रायगड - लोणावळा - खंडाळा घाटातील निसर्ग सौंदर्य अनेकांना भुरळ पाडते. त्यामुळे, वर्षा सहलीसाठी हजारोच्या संख्येने पर्यटक लोणावळा - खंडाळा घाटात दाखल होतात. दरम्यान कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पर्यटकांना पर्यटनस्थळी येण्यास मज्जाव आहे. परंतु, नियमांची ऐशीतैशी करून नागरिक लोणावळ्यातील पर्यटनस्थळी पोहचत आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लोणावळ्यातील पर्यटनस्थळी १४४ कलम लागू करण्यात आले आहे. पाच किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्तींना एकत्र येण्यास मज्जाव करण्यात आले आहे. तरी रविवार मोठ्या प्रमाणात पर्यटकांनी गर्दी केल्याने या ठिकाणी सोशन डिस्टन्सचा फज्जा उडाला. या ठिकाणी शासनाच्या नियमांचे उल्लंघन होत असून पुढील काळात कोरोनाचे मोठे संकट उभे राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
शासकीय नियमांचा उडाला फज्जा
गेल्या काही दिवसांपासून लोणावळ्यातील पर्यटनस्थळी नागरिक गर्दी करत असल्याचे निदर्शनास आले होते. त्यामुळे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वारंवार आवाहन करून १४४ कलम लागू केले. वर्षा सहलीसाठी हजारोच्या संख्येने पर्यटक लोणावळा - खंडाळा घाटात दाखल होतात. दरम्यान कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पर्यटकांना पर्यटनस्थळी येण्यास मज्जाव आहे. परंतु, नियमांची ऐशीतैशी करून नागरिक लोणावळ्यातील पर्यटनस्थळी पोहचत आहे.
कोरोनाची दुसरी लाट ओसरली, मात्र तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे, नागरिकांनी पर्यटनस्थळी गर्दी करू नये, नियमांचे पालन करावे, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले होते. परंतु, त्यांच्या या आवाहनाकडे दुर्लक्ष करून लोणावळात नागरिक गर्दी करत असल्याचे पाहायला मिळाले आहे.
हेही वाचा - खावटी अनुदान ही आदिवासी बांधवांच्या हक्काची योजना -आदिती तटकरे
शनिवार आणि रविवार रोजी हजारो पर्यटक लोणावळ्यात दाखल होत असल्याने याच पार्श्वभूमीवर लोणावळ्यातील पर्यटनस्थळी १४४ कलम लागू करण्यात आले. तरी या ठिकाणी मोठी गर्दी होत असून नियमांचा फज्जा उडाल्याचे पाहायला मिळाले. या ठिकाणी अनेक पर्यटकांनी मास्क न लावल्याचे पाहायला मिळाले. ही गर्दी अशीच कायम राहिल्यास लोणावळा - खंडाळा येथे कोरोनाचे मोठे संकट उभे राहण्याची शक्यता आहे.
हेही वाचा - वर्दीतील दर्दी.. खालापूर पोलिसांच्या मदतीने कोरोनाने मृत पोलीस पाटलांच्या कुटुंबाला एक लाखाची मदत