ETV Bharat / state

मांडवा समुद्रकिनारी रंगली वाळूवरची कुस्‍ती स्‍पर्धा; राज्‍यभरातील मल्‍लांचा सहभाग - मल्‍ल

रायगड जिल्‍ह्यासह राज्‍याच्‍या अनेक भागातून मल्‍लांनी मोठया संख्‍येने या कुस्‍तीस्‍पर्धेला हजेरी लावली. टाकादेवी स्‍पोर्टस क्‍लब आणि मांडवा ग्रामस्‍थ यांच्‍यावतीने मांडवा किनारी दरवर्षी या स्‍पर्धा भरवल्‍या जातात.

वाळूवरची कुस्‍ती स्‍पर्धा
author img

By

Published : Aug 15, 2019, 10:01 AM IST

रायगड - अलिबाग तालुक्‍यातील मांडवा समुद्रकिनारी नारळी पौर्णिमेनिमित्‍त वाळूवरील कुस्‍त्‍यांची दंगल आयोजित करण्यात आली होती.रायगड जिल्‍ह्यासह राज्‍याच्‍या अनेक भागातून मल्‍लांनी मोठया संख्‍येने या कुस्‍तीस्‍पर्धेला हजेरी लावली. टाकादेवी स्‍पोर्टस क्‍लब आणि मांडवा ग्रामस्‍थ यांच्‍यावतीने मांडवा किनारी दरवर्षी या स्‍पर्धा भरवल्‍या जातात.

मांडवा समुद्रकिनारी रंगली वाळूवरची कुस्‍ती स्‍पर्धा; राज्‍यभरातील मल्‍लांचा सहभाग

या स्‍पर्धेला तब्बल दीडशे वर्षांची परंपरा आहे. आज या स्‍पर्धेला नवीन वलय प्राप्‍त झाला आहे. गावातील नव्‍या पिढीनेही परंपरा आजही जपली आहे. यातून गावात चांगले मल्‍ल तयार झालेत. पश्चिम महाराष्‍ट्रातील पूरस्थितीचा या कुस्‍तीस्‍पर्धेवर परिणाम झाल्‍याचे दिसत नाही. ही स्‍पर्धा पाहण्‍यासाठी जिल्‍हाभरातील कुस्‍तीप्रेमी मोठी गर्दी करतात. केवळ रायगड जिल्ह्यासह कोल्‍हापूर, सातारा, पुणे, ठाणे, भिवंडी, कल्‍याण येथील मल्‍ल या स्पर्धेत सहभागी झाले होते. वाळूवरील कुस्‍ती खेळण्‍यात एक वेगळा आनंद मिळत असल्‍याचे मल्लांनी यावेळी सांगितले.

राज्यात व देशात मातीवरील व मॅटवरील कुस्ती खेळली जाते. मात्र, वाळूमध्ये कुस्ती ही जिल्ह्यात अलिबाग मांडवा येथेच खेळली जाते. त्यामुळे नारळी पौर्णिमेच्या सणानिमित्त खेळणाऱ्या या कुस्ती स्पर्धेकडे कुस्तीप्रेमीचे लक्ष लागून राहिले असते.

Intro:मांडवा समुद्रकिनारी रंगली वाळूवरची कुस्‍ती स्‍पर्धा

टाकादेवी स्‍पोर्टस क्‍लबने केले आयोजन

राज्‍यभरातील मल्‍लांचा सहभाग

रायगड : अलिबाग तालुक्‍यातील मांडवा समुद्रकिनारी नारळी पौर्णिमेनिमित्‍त वाळूवरील कुस्‍त्‍यांची दंगल आयोजीत करण्‍यात आली होती. केवळ रायगड जिल्‍हयातूनच नव्‍हे राज्‍याच्‍या अनेक भागातून मल्‍लांनी मोठया संख्‍येने या कुस्‍तीस्‍पर्धेला हजेरी लावली. टाकादेवी स्‍पोर्टस क्‍लब आणि मांडवा ग्रामस्‍थ यांच्‍यावतीने मांडवा किनारी दरवर्षी या स्‍पर्धा भरवल्‍या जातात. Body:या स्‍पर्धेला थोडीथोडकी नव्‍हे तर दीडशे वर्षांची परंपरा आहे. आज या स्‍पर्धेला नवीन वलंय प्राप्‍त झालंय. गावातील नव्‍या पिढीनं ही परंपरा आजही जपलीय. यातून गावात  चांगले मल्‍ल तयार झालेत. पश्चिम महाराष्‍ट्रातील पूरस्थितीचा या कुस्‍तीस्‍पर्धेवर परीणाम झाल्‍याचे दिसत नाही.  ही स्‍पर्धा पाहण्‍यासाठी जिल्‍हाभरातील कुस्‍तीप्रेमी मोठी गर्दी करतात. केवळ रायगड जिल्‍हयातूनच नव्‍हे कोल्‍हापूर, सातारा, पुणे, ठाणे, भिवंडी, कल्‍याण येथील मल्‍ल या दंगलीत सहभागी झाले होते. वाळूवरील कुस्‍ती खेळण्‍यात एक वेगळा आनंद मिळत असल्‍याचं ते सांगतात. Conclusion:राज्यात व देशात मातीवरील व मॅट वरील कुस्ती खेळली जाते. मात्र वाळूमध्ये कुस्ती ही जिल्ह्यात अलिबाग मांडवा येथेच खेळली जाते. त्यामुळे नारळी पौर्णिमेच्या सणानिमित्त खेळणाऱ्या या कुस्ती स्पर्धेकडे कुस्तीप्रेमीच लक्ष लागून राहिले असते.
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.