ETV Bharat / state

पेणमध्ये उमेदवारांना विश्वासात न घेताच 'स्ट्राँग रुम' सील, काँग्रेस उमेदवार नंदा म्हात्रेंचा आक्षेप

पेण मतदार संघातील निवडणूक निर्णय अधिकारी प्रतिमा पुदलवाड यांनी उमेदवारांना विश्वासात न घेता ईव्हीएम मशीन ठेवण्यात येणारी 'स्ट्रॉंग रुम' एकच अपक्ष उमेदवार हजर असताना सील केली. त्यामुळे पेण मतदारसंघातील उमेदवारांमध्ये संशयाचे वातावरण निर्माण झाले आहे.

पेणमध्ये उमेदवारांना विश्वासात न घेताच 'स्ट्राँग रुम' सील
author img

By

Published : Oct 23, 2019, 8:53 AM IST

रायगड - देशात ईव्हीएम मशीनबद्दल संशयाचे वातावरण असतानाच पेण मतदार संघातील निवडणूक निर्णय अधिकारी प्रतिमा पुदलवाड यांनी उमेदवारांना विश्वासात न घेता ईव्हीएम मशीन ठेवण्यात येणारी 'स्ट्रॉंग रुम' एकच अपक्ष उमेदवार हजर असताना सील केली. त्यामुळे पेण मतदारसंघातील उमेदवारांमध्ये संशयाचे वातावरण निर्माण झाले आहे. या बाबत राष्ट्रीय काँग्रेसच्या उमेदवार नंदा म्हात्रे यांनी निवडणूक निर्णय अधिकारी तथा पेण प्रांताधिकारी प्रतिमा पुदलवाड यांच्याकडे लेखी तक्रार दाखल केली आहे.

पुन्हा एकदा सर्व उमेदवारांसमोर स्ट्राँग रूम सील करावी, तसेच उमेदवार नसताना सील करण्यात आलेल्या स्ट्राँग रूमची व्हिडिओ सीडी मिळावी, अशी मागणी म्हात्रे यांनी केली आहे.

हेही वाचा - रायगडमधील घटलेला मतदानाचा टक्का कोणाला देणार धक्का?

सोमवारी रात्री उशिरापर्यंत ईव्हिएम मशीन सील करण्याची प्रक्रिया सुरु होती. मी स्वतः रात्री 1:30 पर्यंत उपस्थित होते, असे नंदा म्हात्रे यांनी दिलेल्या तक्रार अर्जात म्हटले आहे. तिथे उपस्थित असलेल्या अधिकाऱ्यांनी स्ट्राँग रूम सील करताना आपणास फोन करून बोलवले जाईल, असे सांगितले. मात्र, मंगळवारी सकाळी 10 वाजता प्रांताधिकारी कार्यालयात मिटींगसाठी गेले असता सकाळी 7 वाजताच स्ट्राँग रुम सील करण्यात आले.

स्ट्राँग रुम सील करताना फक्त अपक्ष उमेदवार अमोद मुंढे हे एकमेव उपस्थित होते. भाजप, शेकाप, काँग्रेस, बसप, वंचित आघाडीचे व इतर कोणतेही अपक्ष उमेदवार उपस्थित नसल्याने पुन्हा एकदा सर्व उमेदवारांसमोर स्ट्राँग रूम सील करण्याची मागणी नंदा म्हात्रे यांनी तक्रार अर्जात केली आहे. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी या प्रक्रिये पासून आम्हाला जाणून-बुजून दूर ठेऊन लोकशाहीने आम्हाला दिलेल्या अधिकारांची पायमल्ली केला असल्याचा आरोप देखील काँग्रेस उमेदवार नंदा म्हात्रे यांनी केला आहे.

हेही वाचा - जिल्ह्यात 65.57 टक्के मतदान, 72 उमेदवारांचे भवितव्य ईव्हीएममध्ये कैद

स्ट्राँग रुम सील करण्याबाबत सर्व उमेदवारांना पत्र दिले होते. मुसळधार पाऊस व अनेक ठिकाणी उशिरापर्यंत सुरू असलेले मतदान यामुळे ईव्हीएम मशीन जमा होण्यासाठी उशीर झाला होता. स्ट्राँग रूम सील करण्याअगोदर सर्व उमेदवारांना भ्रमणध्वनीद्वारे संपर्क करण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, संपर्क झाला नाही. स्ट्राँग रूम सील होण्यापर्यंत उपस्थित राहणे हे उमेदवारांचे कर्तव्य होते. अमोद मुंढे हे एकमेव अपक्ष उमेदवार या वेळी उपस्थित होते, असे प्रतिमा पुदलवाड यांनी सांगितले आहे.

Intro:उमेदवारांना विश्वासात न घेताच "स्ट्रॉंग रुम " सील

पेणच्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचा प्रताप

काँग्रेस उमेदवार नंदा म्हात्रे यांचा आक्षेप

रायगड-

देशात ईव्हीएम मशीन बद्दल संशयाचे वातावरण असतानाच पेण मतदार संघातील निवडणूक निर्णय अधिकारी प्रतिमा पुदलवाड यांनी उमेदवारांना विश्वासात न घेता ईव्हीएम मशीन ठेवण्यात येणारी "स्ट्रॉंग रुम" एकच अपक्ष उमेदवार हजर असताना सील केल्याने पेण मतदार संघातील उमेदवारां मध्ये संशयाचे वातावरण निर्माण झाले आहे. या बाबत राष्ट्रीय काँग्रेसच्या उमेदवार नंदा म्हात्रे यांनी निवडणूक निर्णय अधिकारी तथा पेण प्रांताधिकारी प्रतिमा पुदलवाड यांच्या कडे लेखी तक्रार केली असून पुन्हा एकदा सर्व उमेदवार यांचे समोर "स्ट्रॉंग रूम" सील करावी तसेच उमेदवार नसताना सील करण्यात आलेल्या स्ट्रॉंग रूमची व्हिडीओ सीडी मिळावी अशी मागणी केली आहे.Body:सोमवारी रात्री उशिरापर्यंत ईव्हीएम मशीन सील करण्याची प्रक्रिया सुरु होती ; मी स्वतः रात्री 1:30 पर्यंत उपस्थित होते असे नंदा म्हात्रे यांनी दिलेल्या तक्रार अर्जात म्हटले आहे. तिथे उपस्थित असलेल्या अधिकारी यांनी स्ट्रॉंग रूम सील करताना आपणास फोन करून बोलाविले जाईल असे सांगितले असे म्हटले आहे. मात्र मंगळवारी सकाळी दहा वाजता प्रांताधिकारी कार्यालयात मिटींग साठी गेले असता सकाळी सात वाजताच स्ट्रॉंग रुम सील करण्यात आल्याची माहिती देण्यात आली. स्ट्रॉंग रुम सील करताना फक्त अपक्ष उमेदवार अमोद मुंढे हे एकमेव उपस्थित होते. भाजप, शेकाप, काँग्रेस, बसप, वंचित आघाडीचे व इतर कोणतेही अपक्ष उमेदवार उपस्थित नसल्याने पुन्हा एकदा सर्व उमेदवारां समोर स्ट्रॉंग रूम सील करण्याची मागणी नंदा म्हात्रे यांनी तक्रार अर्जात केली आहे. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी या प्रक्रिये पासून आम्हाला जाणून बुजून दूर ठेऊन लोकशाहीने आम्हाला दिलेल्या अधिकाऱ्यांची पायमल्ली केला असल्याचा आरोप देखील काँग्रेस उमेदवार नंदा म्हात्रे यांनी केला आहे.Conclusion:स्ट्रॉंग रुम सील करण्याबाबत सर्व उमेदवारांना पत्र दिले होते. मुसळधार पाऊस व अनेक ठिकाणी उशिरापर्यंत सुरू असलेले मतदान यामुळे ईव्हीएम मशीन जमा होण्यासाठी उशीर झाला होता. स्ट्रॉंग रूम सील करण्याअगोदर सर्व उमेदवारांना भ्रमणध्वनी द्वारे संपर्क करण्याचा प्रयन्त करण्यात आला, मात्र संपर्क झाला नाही. स्ट्रॉंग रूम सील होणे पर्यंत उपस्थित राहणे हे उमेदवारांचे कर्तव्य होते. अमोद मुंढे हे एकमेव अपक्ष उमेदवार या वेळी उपस्थित होते.

प्रतिमा पुदलवाड, निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी, पेण )
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.