रायगड - जिल्ह्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता 15 जुलैच्या मध्यरात्री 12 वाजल्यापासून ते 24 जुलैच्या मध्यरात्री 12 वाजेपर्यंत रायगडात पुन्हा लॉकडाऊन घेण्यात येणार आहे. मेडिकल, दूध, फार्मा कंपनी तसेच इतर अत्यावश्यक कंपन्या सुरू राहणार असून काही कंपन्या बंद करण्याच्या सूचना दिल्या असल्याची माहिती पालकमंत्री अदिती तटकरे यांनी पत्रकार परिषदेत दिली. दहा दिवसांच्या या लॉकडाऊनमध्ये भाजीपाला, मटण, चिकन, मासळी बाजार, किराणा स्टोअरही बंद राहणार असून नागरिकांना होम डिलिव्हरीची सुविधा देण्यात येणार असल्याचेही पालकमंत्री यांनी सांगितले.
रायगडमध्ये पुन्हा दहा दिवसांचा लॉकडाऊन, भाजीपाल्यासह मासळी बाजारही राहणार बंद - रायगड लॉकडाऊन
रायगड जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव हा दिवसेंदिवस वाढू लागल्याने कोरोनाबाधितांची संख्या साडेसात हजारांवर पोहोचली आहे. त्यामुळे जिल्ह्यात पुन्हा लॉकडाऊन करण्याबाबत नागरिकांमध्ये मागणी वाढू लागली होती. लॉकडाऊनबाबत निर्णय घेण्याबाबत आज जिल्हाधिकारी कार्यलयात राजस्व सभागृहात पालकमंत्री, जिल्हाधिकारी, आमदार आणि जिल्हा प्रशासन अधिकारी यांची बैठक आयोजित केली होती.