ETV Bharat / state

पनवेलमध्ये बंडोबा थंडावले; उरणमध्ये मात्र बंडखोरी कायम, सेनेची वाढणार डोकेदुखी

पनवेलमधली सेनेची बंडखोरी थंड करण्यात पक्षश्रेष्ठींना यश आले आहे. सेनेचे बबन पाटील यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार आपण उमेदवारी अर्ज मागे घेत असून युतीधर्म पाळणार असल्याची प्रतिक्रिया बबन पाटील यांनी यावेळी दिली आहे.

आमदार मनोहर भोईर आणि महेश बालदी
author img

By

Published : Oct 7, 2019, 7:19 PM IST

Updated : Oct 7, 2019, 9:14 PM IST

रायगड - विधानसभा निवडणुकीचे उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा सोमवारचा शेवटचा दिवस असल्याने पनवेलमध्ये राजकीय घडामोडींना वेग आला होता. पनवेलमध्ये बंडखोरी थंड करण्यात वरिष्ठांना यश आले आहे. मात्र, उरणमध्ये भाजपची बंडखोरी कायम आहे. त्यामुळे सेनेचे मनोहर भोईर यांची डोकेदुखी वाढणार आहे.

पनवेलमध्ये बंडोबा थंडावले; उरणमध्ये मात्र बंडखोरी कायम, सेनेची वाढणार डोकेदुखी

पनवेल मतदारसंघामध्ये भाजपच्या प्रशांत ठाकूर यांना उमेदवारी देण्यात आली. मात्र, तरीही याच मतदारसंघातून शिवसेनेचे बबन पाटील यांनीही अर्ज भरला. जागावाटपामध्ये उरण मतदारसंघ शिवसेनेला सोडण्यात आला आहे. तेथे शिवसेनेचे विद्यमान आमदार मनोहर भोईर यांनी अर्ज भरला आहे. मात्र, भाजपचे महेश बालदी यांनी बंडखोरी करत शक्तिप्रदर्शन करून उमेदवारी अर्ज भरला. यावेळी पनवेलचे भाजप उमेदवार प्रशांत ठाकूर उपस्थित होते. उरणच्या बंडखोरीला ठाकूरांची साथ असल्याची चर्चा तालुक्यात सुरू आहे. पनवेल व उरणमध्ये शिवसेना आणि भाजप एकमेकांविरोधात लढणार असल्याचे चित्र जवळपास दिसून येत होते.

पनवेलमधली सेनेची बंडखोरी थंड करण्यात पक्षश्रेष्ठींना यश आले आहे. सेनेचे बबन पाटील यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार आपण उमेदवारी अर्ज मागे घेत असून युतीधर्म पाळणार असल्याची प्रतिक्रिया बबन पाटील यांनी यावेळी दिली आहे.

पनवेलमधील बंडखोरी थंड झाली असली तरी उरणमधली बंडखोरी कायम आहे. उरणमध्ये आमदार मनोहर भोईर यांच्या विरोधात भाजपचे महेश बालदी यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेण्यास साफ नकार दिला आहे. त्यामुळे उरणमध्ये सेनेचे मनोहर भोईर यांची डोकेदुखी वाढणार आहे. उरणमध्ये भाजपच्या महेश बालदी यांच्या ठाम भूमिकेमुळे उरणमधली लढाई ही प्रतिष्ठेची ठरणार आहे. यामध्ये सेनेचे मनोहर भोईर आणि भाजपचे महेश बालदी यांच्यातील भांडणामुळे शेकापचे विवेक पाटील यांना फायदा फोटो का? हे पाहणे आता औत्सुक्याचे ठरणार आहे.

Intro:पनवेल

सोबत उमेदवार फोटो जोडले आहेत

विधानसभा निवडणुकीचे उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आजचा शेवटचा दिवस असल्यानं पनवेलमध्ये राजकीय घडामोडींना वेग आला आहे. पनवेलमध्ये बंडखोरी थंड करण्यात वरिष्ठांना यश आलंय, मात्र उरण मध्ये भाजपची बंडखोरी कायम असून सेनेचे मनोहर भोईर यांची डोकेदुखी वाढणार आहे. Body:पनवेल मतदारसंघामध्येभाजपच्या प्रशांत ठाकूर यांना उमेदवारी देण्यात आली; परंतु तरीही याच मतदारसंघातून शिवसेनेचे बबन पाटील यांनीही अर्ज भरला. जागावाटपामध्ये उरण मतदारसंघ शिवसेनेला सोडण्यात आला आहे. तेथे शिवसेनेचे विद्यमान आमदार मनोहर भोईर यांनी अर्ज भरला आहे; परंतु तेथे भाजपचे महेश बालदी यांनी बंडखोरी करत शक्तिप्रदर्शन करून उमेदवारी अर्ज भरला. या वेळी पनवेलचे भाजप उमेदवार प्रशांत ठाकूर उपस्थित होते. उरणच्या बंडखोरीला ठाकूरांची साथ असल्याची चर्चा तालुक्यात सुरू आहे. पनवेल व उरणमध्ये शिवसेना व भाजप एकमेकांविरोधात लढणार असं चित्र जवळपास दिसून येत होतं.

मात्र पनवेलमधली सेनेची बंडखोरी थंड करण्यात पक्षश्रेष्ठींना यश आलं असून सेनेचे बबन पाटील यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतलाय. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार आपण उमेदवारी अर्ज मागे घेत असून युतीधर्म पाळणार असल्याची प्रतिक्रिया बबनदादा पाटील यांनी यावेळी दिली आहे.

Conclusion:पनवेलमधली बंडखोरी थंड झाली असली तर उरणमधली बंडखोरी कायम आहे. उरणमध्ये आमदार मनोहर भोईर यांच्या विरोधात भाजपचे महेश बालदी यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेण्यास साफ नकार दिलाय. त्यामुळे उरणमध्ये सेनेचे मनोहर भोईर यांची डोकेदुखी वाढणार आहे. उरणमध्ये भाजपच्या महेश बालदी यांच्या ठाम भूमिकेमुळे उरणमधली लढाई ही प्रतिष्ठेची ठरणार आहे. यात सेनेचे मनोहर भोईर आणि भाजपचे महेश बालादी यांच्यातील भांडणामुळे शेकापचे विवेक पाटील यांना फायदा फोटो का ? हे पाहणं आता औत्सुक्याचे ठरणार आहे.
Last Updated : Oct 7, 2019, 9:14 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.