ETV Bharat / state

नवी मुंबई आणि रायगडमधील वाहतुकदारांनी उगारले संपाचे हत्यार - Mumbai_Pune Highway

मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर पंधराशे रुपयापेक्षा जास्त टोल आकाला जातो आहे. यामुळे वाहतूकदारांनी संपाचे हत्यार उगारले आहे.

नवी मुंबई आणि रायगडमधील वाहतुकदारांचा संप
author img

By

Published : Oct 3, 2019, 1:29 PM IST

पनवेल : मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर येत असलेला पंधराशे रुपये पेक्षा जास्त अन्यायकारक टोल, अनेक ठिकाणी करण्यात आलेल्या नो एंट्री या व इतर प्रलंबित मागण्याकरता वाहतूकदारांनी एल्गार पुकारला आहे. आजपासून उस्फूर्तपणे बंद ठेवण्याचा निर्णय अखिल महाराष्ट्र राज्य मोटार मालक संघ आणि जेएनपीटी वाहतूकदार बचाव समन्वय समितीच्या पदाधिकाऱ्यांनी घेतला आहे.

नवी मुंबई आणि रायगडमधील वाहतुकदारांचा संप

अवजड वाहने जाण्याकरिता मुंबई पुणे जुन्या महामार्गाचा आजही वापर करतात. मध्यंतरी बोर घाटात अवजड वाहतूक बंद करण्यात आली. दरम्यान संबंधित वाहतूकदारांनी द्रुतगती महामार्गचा वापर करून कुसगाव येथील टोल नाक्यावर प्रवेश आणि बाहेर पडण्याचे बंधन घालून घेण्यात आले होते. जुन्या महामार्गावर आकारण्यात आलेल्या टोलची पावती दाखवल्यास वाहनांना सोडून दिले जात असे. मात्र, सहकार ग्लोबलने या वाहनांकडून साडे पंधराशे रुपये टोल घेण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे 26 रुपयांपेक्षा जास्त पैसे पथकरावच वाहतूकदारांना खर्च करावे लागत आहेत.

एकीकडे व्यवसायात कमालीची मंदी असताना दुसरीकडे अशाप्रकारे टोल सुरू केल्याने वाहतूकदारांमध्ये कमालीचा असंतोष निर्माण झाला आहे. यासंदर्भात सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांना साकडे घालूनही वाहतूकदारांना दिलासा मिळालेला नाही. मध्यंतरी आमदार प्रशांत ठाकूर यांनीही कळंबोली येथे बैठक घेतली होती. मात्र, या प्रश्नावर तोडगा निघू शकलेला नाही.

आम्हा वाहतूकदाराची चारही बाजूने कोंडी केली जात असल्याची प्रतिक्रिया महाराष्ट्र हेवी व्हेहिकल अँड इंटरस्टेट कंटेनर ऑपरेशन असोसिएशनचे अध्यक्ष प्रवीण पैठणकर यांनी दिली. या क्षेत्रात कमालीचा स्लो डाऊन आहे. व्यवसाय नसल्याने हजारो वाहने उभी आहेत. त्यांचे हप्ते भरायचे कसे? हा प्रश्नआमच्या समोर आहे. दुसरीकडे प्रत्येक गोष्ट आमच्यावर लादली जात असल्याचे अखिल महाराष्ट्र राज्य मोटार मालक संघाचे अध्यक्ष भरत पोखरकर यांनी सागितले. न्हावा-शेवा पोर्ट स्थानिक प्रकल्पग्रस्त कंटेनर वाहतूक सहकारी संस्थचे विनोद म्हात्रे यांनीही शासकिय यंत्रणाकडून होत असलेल्या अडवणुकीबद्दल नाराजी व्यक्त केली.

हजारो वाहतूकदारांचा दररोज लाखो रुपयांचा टोल वसूल करून त्यांच्यावर अन्याय केला जात असल्याची भावना निर्माण झाली आहे. याबाबत कोणताही ठोस निर्णय होत नसल्याचे पाहून अखिल महाराष्ट्र मोटर मालक संघटनेचे अध्यक्ष भरत पोखरकर यांनी पुढाकार घेत सर्व वाहतूक संघटनांना एकत्रित केले. यावेळी न्हावा शेवा ऑपरेटर वेल्फेअर असोसिएशनचे श्रीधर, रिफर कंटेनर ऑपरेटर वेल्फेअर असोसिएशनचे विजय कुरकुटे आणि विजय मुळीक,महाराष्ट्र राज्य टेम्पो, ट्रक टँकर्स बस वाहतूक महासंघाचे दयानंद नाटकर, कळंबोली तळोजा वाहतूक संघटनेचे रामदास शेवाळे आणि बापू ढेम्बरे, महाराष्ट्र राज्य मोटार मालक संघाचे कैलास पिगंडे, महाराष्ट्र राज्य वाहतूक सेनेचे गोविंद साबळे आणि महेश गुरव, जय भगवान ट्रान्सपोर्ट असोसिएशनचे राजेंद्र वणवे आणि काका कुतरवडे ही सर्व मंडळी उपस्थित होते.

आर्थिक मंदीमुळे अगोदरच आमचे ट्रान्सपोर्ट मेटाकुटीला आले आहे. त्यातच द्रुतगती महामार्गावर अन्यायकारक टोल वसूल केला जात आहे. याव्यतिरिक्त अनेक ठिकाणी वाहनांना नो एंट्री करण्यात आली आहे. याशिवाय जेएनपीटी सारख्या परिसरात पार्किंग करता जागा उपलब्ध नाही. यासह अनेक समस्यानी वाहतूक व्यवसाय ग्रासलेला आहे. मात्र, याकडे संबंधित यंत्रणा दुर्लक्ष करत आहेत.

Intro:पनवेल

सोबत व्हिज्युअल आणि बाईट जोडले आहेत. कृपया 2 विंडो लावावी.

मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर येत असलेला पंधराशे रुपये पेक्षा जास्त अन्यायकारक टोल, अनेक ठिकाणी करण्यात आलेल्या नो एंट्री या व इतर प्रलंबित मागण्याकरिता वाहतूकदारांनी एल्गार पुकारलाय. आजपासून उस्फूर्तपणे बंद ठेवण्याचा सर्वांनी निर्णय अखिल अखिल महाराष्ट्र राज्य मोटार मालक संघ आणि जेएनपीटी वाहतूकदार बचाव समन्वय समितीच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली आहे. Body:अवजड वाहने जाण्याकरिता मुंबई पुणे जुन्या महामार्गाचा आजही वापर करतात. मध्यंतरी बोर घाटात अवजड वाहतूक बंद करण्यात आली. दरम्यान संबंधित वाहतूकदारांनी द्रुतगती महामार्ग चा वापर करून कुसगाव येथील टोल नाक्यावर प्रवेश आणि बाहेर पडण्याचे बंधन घालून घेण्यात आले होते. जुन्या महामार्गावर आकारण्यात आलेल्या टोलची पावती दाखवल्यास वाहनांना सोडून दिले जात असे. परंतु सहकार ग्लोबलने या वाहनांकडून साडे पंधराशे रुपये टोल घेण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे 26 रुपयांपेक्षा जास्त पैसे पथकरावच वाहतूकदारांना खर्च करावे लागत आहे.

एकीकडे व्यवसायात कमालीची मंदी असताना दुसरीकडे अशाप्रकारे टोल सुरू केल्याने वाहतूकदारांना मध्ये कमालीचा असंतोष निर्माण झाला आहे. यासंदर्भात सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांना साकडे घालू नयेवाहतूकदारांना दिलासा मिळालेला नाही. मध्यंतरी आमदार प्रशांत ठाकूर यांनीही कळंबोली येथे बैठक घेतली होती. परंतु या प्रश्नावर तोडगा निघू शकला नाही.

आम्ही वाहतूकदाराची चारही बाजूने कोंडी केली जात असल्याची प्रतिक्रिया महाराष्ट्र हेवी व्हेहिकल अँड इंटरस्टेट कंटेनर ऑपरेशन असोसिएशनचे अध्यक्ष प्रवीण पैठणकर यांनी दिलीये. या क्षेत्रात कमालीचा स्लो डाऊन आहे. व्यवसाय नसल्याने हजारो वाहने उभी आहेत. त्यांचे हप्ते भरायचे कसे? हा प्रश्नआमच्या समोर आहे. दुसरीकडे प्रत्येक गोष्ट आमच्यावर लादली जात असल्याची अखिल अखिल महाराष्ट्र राज्य मोटार मालक संघाचे अध्यक्ष भरत पोखरकर यांनी दिलीये.

न्हावा-शेवा पोर्ट स्थानिक प्रकल्पग्रस्त कंटेनर वाहतूक सहकारी संस्थचे विनोद म्हात्रे यांनीही शासकिय यंत्रणाकडून होत असलेल्या अडवणुकीबद्दल नाराजी व्यक्त केली.

दरम्यान हजारो वाहतूकदारांचा दररोज लाखो रुपयांचा टोल वसूल करून त्यांच्यावर अन्याय केला जात असल्याची भावना निर्माण झालेली आहे. याबाबत कोणताही ठोस निर्णय होत नसल्याचे पाहून अखिल महाराष्ट्र मोटर मालक संघटनेचे अध्यक्ष भरत पोखरकर यांनी पुढाकार घेत सर्व वाहतूक संघटनांना एकत्रित केले. यावेळी न्हावा शेवा ऑपरेटर वेल्फेअर असोसिएशनचे श्रीधर, रिफर कंटेनर ऑपरेटर वेल्फेअर असोसिएशनचे विजय कुरकुटे आणि विजय मुळीक,

महाराष्ट्र राज्य टेम्पो, ट्रक टँकर्स बस वाहतूक महासंघाचे दयानंद नाटकर, कळंबोली तळोजा वाहतूक संघटनेचे रामदास शेवाळे आणि बापू ढेम्बरे, महाराष्ट्र राज्य मोटार मालक संघाचे कैलास पिगंडे, महाराष्ट्र राज्य वाहतूक सेनेचे गोविंद साबळे आणि महेश गुरव, जय भगवान ट्रान्सपोर्ट असोसिएशनचे राजेंद्र वणवे आणि काका कुतरवडे ही सर्व मंडळी उपस्थित होते.

Conclusion:आर्थिक मंदीमुळे अगोदरच आमचे ट्रान्सपोर्ट समेटाकुटीला आले आहेत. त्यातच द्रुतगती महामार्गावर अन्यायकारक टोल वसूल केला जात आहे. याव्यतिरिक्त अनेक ठिकाणी वाहनांना नो एंट्री करण्यात आली आहे. याशिवाय जेएनपीटी सारख्या परिसरात पार्किंग करिता जागा उपलब्ध नाही. यासह अनेक समस्या ने वाहतूक व्यवसाय ग्रासलेला आहे. परंतु याकडे संबंधित यंत्रणा दुर्लक्ष करीत आहे. या मागण्या न करता सर्व वाहतूकदार संघटनातील सभासदांनी आपली वाहने स्व-इच्छेने रस्त्यावर न आणण्याचा निर्णय घेतला आहे. – भरत पोखरकर, अध्यक्ष, महाराष्ट्र मोटार मालक संघटना

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.