ETV Bharat / state

दिवेआगर किनाऱ्यावर शिंपल्याची चादर; वेचण्यासाठी स्थानिकांची गर्दी

समुद्रात आठवड्यापूर्वी कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने समुद्रातील वातावरणात बदल झाला होता. या बदललेल्या वातावरणामुळे समुद्रातील लाटा निर्माण झाल्या. या लाटांच्या वेगाने समुद्रातील हे छोटे जीवजंतू समुद्र किनारी आले. आता समुद्रातील वादळाचा जोर कमी झाल्याने समुद्र किनाऱ्यावर शिंपल्यांचा सडा पसरलेला दिसत आहे.

author img

By

Published : Jun 18, 2019, 1:49 PM IST

दिवेआगर किनाऱ्यावर शिंपल्याची चादर

रायगड - दिवेआगर समुद्र किनारी शिंपल्यांचा सडा पसरला असून ते वेचण्यासाठी स्थानिकांनी गर्दी केली आहे. यामुळे समुद्र किनारी शिंपल्यांनी चादर पसरल्यासारखे दृश्य तयार झाले आहे.

Raigad
दिवेआगर किनाऱ्यावर शिंपल्याची चादर पसरल्यासारखे दृश्य

समुद्रात आठवड्यापूर्वी कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने समुद्रातील वातावरणात बदल झाला होता. या बदललेल्या वातावरणामुळे समुद्रातील लाटा निर्माण झाल्या. या लाटांच्या वेगाने समुद्रातील हे छोटे जीवजंतू समुद्र किनारी आले. आता समुद्रातील वादळाचा जोर कमी झाल्याने समुद्र किनाऱ्यावर शिंपल्यांचा सडा पसरलेला दिसत आहे.

दिवेआगर समुद्रकिनारी मागील २ दिवसांपासून हे शिंपले आले असून पर्यटकांनी व स्थानिकांनी ते वेचून घरी नेले आहेत. समुद्रातून किनाऱ्यावर आलेले हे शिंपले नागरिक घरी नेत असले तरी ते खाण्यासाठी चविष्ट नाहीत. मात्र, शोभिवंत वस्तू बनविण्यासाठी या शिपल्यांचा उपयोग होऊ शकतो. समुद्र किनारी पसरलेल्या या शिंपल्याने दिवेआगरच्या समुद्राचे सौंदर्य खुलून निघाले आहे.

raigad
शिंपले वेचताना नागरिक

दिवेआगर येथे शिंपल्या या नेहमी समुद्र किनारी येत असतात. मात्र, आठवड्यापूर्वी झालेल्या वायू चक्रीवादळाने समुद्र खवळलेला होता. तर किनाऱ्यावरही मोठ्या प्रमाणात पाणी होते. चक्रीवादळाचा जोर कमी झाल्याने समुद्र किनाऱ्यावरील पाणी ओसरल्याने शिंपले समुद्र किनारी दिसू लागले असल्याचे सहायक मत्सव्यवसाय विकास अधिकारी सुरेन्द्र गावडे यांनी सांगितले.

Intro:दिवेआगर किनाऱ्यावर शिंपल्याची चादर

शिंपले गोळा करण्यासाठी नागरिकांची गर्दी

रायगड : दिवेआगर समुद्र किनारी शिपल्यांचा सडा पसरला असून ते वेचण्यासाठी स्थानिकांनी गर्दी केलेली पाहायला मिळत आहे. समुद्र किनारी शिपल्यानी चादर पसरल्या सारखे दृश्य यामुळे तयार झाले आहे. Body:समुद्रात आठवड्यापूर्वी कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने समुद्र खवळलेला होता. त्यामुळे समुद्रातील वातावरणात बदल झाला होता. या बदललेल्या वातावरणामुळे समुद्रातील छोटे जीवजंतू हे समुद्र किनारी लाटाद्वारे आलेले आहेत. या लाटांच्या वेगाने शिंपले हे समुद्र किनारी आलेले आहेत. समुद्रातील वादळाचा जोर कमी झाल्याने समुद्र किनाऱ्यावर शिपल्याचा सडा पसरलेला दिसत आहे.

दिवेआगर समुद्र किनारी गेल्या दोन दिवसांपासून हे शिंपले आले असून पर्यटकांनी व स्थानिकांनी हे वेचून घरी नेले आहेत. समुद्रातून किनाऱ्यावर आलेले हे शिंपले नागरिक घरी नेत असले तरी ते खाण्यासाठी चविष्ट नाहीत. मात्र शोभिवंत वस्तू बनविण्यासाठी या शिपल्यांचा उपयोग होऊ शकतो. समुद्र किनारी पसरलेल्या या शिपल्याने दिवेआगरच्या समुद्राचे सौदर्य खुलून निघाले आहे.
Conclusion:दिवेआगर येथे शिपल्या ह्या नेहमी समुद्र किनारी येत असतात. मात्र आठवड्यापूर्वी झालेल्या वायू चक्रीवादळाने समुद्र खवळलेला होता. तर किनाऱ्यावरही मोठ्या प्रमाणात पाणी होते. चक्रीवादळाचा जोर कमी झाल्याने समुद्र किनाऱ्यावरील पाणी ओसरल्याने शिंपले समुद्र किनारी दिसू लागले आहेत.

सुरेन्द्र गावडे
सहायक मतसव्यवसाय विकास अधिकारी
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.