ETV Bharat / state

राष्ट्रवादी काँग्रेसला पालकमंत्रीपद दिल्याने शिवसेनेत नाराजी - रायगड मधील शिवसेने बद्दल बातमी

रायगड जिल्ह्याचे पालकमंत्रीपद राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला गेल्याने शिवसेनेमध्ये नाराजीचा सूर आहे.या बाबत पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पर्यंत शिवसैनिकांच्या भावना पोहोचवणार असल्याचे आमदार भरत गोगावले म्हणाले.

shiv-sena-workers-are-unhappy-with-the-appointment-of-guardian-minister-to-the-ncp
राष्ट्रवादी काँग्रेसला पालकमंत्री पद दिल्याने शिवसेनेत नाराजी
author img

By

Published : Jan 15, 2020, 7:47 AM IST

रायगड - राज्यमंत्री आणि रायगडचे पालकमंत्री पद राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला गेल्याने रायगडातील शिवसेनेमध्ये नाराजीचा सूर पसरलेला आहे. रायगडचा पालकमंत्री हा शिवसेनेचाच असावा, अशी भूमिका रायगडमधील शिवसैनिकाची आहे. याबाबत मुख्यमंत्री आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पर्यंत शिवसैनिकांच्या भावना पोहोचवणार असल्याचे आमदार भरत गोगावले यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

राष्ट्रवादी काँग्रेसला पालकमंत्री पद दिल्याने शिवसेनेत नाराजी

रोहा शहरातील ज्येष्ठ नागरिक सभागृहात पालकमंत्री हटाव मोहीमे अंतर्गत जिल्ह्यातील आमदार, जिल्हाप्रमुख, तालुकाप्रमुख, शिवसैनिक याची बैठक आयोजित केली होती. यावेळी आमदार भरत गोगावले, आमदार महेंद्र दळवी यांनी बैठकीत शिवसैनिकांना संबोधित केले.

रायगड जिल्ह्यात शिवसेनेचे तीन आमदार निवडून आले असताना महाविकास आघाडी सरकारात रायगडला मंत्रिपद मिळेल, अशी आशा निर्माण झाली होती. मात्र, रायगडात शिवसेनेला मंत्री पद न मिळता राष्ट्रवादी काँग्रेसच्या एकमेव निवडून आलेल्या आमदार अदिती तटकरे याना राज्यमंत्री पदासह जिल्ह्याचे पालकमंत्री पद देण्यात आले. उपममुख्यमंत्री अजित पवार यांनी ज्यांचे जास्त आमदार ज्या जिल्ह्यात असतील त्यांचा पालकमंत्री होईल असे सांगितले होते, असे असताना रायगडात शिवसेनेच्या वाट्याला निराशा आली आहे.

रायगड जिल्ह्यात शिवसेनेचे तीन आमदार, 18 जिल्हा परिषद सदस्य, पाच नगरपरिषद, पाच नगरपंचायत तसेच अनेक ग्रामपंचायती मध्येही शिवसेनेची सत्ता आहे. असे असूनही रायगगडात शिवसेनेच्या वाट्याला मंत्रिपद मिळाले नाही. त्याचबरोबर पालकमंत्री पदही राष्ट्रवादी काँग्रेसला दिले असल्याने शिवसैनिक नाराज झाले आहेत. त्यामुळे रायगडात शिवसेनेचाच पालकमंत्री देण्यासाठी रायगड शिवसेना आता मुख्यमंत्री आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना साकडे घालणार आहेत.

Intro:
रायगडचे पालकमंत्री हटाव बाबत शिवसैनिक आग्रही

पालकमंत्री शिवसेनेचाच हवा

पदाधिकारी बैठकीत निर्णय

राष्ट्रवादी काँग्रेसला पालकमंत्री पद दिल्याने शिवसेनेत नाराजी

रायगड : राज्यमंत्री आणि रायगडचे पालकमंत्री पद राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला गेल्याने रायगडातील शिवसेनेमध्ये नाराजीचा सूर पसरलेला आहे. रायगडचा पालकमंत्री हा शिवसेनेचाच असावा अशी भूमिका रायगड मधील शिवसैनिकाची असून याबाबत मुख्यमंत्री आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पर्यंत शिवसैनिकांच्या भावना पोहचविणार असल्याचे आमदार भरत गोगावले यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

रोहा शहरातील जेष्ठ नागरिक सभागृहात पालकमंत्री हटाव मोहीम अंतर्गत जिल्ह्यातील आमदार, जिल्हाप्रमुख, तालुकाप्रमुख, शिवसैनिक याची बैठक आयोजित केली होती. यावेळी आमदार भरत गोगावले, आमदार महेंद्र दळवी यांनी बैठकीत शिवसैनिकांना संबोधित केले.

Body:रायगड जिल्ह्यात शिवसेनेचे तीन आमदार निवडून आले असताना महाविकास आघाडी सरकारात रायगडला मंत्रिपद मिळेल अशी आशा निर्माण झाली होती. मात्र रायगडात शिवसेनेला मंत्री पद न मिळता राष्ट्रवादी काँग्रेसच्या एकमेव निवडून आलेल्या आमदार अदिती तटकरे याना राज्यमंत्री पदासह जिल्ह्याचे पालकमंत्री पद देण्यात आले. उपममुख्यमंत्री अजित पवार यांनी ज्यांचे जास्त आमदार ज्या जिल्ह्यात असतील त्यांचा पालकमंत्री होईल असे सांगितले होते. असे असताना रायगडात शिवसेनेच्या वाटेला निराशा आली आहे.

Conclusion:रायगड जिल्ह्यात शिवसेनेचे तीन आमदार, 18 जिल्हा परिषद सदस्य, पाच नगरपरिषद, पाच नगरपंचायत तसेच अनेक ग्रामपंचायती मध्येही शिवसेनेची सत्ता आहे. असे असूनही रायगगडात शिवसेनेच्या वाट्याला मंत्रिपद आले नाही. त्याचबरोबर पालकमंत्री पदही राष्ट्रवादी काँग्रेसला दिले असल्याने शिवसैनिक नाराज झाले आहेत. त्यामुळे रायगडात शिवसेनेचाच पालकमंत्री देण्यासाठी रायगड शिवसेना आता मुख्यमंत्री आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना साकडे घालणार आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.