रायगड - रायगड जिल्ह्यात इतर तालुक्यात पावसाने विश्रांती घेतली असली, तरी रोहा तालुक्याला रात्रीपासून चांगलेच झोडपून काढले आहे. रोहा तालुक्यात मुसळधार पाऊस पडत असून कुंडलिका नदीही तुंबडी भरून वाहत आहे. रोहा मुरुड रस्त्यावर या पावसाने कवालठे रस्त्यावर दरड कोसळली आहे. त्यामुळे हा रस्ता वाहतुकीस बंद करण्यात आला आहे. रोहा सार्वजनिक बांधकाम विभागाकडून दरड काढण्याचे काम सुरू आहे. जिल्ह्यात आज दिवसभरात (66) मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. तर, आतापर्यंत जिल्ह्यात (541.61) मिलिमीटर इतका पाऊस पडला आहे.
रोहा तालुक्यात रात्रीपासून मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळे तालुक्यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. रोहा मुरुड रस्त्यावर कवालठे गावाजवळ दरड कोसळली आहे. ही दरड पूर्ण रस्त्यावर पडली आहे. त्यामुळे हा रस्ता रहदारीसाठी बंद करण्यात आला आहे. दरड कोसळल्याची माहिती मिळताच रोहा सार्वजनिक बांधकाम विभाग घटनास्थळी दाखल झाला आहे. जेसीबीच्या साहाय्याने रस्त्यावर पडलेली दरड काढण्याचे काम सध्या सुरू आहे. चार ते पाच तासानंतर रस्ता वाहतुकीस सुरू होईल, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाकडून देण्यात आलेली आहे.
जिल्ह्यात दिवसभरात सरासरी 66 मिलिमीटर पावसाची नोंद
रायगड जिल्ह्यात गेल्या (24) तासात सरासरी (66.03) मि.मी इतक्या पावसाची नोंद झाली आहे. तसेच दि. (1) जूनपासून आजपर्यंत एकूण सरासरी (541.61) मि.मी. पर्जन्यमानाची नोंद झाली आहे. अलिबाग- (104.00० मि.मी., पेण- (36.00) मि.मी., मुरुड- (99.00) मि.मी., पनवेल- (52.60) मि.मी., उरण-(78.00) मि.मी., कर्जत- (20.40) मि.मी., खालापूर- (14.00) मि.मी., माणगाव- (101.00) मि.मी., रोहा- (53.00) मि.मी., सुधागड-(52.00) मि.मी., तळा- (84.00) मि.मी., महाड- (67.00) मि.मी., पोलादपूर- (78.00) मि.मी, म्हसळा- (81.00० मि.मी., श्रीवर्धन- (100.00) मि.मी., माथेरान- (36.40) मि.मी.असे आजचे एकूण पर्जन्यमान 1 हजार (56.40) मि.मी. इतके आहे. त्याची सरासरी (66.03) मि.मी. इतकी आहे. एकूण सरासरी पर्जन्यमानाची टक्केवारी (17.23) टक्के इतकी आहे.