ETV Bharat / health-and-lifestyle

तुम्ही सतत चिंताग्रस्त असता का? ट्राय करा 'या' टिप्स

Mental Health Day 2024: मानसिक आजार हा एखाद्या प्राणघातक आजारापेक्षा कमी नाही. तुमचं मन निरोगी आणि आनंदी ठेवण्यासाठी या टिप्स फॉलो करा.

Mental Health Day 2024
जागतिक मानसिक आरोग्य दिन (ETV Bharat)
author img

By ETV Bharat Health Team

Published : Oct 10, 2024, 5:15 PM IST

Mental Health Day 2024: व्यस्त जीवनशैली आणि दररोजची धावपळ आपल्याला आपल्या अंतर्मनाचा आवाज ऐकू देत नाही. त्यामुळं हळुहळू चिंता, तणाव, दुःख अशा अनेक भावना आपल्या मनात घर करू लागतात. त्याचा थेट परिणाम आपल्या मानसिक तसंच शारीरिक आरोग्यावर होतो. यातून लवकरात लवकर सुटका मिळवणं फार गरजेचं असतं. अन्यथा मानसिक त्रासाचे वाईट परिणाम होऊ शकतात. मानसिक सुदृढतेसाठी लोकांमध्ये जागरुकता निर्माण करणे आवश्यक आहे. म्हणून दरवर्षी १० ऑक्टोबरला 'जागतिक मानसिक आरोग्य दिन' साजरा केला जातो. आज याच दिवसाचे औचित्य साधून माहिती करूयात मानसिक आरोग्याचं महत्त्व.

मानसिक आजार एखाद्या प्राणघातक आजारापेक्षा कमी नाही. अभ्यास, करिअर, नोकरी, व्यावसायिक अशा एक ना अनेक कारणांमुळे जगातील बहुतेक लोक मानसिक आजारानं ग्रस्त आहेत. करिअर, शाळा किंवा प्रेमात अपयश आल्यामुळं नैराश्याचे शिकार झालेले तरुण आत्महत्या देखील करतात. त्यामुळं मानसिक आरोग्यबद्दल जागरूकता निर्माण करणं अत्यंत महत्त्वाचं आहे. मानसशास्त्रज्ञांच्या मते, आत्महत्येचे विचार बायपोलर डिसऑर्डर दर्शवतात.

Mental Health Day 2024
जागतिक मानसिक आरोग्य दिन (ETV Bharat)
  • मानसिक आजारांची लक्षणं
  • सतत विचार करत राहाणं
  • व्यक्तिमत्व अचानक बदल
  • झोप न येणे
  • दैनंदिन काम करण्याची इच्छा नसणं
  • क्षुल्लक गोष्टीवर राग येणं, चिडचिड होणं, हिंसक वागणं
  • सतत आत्महत्येचा विचार
  • लवकरच मूड स्विंग होणं
  • दारू आणि ड्रग्जच्या आहारी जाणं
  • मानसिक आरोग्यासाठी टिप्स
  • ध्यान करावं: दररोज सकाळी आणि संध्याकाळी 15 ते 20 मिनिटं ध्यान करा. प्रथम 5 मिनिटांपासून सुरुवात करा. नंतर 15 ते 20 मिनिटं ध्यान करण्याचा प्रयत्न करा. यामुळं तणाव आणि चिंता कमी होते. तसंच मनात सकारात्मक भावना निर्माण होते.
  • वाचन करावं: जर तुम्हाला अवांतर वाचनाची आवड असेल तर, नियमत वाचन करणं चांगलं आहे. तुम्ही एखादी पुस्तक, मासिकं किंवा तुमच्या आवडीचं कोणतही साहित्य वाचू शकता. याशिवाय तुम्ही डायरी ठेवू शकता. त्यात कविता लिहू शकता. त्यामुळं मन हलकं होतं. चिंता आणि तणाव दूर करण्यासाठी हे फायदेशीर आहे.
  • व्यायाम: शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी नियमित व्यायाम आवश्यक आहे. दररोज किमान 20 मिनिट व्यायाम करण्याचा सराव करा. हे तुम्हाला तंदुरुस्त राहण्यास आणि चांगली झोप लागण्यास मदत करेल.
  • पुरेशी झोप : चांगल्या आरोग्यासाठी चांगली झोप आवश्यक आहे. किमान 7 ते 8 तास झोप घेणं गरजेचं आहे. यामुळे चिंता आणि तणाव कमी होतो.
  • हेल्दी ब्रेकफास्ट: सकाळचा नाश्ता आरोग्यासाठी फार महत्त्वाचा आहे. तसंच नाश्त्यामध्ये सर्व पोषक घटक असणं आवश्यक आहे. हे आपल्याला उर्जा प्रदान करतात.
  • तुमचे विचार शेअर करा: मानसिक आरोग्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमचे विचार आणि भावना शेअर करणं. आजच्या बिझी शेड्युलमध्ये दोन मिनिटं बसून बोलायला कुणाजवळच वेळ नाही. प्रत्येकजण आपापल्या आयुष्यात व्यस्त आहे. यामुळं आपण एकट्यात घूसमळत असतो. आपण दुःखी असू वा सुखी आपण आपले विचार इतरांजवळ शेअर केले पाहिजे. यामुळे मन हलकं होतं. तसंच इतरांना दुःख सांगितल्यास अनेक मार्ग मोकळे होतात.

तज्ञ काय म्हणतात: जयपूरचे ज्येष्ठ मानसोपचारतज्ज्ञ डॉ. शिवा गौतम यांच्यानुसार, व्यक्तीच्या मानसिक आरोग्यावर परिणाम झाला तर त्याचा परिणाम शारीरिक हालचालींवर दिसून येतो. जेव्हा मानसिक आरोग्य बिघडतं तेव्हा शरीरातून हार्मोन्सचा स्राव होतो. ज्याचा शारीरिक आरोग्यावर परिणाम होतो. यावर्षी जागतिक मानसिक आरोग्य दिनाची थीम 'मेंटल हेल्थ अ‍ॅट वर्क प्लेस' अशी आहे. आजकाल महिला अधिक तणावाखाली जगताना दिसतात. विशेषत: जॉब करणाऱ्या महिला जास्त तणावामध्ये असतात. कारण त्यांना कुटुंब आणि कामाच्या ठिकाणी संतुलन राखावं लागतं. कुटुंब सांभाळण्याची आणि ऑफिसमध्ये स्वतःला सिद्ध करण्याच्या जबाबदारीमुळे त्या जास्त तणावामध्ये असतात. यापासून सुटका मिळवण्यासाठी संतुलित आहार, पुरेशी झोप आणि नियमित व्यायाम करणं महत्त्वाचं आहे.

(डिस्क्लेमर: ही सामान्य माहिती केवळ वाचनासाठी दिलेली आहे. ईटीव्ही भारत या माहितीच्या वैज्ञानिक मान्यतेबाबत कोणतीही पुष्टी करत नाही. अधिक माहितीसाठी डॉक्टरांकडून सल्ला घ्यावा.)

हेही वाचा

  1. दिवसाला किती अंडी खावी? तज्ञ काय सांगतात
  2. या दसऱ्यात घरीच बनवा स्वादिष्ट 'रसमलाई

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.