ETV Bharat / state

'ब्रेक दि चेन'ला पेणमध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद; अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने बंद

author img

By

Published : Apr 6, 2021, 7:35 PM IST

सोमवारी रात्री 8 वाजल्यापासून शासनाने कलम 144 जाहीर केल्यामुळे पेण तालुक्यातील नागरिकांनी घरा बाहेर न पडण्याचा निर्णय घेऊन शासनाच्या आदेशाला सकारात्मक साथ दिली.

Spontaneous response to break the chain ,  break the chain Campaign ,  break the chain Campaign in pen ,  corona update raigad ,  corona death in raigad ,  ब्रेक दि चेन ,  रायगड कोरोना अपडेट ,  रायगड कोरोना न्यूज ,  पेणमध्ये लॉकडाऊन
पेण

(रायगड) पेण - कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्याकरिता महाराष्ट्र शासनाने सुरू केलेल्या 'ब्रेक दि चेन'ला पेण शहरासह तालुक्यातील व्यापाऱ्यांनी व नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने 100 टक्के बंद ठेवण्यात आली होती.

सोमवारी रात्री 8 वाजल्यापासून शासनाने कलम 144 जाहीर केल्यामुळे पेण तालुक्यातील नागरिकांनी घरा बाहेर न पडण्याचा निर्णय घेऊन शासनाच्या आदेशाला सकारात्मक साथ दिली. उपविभागीय पोलीस अधिकारी विभा चव्हाण, पेणचे पोलीस निरीक्षक गौरीप्रसाद हिरेमठ, मुख्याधिकारी अर्चना दिवे यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली पोलीसांनी चोख बंदोबस्त ठेवला आहे.

पेण शहर व तालुक्यात शासनाने मंजुरी दिलेली औषधांची दुकाने, दूध डेरी, फळ व भाजी विक्रेते, मिठाईची दुकाने, बेकरी, डॉक्टरांचा दवाखाना, रुग्णालय, पॅथॉलॉजी लॅब, रिक्षा, विक्रम, मिनीडोर, औद्योगिक वसाहतीत काम करणाऱ्या कामगारांची निर्माण करणाऱ्या कंपन्यांच्या गाड्या सुरू आहेत. राज्य परिवहन महामंडळाची एसटी सेवा सुरू आहे. त्याच बरोबर शिवभोजन सेवा व काही हॉटेल्स केवळ खाद्यपदार्थ पार्सल देण्याकरिता सुरू आहेत. याव्यतिरिक्त इतर सर्व प्रकारची दुकाने व सेवा पूर्णपणे बंद ठेवण्यात आले आहेत. पेण तालुक्यातील डोलवी येथील जिंदाल स्टील वर्क्स (जेएसडब्ल्यू कंपनी) व तालुक्यातील इतर कंपन्याही सुरू आहेत. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्याकरिता शासनाकडून कडक निर्बंध घालण्यात येतील असा इशारा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी दिल्यामुळे अनेक नागरिकांनी लॉकडाऊनची शक्यता समजून अगोदरच किराणामाल व इतर जीवनावश्यक वस्तूंची तयारी करून ठेवली आहे.

पेण नगरपालिकेच्या मुख्याधिकारी अर्चना दिवे यांच्यासह पोलीस कर्मचारी व नगरपालिकेतील इतर अधिकारी, कर्मचाऱ्यांनी पेण शहरात 'ब्रेक दि चेन' यशस्वी करण्याकरिता पेण शहरात फिरून व्यापारी व नागरिकांची जनजागृती करत आहेत.

हेही वाचा - आरोग्यमंत्र्यांची अचानक मालेगावला भेट; सामान्य रुग्णालयासह महापालिकेच्या रुग्णालयांची केली पाहणी

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.