ETV Bharat / state

रायगडचा आखाडा: आपापले गड राखण्यासाठी प्रस्थापितांना द्यावी लागणार कडवी झुंज - श्रीवर्धन मतदारसंघ

जिल्ह्यात अलिबाग - मुरुड, पेण, उरण, कर्जत - खालापूर, श्रीवर्धन, महाड - पोलादपूर व पनवेल असे ७ विधानसभा मतदारसंघ आहेत.

रायगडचा आखाडा
author img

By

Published : Sep 23, 2019, 7:57 PM IST

रायगड - विधानसभा निवडणुकीचे बिगुल आता वाजले आहे. २१ ऑक्टोबरला विधानसभेसाठी मतदान होणार आहे. या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांनी प्रचाराला सुरुवात केली आहे. रायगड जिल्ह्यातही आपापले गड शाबूत राखण्यासाठी राष्ट्रवादी, शिवसेना आणि शेकापने मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे.

जिल्ह्यात ७ विधानसभा मतदारसंघात कोण फटाके वाजवणार हे 24 ऑक्टोबरला समजणार आहे. शेकाप, राष्ट्रवादी आपले गड राखणार की शिवसेना, भाजप ते खेचून आणणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. जिल्ह्यातील शेकाप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, भाजप हे पक्ष आता आपापले गड राखण्यासाठी व खेचून आणण्यासाठी सज्ज झाले आहेत.

जिल्ह्यात अलिबाग - मुरुड, पेण, उरण, कर्जत - खालापूर, श्रीवर्धन, महाड - पोलादपूर व पनवेल असे ७ विधानसभा मतदारसंघ आहेत. अलिबाग, पेण (शेकाप), कर्जत, श्रीवर्धन (राष्ट्रवादी काँग्रेस), महाड, उरण (शिवसेना), पनवेल (भाजप) असे बलाबल सातही मतदारसंघात आहेत. पाच वर्षात राजकीय वातावरण ढवळून निघाले असल्याने यावेळी काही प्रस्थापित आमदारांना पराभवाचे धक्के बसण्याची शक्यता नाकारता येत नाही.

रायगडचा आखाडा

अलिबाग मुरुड विधानसभा मतदारसंघ

या मतदारसंघात शेकापचे पंडित पाटील हे विद्यमान आमदार आहेत. शेकापने अजून उमेदवार जाहीर केलेला नसला तरी यावेळीही पक्षाकडून पंडित पाटील यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. मात्र, पाच वर्षात मतदारसंघात विकासकामे करण्यात पंडित पाटील यांना अपयश आलेले आहे. त्यामुळे मतदारांची नाराजी यावेळी भोवण्याची शक्यता निर्माण झाली आहे. शिवसेनेकडूनही उमेदवार जाहीर झालेले नसले तरी 2014 चे शिवसेनेचे उमेदवार महेंद्र दळवी हेच मैदानात उतरण्याची शक्यता आहे. काँग्रेसकडून राजेंद्र ठाकूर हेसुद्धा इच्छुक आहेत. भाजप शिवसेना युती अद्याप झालेली नाही. मात्र, भाजपचे अॅड. महेश मोहिते यांनीसुद्धा मतदारसंघात आपला संपर्क सुरू केला आहे. शिवसेना भाजपची वाढती ताकद शेकापला डोकेदुखी ठरत आहे. लोकसभेला काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शेकाप अशी आघाडी होती. असे असले तरी काँग्रेसनेही अलिबाग मतदातसंघात आपला प्रचार सुरू केलेला आहे. त्यामुळे यावेळी चौरंगी लढत होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या सर्व पार्श्वभूमीवर शेकापला आपला बालेकिल्ला राखण्यासाठी जोरदार प्रयत्न करावे लागणार आहेत.

पेण मतदारसंघ
पेण मतदारसंघात धैर्यशील पाटील शेकापचे विद्यमान आमदार आहेत. काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेले माजी मंत्री रवींद्र चव्हाण यावेळी भाजपचे उमेदवार म्हणून उभे राहण्याची शक्यता आहे. भाजप पेणच्या जागेसाठी ते आग्रही आहे. मात्र, या मतदारसंघावर शिवसेनेचा दावा असल्याने युतीमध्ये ही जागा भाजपला सुटणार का नाही हे अजून स्पष्ट झालेले नाही. शिवसेनेकडून किशोर जैन हे सुद्धा इच्छुक आहेत. काँग्रेसही आपला उमेदवार उभा करणार आहे. लोकसभा निवडणुकीत युतीला पेण मतदारसंघातून मताधिक्य मिळाल्याने शेकापला यावेळी विजयी होण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागणार आहे.

श्रीवर्धन मतदारसंघ
श्रीवर्धन मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान आमदार अवधूत तटकरे यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. यावेळी खासदार सुनील तटकरे यांची कन्या रायगड जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा अदिती तटकरे या उमेदवार म्हणून असणार आहेत. शिवसेनेकडून अनिल नवगणे, राजीव साबळे, समीर शेडगे, रवी मुंढे हे इच्छुक आहेत. भाजपचे कृष्णा कोबनाक यांनीही प्रचाराला सुरुवात केली आहे. अवधूत तटकरे हे उमेदवारीसाठी इच्छुक नाहीत. काँग्रेसनेही या जागेवर आपला हक्क सांगितला आहे. त्यामुळे श्रीवर्धन हा राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला असल्याने शिवसेना, भाजपला याठिकाणी काँटे की टक्कर द्यावी लागणार आहे.

महाड पोलादपूर विधानसभा मतदारसंघ
महाड पोलादपूर विधानसभा मतदारसंघ शिवसेनेकडे असून भरत गोगावले हे विद्यमान आमदार आहेत. काँग्रेसकडून माजी आमदार, जिल्हाध्यक्ष माणिक जगताप यांच्यात दुरंगी लढत होणार आहे. लोकसभेत आघाडीला मताधिक्य वाढले असल्याने भरत गोगावले यांना माणिक जगताप यांच्यासोबत कडवी झुंज द्यावी लागणार आहे.

कर्जत खालापूर मतदारसंघ
कर्जत विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे सुरेश लाड हे विद्यमान आमदार आहे. शिवसेनेकडून इच्छुकांची गर्दी असून भाजपचे देवेंद्र साटम हेसुद्धा इच्छुक आहेत. युती झाली अथवा नाही झाली तरी शिवसेनेत बंडखोरी होण्याची शक्यता असल्याने राष्ट्रवादीचे सुरेश लाड यांना काही प्रमाणात ही निवडणूक सोपी जाण्याची शक्यता आहे. मात्र, युतीत एकता झाली तर लाड यांना संघर्ष करावा लागणार आहे.

उरण मतदारसंघ
उरण मतदारसंघात शिवसेनेचे मनोहर भोईर विद्यमान आमदार असून त्यांनाच पुन्हा उमेदवारी मिळणार आहे. भाजपचे महेश बालदी यांनी सुद्धा तयारी केली आहे. शेकापकडून माजी आमदार विवेक पाटील हे पुन्हा उमेदवार असण्याची शक्यता आहे. काँग्रेसकडून महेंद्र घरत हे इच्छुक आहेत. त्यामुळे मनोहर भोईर यांना कडवी झुंज द्यावी लागणार आहे.

पनवेल मतदारसंघ
प्रशांत ठाकूर हे पनवेलचे विद्यमान आमदार आहेत. ते पुन्हा येथून निवडणूक लढवणार आहेत. भाजप सेना युती नाही झाली तर शिवसेनाही येथून निवडणूक लढवणार आहे. शिवसेनेचे बबन पाटील हे येथून इच्छुक आहेत. तर काँग्रेसकडून कांतीलाल कडू, शेकापकडून प्रितम म्हात्रे इच्छुक आहेत. २०१४ च्या निवडणुकीत प्रशांत ठाकूर यांनी शेकापच्या बाळाराम पाटलांचा पराभव केला होता.

Intro:रायगडचा आखाडा

प्रस्थापित पक्षाला आपले गड राखण्यासाठी दयावी लागणार कडवी झुंज

युती झाल्यास ठरणार युतीच्या उमेदवारांचे भविष्य

मतदार देणार कोणाला कौल

जिल्ह्यातील सातही विधानसभा मतदारसंघात अटीतटीच्या लढती

रायगड : राज्यातील विधानसभा निवडणुकीचे शंख फुकले गेले आहे. 21 ऑक्टोबर रोजी मतदान, 24 ऑक्टोबर ला मतमोजणी होत आहे. दिवाळी आधीच येणारे सरकार फटाके फोडणार आहेत. रायगड जिल्ह्यात सात विधानसभा मतदार संघात कोण फटाके वाजवणार हे 24 तारखेला समजणार आहे. शेकाप, राष्ट्रवादी आपले गड राखणार की शिवसेना, भाजप ते खेचून आणतात तर शिवसेना भाजप आपले गड राखणार की गडाला आघाडी सुरुंग लावणार याकडे आता जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे. जिल्ह्यातील शेकाप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, भाजप हे पक्ष आता आपापले गड राखण्यासाठी व खेचून आणण्यासाठी सज्ज झाले आहेत. युती झाली तर युतीच्या उमेदवारांना फायदा होण्याची शक्यता अन्यथा दोन्ही पक्षाला फटका बसू शकतो

जिल्ह्यात अलिबाग - मुरुड, पेण, उरण, कर्जत - खालापूर, श्रीवर्धन, महाड - पोलादपूर व पनवेल असे सात विधानसभा मतदारसंघ आहेत. अलिबाग, पेण (शेकाप), कर्जत, श्रीवर्धन (राष्ट्रवादी काँग्रेस), महाड, उरण (शिवसेना), पनवेल (भाजप) असे बलाबल सातही मतदारसंघात आहेत. पाच वर्षात राजकीय वातावरण ढवळून निघाले असल्याने यावेळी काही प्रस्थापित आमदारांना पराभवाचे धक्के बसण्याची शक्यता नाकारता येत नाही. Body:अलिबाग विधानसभा

अलिबाग मुरुड विधानसभा मतदारसंघात शेकापचे पंडित पाटील हे विद्यमान आमदार आहेत. शेकापने अजून उमेदवार जाहीर केलेला नसला तरी यावेळीही पक्षाकडून पंडित पाटील यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. मात्र पाच वर्षात मतदातसंघात विकासकामे करण्यात पंडित पाटील यांना अपयश आलेले आहे. त्यामुळे मतदारांची नाराजी यावेळी भोवण्याची शक्यता निर्माण झाली आहे. शिवसेनेकडूनही उमेदवार जाहीर झालेले नसले तरी 2014 चे शिवसेनेचे उमेदवार महेंद्र दळवी हेच उमेदवार असण्याची शक्यता आहे. काँग्रेसकडून राजेंद्र ठाकूर हे सुद्धा इच्छुक आहेत. भाजप शिवसेना युती अद्याप झालेली नाही मात्र भाजपचे अड. महेश मोहिते यांनी सुद्धा मतदारसंघात आपला संपर्क सुरू केला आहे. शिवसेना भाजपची वाढती ताकद शेकापला डोकेदुखी ठरत आहे. लोकसभेला काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शेकाप अशी आघाडी होती. असे असले तरी काँग्रेसनेही अलिबाग मतदातसंघात आपला प्रचार सुरू केलेला आहे.
त्यामुळे यावेळी चौरंगी लढत होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या सर्व पर्शवभूमीवर शेकापला आपला बालेकिल्ला राखण्यासाठी जोरदार प्रयत्न करावे लागणार आहेत.

----------

पेण मतदारसंघ

पेण मतदारसंघात धैर्यशील पाटील शेकापचे विद्यमान आमदार आहेत. काँग्रेसमधून भाजपात आलेले माजी मंत्री रवींद्र चव्हाण यावेळी भाजपचे उमेदवार म्हणून उभे राहण्याची शक्यता आहे. भाजप पेणच्या जागेसाठी आग्रही आहे. मात्र या मतदारसंघावर शिवसेनेचा दावा असल्याने युतीमध्ये ही जागा भाजपला सुटणार का नाही हे अजून स्पष्ट झालेले नाही. शिवसेनेकडून किशोर जैन हे सुद्धा इच्छुक आहेत. काँग्रेसही आपला उमेदवार उभा करणार आहे. लोकसभा निवडणुकीत युतीला पेण मतदारसंघातून मताधिक्य मिळाल्याने शेकापला यावेळी विजयी होण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागणार आहे.

---------------------
श्रीवर्धन मतदारसंघ

श्रीवर्धन मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान आमदार अवधूत तटकरे यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. यावेळी खासदार सुनील तटकरे यांची कन्या राजीप अध्यक्षा अदिती तटकरे या उमेदवार म्हणून असणार आहेत. शिवसेनेकडून अनिल नवगणे, राजीव साबळे, समीर शेडगे, रवी मुंढे हे इच्छुक आहेत. भाजपचे कृष्णा कोबनाक यांनीही प्रचाराला सुरुवात केली आहे. अवधूत तटकरे हे उमेदवारीसाठी इच्छुक नाही आहेत. काँग्रेसनेही या जागेवर आपला हक्क सांगितला आहे. त्यामुळे श्रीवर्धन हा राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला असल्याने शिवसेना, भाजपला याठिकाणी काटे की टक्कर द्यावी लागणार आहे.Conclusion:महाड पोलादपूर मतदारसंघ

महाड पोलादपूर विधानसभा मतदारसंघ शिवसेनेकडे असून भरत गोगावले हे विद्यमान आमदार आहेत. काँग्रेस कडून माजी आमदार, जिल्हाध्यक्ष माणिक जगताप यांच्यात दुरंगी लढत होणार आहे. लोकसभेत आघाडीला मताधिक्य वाढले असल्याने भरत गोगावले यांना माणिक जगताप यांच्यासोबत कडवी झुंज द्यावी लागणार आहे.
------------------
कर्जत खालापूर मतदारसंघ

कर्जत विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे सुरेश लाड हे विद्यमान आमदार आहे. शिवसेनेकडून इच्छुकांची गर्दी असून भाजपाचे देवेंद्र साटम हे सुद्धा इच्छुक आहे. युती झाली अथवा नाही झाली तरी शिवसेनेत बंडखोरी होण्याची शक्यता असल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे सुरेश लाड यांना काही प्रमाणात ही निवडणूक सोपी जाण्याची शक्यता आहे. मात्र युतीत एकता झाली तर लाड यांना संघर्ष करावा लागणार आहे.

उरण मतदारसंघ

उरण मतदारसंघात शिवसेनेचे मनोहर भोईर विद्यमान आमदार असून त्यांनाच पुन्हा उमेदवारी मिळणार आहे. भाजपाचे महेश बालदी यांनी सुद्धा तयारी केली आहे. शेकापकडून माजी आमदार विवेक पाटील उमेदवार पुन्हा असण्याची शक्यता आहे. काँग्रेसकडून महेंद्र घरत हे इच्छुक आहेत. त्यामुळे मनोहर भोईर याना कडवी झुंज द्यावी लागणार आहे.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.