ETV Bharat / state

पूरग्रस्तांसाठी तात्काळ कम्युनिटी किचन सुरू करा - चित्रा वाघ यांची मागणी

कर्जत तालुक्यात घरात पाणी शिरल्याने घरातील अनेक मौल्यवान वस्तू खराब झाल्या. तसेच घरातील अन्नधान्य भिजल्याने मोठ्या प्रमाणात नासाडी झाली आहे. काही लोकांचे कपडे, सोफे, शासकीय कागदपत्रे तसेच इतर जीवनावश्यक वस्तूंची अक्षरशः माती झाली आहे. या सर्व गोष्टी लक्षात घेता. पूरग्रस्त नागरिकांना आधार आणि धीर देत नगरसेवकांनी त्यांना सर्वतोपरी मदत करण्याचे आवाहन त्यांनी केले.

Chitra Wagh
चित्रा वाघ यांनी कर्जतमधील पूरग्रस्त भागाची केली पाहणी
author img

By

Published : Aug 2, 2021, 7:11 AM IST

खालापूर (रायगड) - कर्जत तालुक्यातील बराचसा भाग २१ जुलैच्या पावसानंतर पुरात बुडाला होता. या सर्व भागाची पाहणी भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी रविवारी केली. यावेळी त्यांनी पूरग्रस्तांसाठी पालिकेने कम्युनिटी किचन तात्काळ चालू करावेत अशी मागणी केली. तर, पूरग्रस्तांसाठी नगरसेवकांनी सर्वतोपरी मदत करण्याचे आवाहनही त्यांनी केले.

चित्रा वाघ यांनी कर्जतमधील पूरग्रस्त भागाची केली पाहणी

नागरिकांना धीर देत सर्वतोपरी मदत करा -

भाजपा महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ यांनी कर्जतमधील विविध भागांची पाहणी रविवारी (१ ऑगस्ट) केली. कर्जतमध्ये २१ जुलैच्या रात्री पडलेल्या पावसामुळे अनेक सखल भागात पावसाचे पाणी साठले होते. अचानक आलेल्या पुरामुळे लोकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. घरात पाणी शिरल्याने घरातील अनेक मौल्यवान वस्तू खराब झाल्या. तसेच घरातील अन्नधान्य भिजल्याने नासाडी झाली आहे. काही लोकांचे कपडे, सोफे, शासकीय कागदपत्रे तसेच इतर जीवनावश्यक वस्तूंची अक्षरशः माती झाली आहे. या सर्व गोष्टी लक्षात घेता. पूरग्रस्त नागरिकांना आधार आणि धीर देत नगरसेवकांनी त्यांना सर्वतोपरी मदत करण्याचे आवाहन त्यांनी केले.

पूरग्रस्तांसाठी कम्युनिटी किचन सुरू करा -

विठ्ठल नगर परिसरातील मनोहर कडू यांच्या घरापासून या पाहणी दौऱ्यास सुरुवात करण्यात आली होती. पूरग्रस्तांच्या घरातील शासकीय कागदपत्रे व इतर वस्तूंचे नुकसान झाले असल्यास त्यांना तात्काळ पूरग्रस्त दाखले काढून देण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन त्यांनी केले. गरजूंना राहण्यासाठी तात्पुरता निवारा तसेच त्यांची भूक भागविण्यासाठी कम्युनिटी किचन सुरू करून देण्यात यावे अशी मागणी त्यांनी केली. त्यानंतर शनिमंदिर आमराई परिसरात भेट दिल्यानंतर दहीवली परिसराची पाहणी केली.

यावेळी यांची होती उपस्थिती -

यावेळी कोकण किसान मोर्चाचे संपर्कप्रमुख सुनील गोगटे, तालुका सरचिटणीस राजेश भगत, तालुका सरचिटणीस संजय कराळे, कर्जत शहर अध्यक्ष बलवंत घुमरे, शहर सरचिटणीस प्रकाश पालकर, तालुका महिला मोर्चा अध्यक्ष स्नेहा गोगटे, युवा मोर्चा तालुका अध्यक्ष प्रमोद पाटील, जिल्हा महिला महिला मोर्चा चिटणीस विनिता घुमरे, शहर महिला मोर्चा अध्यक्ष सरस्वती चौधरी यांच्यासह आदी भाजप कार्यकर्ते उपस्थित होते.

हेही वाचा - ..अन्यथा 15 ऑगस्टपासून MPSC च्या विद्यार्थ्यांना घेऊन राज्यव्यापी आंदोलन - सदाभाऊ खोत

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.