ETV Bharat / state

शरद पवारांचा पक्षातील लोकांवर विश्वास नाही, म्हणून त्यांच्यावर उन्हा-पावसात प्रचार करण्याची वेळ - उद्धव ठाकरे - Uddhav Thackeray latest News raigad

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा स्वतःच्या पक्षातील लोकांवर विश्वास नाही. त्यामुळे त्यांना उन्हा पावसात प्रचाराची वेळ आली आहे. भाजप शिवसेना पक्षावर टीका करताना भाजपला पाठिंबा कसा दिलात, असा सवाल विचारत स्वतःच्या पक्षातील नेत्यांना ईडीच्या चौकशीला सामोरे जावे लागत असल्याची सणसणीत टीका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी माणगाव येथील सभेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर केला आहे.

उद्धव ठाकरे
author img

By

Published : Oct 19, 2019, 6:45 PM IST

रायगड- राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा स्वतःच्या पक्षातील लोकांवर विश्वास नाही. त्यामुळे त्यांना उन्हा पावसात प्रचाराची वेळ आली आहे. भाजप शिवसेना पक्षावर टीका करताना भाजपला पाठिंबा कसा दिलात, असा सवाल विचारत स्वतःच्या पक्षातील नेत्यांना ईडीच्या चौकशीला सामोरे जावे लागत असल्याची सणसणीत टीका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी माणगाव येथील सभेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर केली आहे. श्रीवर्धन आणि महाड मध्ये भगवा फडकविण्याचे आवाहन उद्धव ठाकरे यांनी यावेळी केले.

सभेला संबोधित करताना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे

महाड विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार भरत गोगावले यांची प्रचार सभा माणगाव येथे द.ग. तटकरे विद्यालय मैदानावर घेण्यात आली. यावेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे सभेला उपस्थित होते. त्यावेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर व काँग्रेस आघाडीवर सडकून टीका केली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची वाताहत झाली असून पक्षाच्या लोकांवर विश्वास राहिला नसल्याने शरद पवार उन्हा, पावसात प्रचार करत आहेत. ज्या लोकांसाठी पवार प्रचार करीत आहेत. ते उद्या त्यांच्याबरोबर राहतील का, असा सवालही पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाषणात केला आहे.

शिवसेना भाजपचे सरकार आल्यानंतर हेच निवडून येणारे आमदार पक्ष बदलतील, असा टोला देखील ठाकरे यांनी लगावला. शिवसेना भाजप सरकारवर टीका करीत आहेत. मात्र स्वतःच्या पक्षातील नेते भ्रष्टाचारमध्ये अटकले असून प्रफुल्ल पटेल हे ईडीच्या चौकशीत अडकले आहेत. त्यांचा थेट देशद्रोह्यांशी संबंध येत आहे. शिवसेना भाजप सरकार आले तेव्हा प्रफुल्ल पटेल यांनीच भाजपला पाठिंबा दिला होता, असा प्रश्न उद्धव ठाकरे यांनी भाषणातून उपस्थित केला आहे.

हेही वाचा- रायगडात काँग्रेसच्या उमेदवार अॅड. श्रद्धा ठाकूर यांचे 'एकला चलो रे'

लोकसभेत भाजपचे सरकार आले असताना रायगडावर भगवा फडकला नाही याचे मला शल्य आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत महाड आणि श्रीवर्धनवर भगवा फडकवून लोकसभेचे उट्टे काढा, असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी केले आहे. यावेळी सभेला उद्योगमंत्री सुभाष देसाई, आमदार प्रवीण दरेकर, माजी आमदार अवधूत तटकरे, महाड विधानसभा उमेदवार भरत गोगावले, श्रीवर्धन विधानसभा उमेदवार विनोद घोसाळकर, जिल्हाप्रमुख अनिल नवगणे, सुरेंद्र म्हात्रे, किशोर जैन, संपर्कप्रमुख सदानंद थरवळ, शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

हेही वाचा- मी जोपर्यंत आहे तोपर्यंत संविधानाला हात लाऊ देणार नाही - रामदास आठवले

Intro:स्वतःच्या पक्षाच्या लोकांवर विश्वास नसल्याने शरद पवार स्वतः प्रचारात उतरले

भाजप शिवसेनेवर टीका करताना आपल्याच पक्षाने पाठिंबा दिला

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा माणगाव सभेत राष्ट्रवादीवर घणाघात

रायगड : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा स्वतःच्या पक्षाच्या लोकावर विश्वास नाही त्यामुळे त्यांना उन्हा पावसात प्रचाराची वेळ आली आहे. भाजप शिवसेना पक्षावर टीका करताना भाजपला पाठिंबा कसा दिलात असा सवाल विचारत
स्वतःच्या पक्षातील नेत्यांना ईडीच्या चौकशीला सामोरे जावे लागत आहे. असा सणसणीत सवाल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी माणगाव येथील सभेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार याना केला आहे. श्रीवर्धन आणि महाड मध्ये भगवा फडकविण्याचे आवाहन उद्धव ठाकरे यांनी यावेळी केले.

Body:महाड विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार उमेदवार भरत गोगावले यांची प्रचार सभा माणगाव येथे द.ग. तटकरे विद्यालय मैदानावर घेण्यात आली. यावेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे उपस्थित होते. त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसवर व काँग्रेस आघाडीवर सडकून टीका केली. उद्योगमंत्री सुभाष देसाई, आमदार प्रवीण दरेकर, माजी आमदार अवधूत तटकरे, महाड विधानसभा उमेदवार भरत गोगावले, श्रीवर्धन विधानसभा उमेदवार विनोद घोसाळकर, जिल्हाप्रमुख अनिल नवगणे, सुरेंद्र म्हात्रे, किशोर जैन, संपर्कप्रमुख सदानंद थरवळ, शिवसेना पदाधिकारी, शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Conclusion:राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची वाताहत झाली असून पक्षाच्या लोकांवर विश्वास राहिला नसल्याने शरद पवार उन्हा, पावसात प्रचार करीत आहेत. ज्या लोकांसाठी पवार प्रचार करीत आहेत. ते उद्या तुमच्यासोबत राहतील का असा सवालही पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाषणात केला आहे. शिवसेना भाजपचे सरकार आल्यानंतर हेच निवडून येणारे आमदार हे पक्ष बदलतील असा टोलाही ठाकरे यांनी लगावला. शिवसेना भाजप सरकारवर टीका करीत आहेत. मात्र स्वतःच्या पक्षातील नेते भ्रष्टाचारमध्ये अटकले असून प्रफुल्ल पटेल हे ईडीच्या चौकशीत अडकले आहेत. त्याचा थेट देशद्रोह्यांशी संबंध येत आहे. शिवसेना भाजप सरकार आले तेव्हा प्रफुल्ल पटेल यांनीच भाजपला पाठिंबा दिला होता. असा प्रश्न उद्धव ठाकरे यांनी भाषणातून उपस्थित केला आहे.

लोकसभेत भाजपचे सरकार आले असताना रायगडावर भगवा फडकला नाही. याचे मला शल्य आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत महाड आणि श्रीवर्धनवर भगवा फडकवून लोकसभेचे उट्टे काढा असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी केले आहे.
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.