ETV Bharat / state

पनवेलच्या जसदनवाला कॉम्प्लेक्समधील गॅरेजवर चोरट्यांचा डल्ला

जसदनवाला कॉम्प्लेक्समध्ये कार्यालय आणि अनेक दुकानांचे गाळे देखील आहेत. मध्यरात्रीच्या सुमारास चोरट्यांनी जसदनवला कॉम्प्लेक्स आणि जेएमडब्ल्यू या गॅरेजचे शटर उचकटून चोरटे आत घुसले. गॅरेजच्या आत गल्ल्यात असलेले सुमारे 38 हजार रुपयांची रोकड लंपास केली आहे.

robbery
पनवेलच्या जसदनवाला कॉम्प्लेक्समध्ये चोरी
author img

By

Published : Dec 4, 2019, 11:39 PM IST

रायगड - पनवेल रेल्वे स्थानकापासून काही अंतरावर असलेल्या जसदनवाला कॉम्प्लेक्समध्ये चोरट्यांनी कॉम्प्लेक्सचे कार्यालय आणि गॅरेज फोडून रोख रक्कम लंपास केली आहे. जुन्या पनवेलमध्ये जसदनवाला हे कॉम्प्लेक्स आहे.

पनवेलच्या जसदनवाला कॉम्प्लेक्समध्ये चोरी

हेही वाचा - महापरिनिर्वाण दिनानिमित्त शिवाजी पार्कवर चोख व्यवस्था, पोलीस बंदोबस्त तैनात

जसदनवाला कॉम्प्लेक्समधील कार्यालय आणि अनेक दुकानांचे गाळे देखील आहेत. मध्यरात्रीच्या सुमारास चोरट्यांनी जसदनवला कॉम्प्लेक्स आणि जेएमडब्ल्यू या गॅरेजचे शटर उचकटून चोरटे आत घुसले. गॅरेजच्या आत गल्ल्यात असलेली सुमारे 38 हजार रुपयांची रोकड लंपास केली आहे. सकाळी 5 च्या सुमारास या गॅरेजचे शटर उघडे असल्याचे कळताच गॅरेज मालकाने आत जाऊन पाहिले तर, रिकामा झालेला गल्ला त्यांना दिसला. या चोरट्यांनी कॉम्प्लेक्सच्या पहिल्या मजल्यावर असलेल्या अनेक कार्यालयांचे कुलूप तोडून तिथेही चोरी करण्याचा प्रयत्न केला. मात्र, या कार्यालयात चोरट्यांना काहीच सापडले नाही.

या घटनेची माहिती मिळताच पनवेल शहर पोलीस ठाण्याचे गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पथक घटनास्थळी दाखल झाले. मध्यरात्रीत अनेक कार्यालये फोडून गॅरेजमध्ये चोरी करून या चोरट्यांनी पोलिसांना आव्हान दिले आहे. सध्या पनवेल शहर पोलीस या चोरट्यांचा शोध घेत आहेत. लवकरच या चोरट्यांचा शोध घेतला जाईल, असे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.

Intro:सोबत एडिटेड AV जोडली आहे.

पनवेल

पनवेल रेल्वे स्थानकापासून काही अंतरावर असलेल्या जसदनवला कॉम्प्लेक्समध्ये चोरट्यांनी कॉम्प्लेक्सचे कार्यालय आणि गॅरेज फोडून गल्ल्यातील रोख रक्कम लंपास केल्याची घटना घडलीये.
Body:ओल्ड पनवेल इथल्या जसदनवाला कॉम्प्लेक्स आहे. यात जसदनवाला कॉम्प्लेक्समधील कार्यालय आणि अनेक दुकानांचे गाळे देखील आहेत. मध्यरात्रीच्या सुमारास चोरट्यांनी जसदनवला कॉम्प्लेक्स आणि जेएमडब्ल्यू नावाचे गॅरेजचे शटर उचकटून चोरटे आत घुसले. गॅरेजच्या आत गल्ल्यात असलेले सुमारे 38 हजार रुपयांची रोकड लंपास केली आहे. सकाळी 5 च्या सुमारास या गॅरेजचे शटर उघड असल्याचं कळताच गॅरेज मालकाने आत जाऊन पाहिले तर रिकामा झालेला गल्ला पाहून गॅरेज मालक सुन्न झाला. या चोरट्यांनी कॉम्प्लेक्सच्या पहिल्या माळ्यावर असलेल्या अनेक कार्यालयाचे कुलूप तोडून तिथेही चोरी करण्याचा प्रयत्न केला. मात्र या कार्यालयात चोरट्यांना काहीच सापडलं नाही.

Conclusion:या घटनेची माहिती मिळताच पनवेल शहर पोलीस ठाण्याचे गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पथक घटनास्थळी दाखल झाले. मध्यरात्रीत अनेक कार्यालय फोडून गॅरेजमध्ये चोरी करून या चोरट्यांनी पोलिसांना आव्हान केलंय. सध्या पनवेल शहर पोलीस या चोरट्यांचा शोधात लागले असून लवकरच या चोरट्यांचा शोध घेतला जाईल, असा विश्वास पोलिसांकडून व्यक्त करण्यात येतोय.

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.