ETV Bharat / state

कर्जत तालुक्यात सावत्र आईवर मुलाने केला चाकू हल्ला - रायगड गुन्हे बातमी

मुलाने आपल्या सावत्र आईवर कौटुंबिक वादात चाकूने सहा वार केले. यात सावत्र आई जखमी असून मुलगा नेरळ पोलिसांच्या ताब्यात आहे.

neral police station
नेरळ पोलीस ठाणे
author img

By

Published : Mar 13, 2021, 7:02 PM IST

रायगड - मुलाने आपल्या सावत्र आईवर चाकू हल्ला करत ठार मारण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. ही घटना कर्जत तालुक्यातील डिकसल येथे घडली आहे. जखमी महिलेला उपचारासाठी पनवेल कळबोली येथील एका रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी नेरळ पोलिसांनी हल्लेखोर मुलाला ताब्यात घेतले आहे.

मिळालेल्या माहिती नुसार, 10 मार्चला डिकसल येथील पाली वसाहत असलेल्या समृद्धी हिल व्ही सोसायटी येथे राहणाऱ्या लीला विनोद जयस्वाल (वय 35 वर्षे) या आपल्या खोलीत बसल्या होत्या. त्यावेळी त्यांचा सावत्र मुलगा अभिषेक जयस्वाल याने कुटुंबातील वादामुळे आपल्या सावत्र आईवर धारदार शस्स्त्राने सहा वार केले होते. घटनेच्या दिवसापासून आरोपी मुलगा अभिषेक फरार झाला होता.

ही महिला रक्ताच्या थारोळ्यात पडली असता तेथे राहणाऱ्या नागरिकांनी याबाबत सोसायटीतील रखवालदार गणेश म्हसे यांना माहिती दिली होती. महिला रक्ताच्या थारोळ्यात पडल्याने म्हसे यांनी घटनेचे गांभीर्य ओळखून महिलेला उचलत रिक्षातून रुग्णालय गाठले होते. पण, डॉक्टरांनी प्राथमिक उपचार करून या महिलेला पुढे हलवण्यासाठी सांगितले. त्यानंतर जखमी महिलेवर पनवेल कळबोली येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

हेही वाचा - रायगड; अन् जिल्हा सामान्य रुग्णालयातील डॉक्टरांचेच आरोग्य आले धोक्यात

हेही वाचा - खालापूरमध्ये दररोज शेकडो लिटर पाण्याची नासाडी

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.