ETV Bharat / state

भाऊचा धक्का ते मांडवा 'रोरो बोटी'ची चाचणी सुरू, 'प्रोटो प्रोसेस' मांडवा बंदरात

भाऊचा धक्का ते मांडवा अलिबाग या बहुप्रतिक्षित आणि बहुचर्चित रोरो बोट सेवेची चाचणी घेण्यात आली आहे. 'प्रोटो प्रोसेस' ही अत्याधुनिक रोरो बोट मांडवा बंदराला लागल्यानंतर नागरिकांनी बोट पाहण्यासाठी गर्दी केली होती.

रायगड
रायगड
author img

By

Published : Mar 11, 2020, 5:34 PM IST

Updated : Mar 11, 2020, 5:50 PM IST

रायगड - भाऊचा धक्का ते मांडवा अलिबाग या बहुप्रतिक्षित आणि बहुचर्चित रोरो बोट सेवेची चाचणी घेण्यात आली आहे. ही रोरो बोट आज मांडवा जेट्टीला लागली. 'प्रोटो प्रोसेस' ही अत्याधुनिक रोरो बोट मांडवा बंदराला लागल्यानंतर नागरिकांनी बोट पाहण्यासाठी गर्दी केली होती.

भाऊचा धक्का ते मांडवा 'रोरो बोटी'ची चाचणी सुरू, 'प्रोटो प्रोसेस' मांडवा बंदरात

मुंबईतील भाऊचा धक्का येथून रोरो बोट 1 वाजून 22 मिनिटांनी मांडवा अलिबागकडे येण्यास निघाली. ही बोट 50 मिनिटांत मांडवा बंदराच्या जेट्टीला लागली. रोरो बोटीची चाचणी घेण्यात येत असून एमएमबी, एमबीटी, बोट नोंदणी अधिकारी, पोलीस अधिकारी यांच्या देखरेखीखाली रोरो बोटीची चाचणी घेण्यास सुरुवात झाली आहे. रोरो बोटीतून वाहनेही आणण्यात आली असून त्यांची चढताना व उतरताना चाचणी घेण्यात आली. रोरो बोटीची चाचणी यशस्वीरीत्या झाल्यानंतर ही बोटसेवा 15 मार्चला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते सुरू करण्याचा मानस आहे.

ही बोट ओहोटीच्या वेळी बंदराला लागेल की नाही अशी शंका व्यक्त केली जात होती. मात्र, ओहोटी सुरू असतानाही ही रोरो मांडवा धक्क्याला लागली. 'प्रोटो प्रोसेस' रोरो बोट मांडवा धक्क्याला लागल्यानंतर नागरिकांनी ती पाहण्यासाठी गर्दी केली होती.

हेही वाचा - रायगडच्या पर्यटनाला कोरोनाचा फटका
हेही वाचा - रायगडची 'ती' हिरकणी ठरली कोकण रेल्वेची पहिली महिला रेल्वे चालक..!

Last Updated : Mar 11, 2020, 5:50 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.