ETV Bharat / state

नागोठणे येथे भंगाराच्या दुकानात गांजा तस्करी करणारा गजाआड - नागोठणे भंगाराच्या दुकानात गांजा तस्करी

चिकनी येथील एका भंगाराच्या दुकानात मोठ्या प्रमाणात गांजा व अन्य अंमली पदार्थाचा साठा असल्याच माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस हवालदार प्रशांत दबडे यांना १५ फेब्रुवारी रोजी मिळाली. घटनेचे गांभीर्य ओळखून त्याचदिवशी पडताळणी करून पोलीस निरीक्षक दयानंद गावडे यांच्या मार्गदर्शनानुसार सापळा रचण्यात आला.

नागोठणे गांजा तस्करी
नागोठणे गांजा तस्करी
author img

By

Published : Feb 17, 2021, 8:16 AM IST

रायगड - भंगाराच्या दुकानात बेकायदेशीररित्या गांजाची तस्करी करणाऱ्याला रायगडच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने सोमवारी रात्री नागोठणे चिकणी येथून अटक केली. त्याच्याकडून ४ किलो गांजा, २८ चिलीम असा एकूण ४८ हजार ५६० रुपयांचा ऐवज जप्त केला आहे.

भंगाराच्या दुकानात गांजा विक्री सुरू

चिकनी येथील एका भंगाराच्या दुकानात मोठ्या प्रमाणात गांजा व अन्य अंमली पदार्थाचा साठा असल्याच माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस हवालदार प्रशांत दबडे यांना १५ फेब्रुवारी रोजी मिळाली. घटनेचे गांभीर्य ओळखून त्याचदिवशी पडताळणी करून पोलीस निरीक्षक दयानंद गावडे यांच्या मार्गदर्शनानुसार सापळा रचण्यात आला. रोहा तालुक्यातील चिकनी येथे रात्रीच्या सुमारास भंगाराच्या दुकानात छापा टाकला असता, पथकाने गांजासह अंमली पदार्थाचा साठा दिसून आला.

४ किलो गांजा केला जप्त

गांजा तस्करी करणाऱ्या मोहन राठोड यांला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्याच्याकडून ४ किलो गांजा आणि २८ चिलीम असा ४८ हजार ५६० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. मोहन राठोड याच्याविरोधात नागोठणे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रायगड जिल्ह्यात गांजा तस्करी मोठ्या प्रमाणात होत असून कॉलेज तरुण यांना या अमली पदार्थाची चटक लागली असल्याने तरुण पिढी ही अमली पदार्थाच्या आहारी जाऊ लागलो आहे.

हेही वाचा - शाब्बाश बापू..! अक्षर पटेलच्या 'पंच'मुळे मोठ्या विक्रमाची नोंद

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.