायले ( MBBS Student Anuja Jayle ) ही युक्रेन येथे गेली होती. परंतु सध्या युक्रेन-रशिया दरम्यान युद्ध ( War between Ukraine Russia ) सुरू आहे. शिक्षणासाठी महाराष्ट्रातील विद्यार्थी तेथे अडकल्याने सरकारकडून विद्यार्थ्यांना मिशन गंगा ( Mission Ganga ) अंतर्गत सुखरूप आणले जात आहे. याचवेळी रायगड जिल्ह्यात येत असलेल्या कर्जत तालुक्यातील दोन मुली या युक्रेनमध्ये ( Karjat Girls in Ukraine ) अडकल्या होत्या. त्यातील अनुजा जायले ही विमानतळावर 3 मार्च रोजी सायंकाळी पोहोचली होती. अनुजाला तिचा भाऊ आणि वडिलांनी कर्जतला घरी आणले. आपली मुलगी सुखरूप पोहोचल्याने घरातील कुटुंब आणि अनुजाच्या शेजारी राहणाऱ्या रहिवाशींनी तिला मिठी मारत आपल्या आनंदाश्रूना वाट मोकळी करून दिली.
हेही वाचा-Disha Salian Case : राणे पिता-पुत्र मालवणी पोलिसांसमोर हजर चौकशी सुरू
धोका वाढल्याने आम्हाला बंकरमध्ये हलविले
अनुजा ही वैद्यकीय शिक्षणासाठी विणीतसिया युनिव्हर्सिटी युक्रेन येथून एमबीबीएसचे शिक्षण घेत आहे. तेथून 300 किमी अंतरावर युक्रेन-रशिया या सैनिकात युद्ध सुरू आहे. रशियन सैनिक हे युक्रेनमध्ये दाखल झाले होते. दरम्यान युद्ध सुरू झाले, त्यावेळी ती आपल्या युनव्हर्सिटी येथे उपस्थित होती. अनुजाने माध्यमांना सांगितले, की आम्हाला लगेच बॅग भरून तयारीत राहण्यासाठी सांगण्यात आले होते. त्यानंतर अधिकच धोका वाढल्याने आम्हाला बंकरमध्ये हलवण्यात आले. तिथे सुरुवातीला खाण्याची सोय उपलब्ध नव्हती. तर पाय ठेवायलाही जागा नव्हती. असा तिने वाईट अनुभव सांगितला.
रोमोनिया येथे सरकारी सैन्याने केली सोय
रोमोनिया येथे सरकारी सैन्याने चांगली सोय करून दिली होती. भारत सरकारकडून मिशन गंगा या माध्यमातून आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले होते. त्यावेळी आमच्यानंतर आलेल्या विद्यार्थ्यांना घेण्यात आले. त्यावर आम्ही आवाज उठविला होता. यानंतर मुलींना पहिले घेण्यात आल्यावर आम्ही मित्र- मैत्रिणी विखुरले गेलो होतो. परंतु मी दिल्लीनंतर मुंबई येथे सुखरूप पोहोचले. मला घेण्यासाठी माझे वडील आणि भाऊ आले होते. पुढील काही घडामोडी या कधी निवळतील हे सांगता येत नाही. परंतु भारत सरकारने अशा विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी पुढाकार घेतला पाहिजे, असे अनुजाचे कुटुंबाची म्हणणे आहे.