ETV Bharat / state

रायगड : कामाचे आमिष दाखवून नाशिक येथील महिलेवर बलात्कार - raigad latest news

दुकानात काम देतो, असे सांगून नाशिक येथील महिलेवर एक वर्ष आधी बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे. महिलेच्या तक्रारीनंतर याप्रकरणी खालापूर पोलीस ठाण्यात दोन जणांवर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

rape of woman in nashik
रायगड : कामाचे आमिष दाखवून नाशिक येथील महिलेवर बलात्कार
author img

By

Published : Jun 6, 2021, 11:00 PM IST

Updated : Jun 6, 2021, 11:42 PM IST

रायगड - सोन्याच्या दुकानात काम देतो, असे सांगून नाशिक येथील महिलेवर एक वर्ष आधी बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे. महिलेच्या तक्रारीनंतर याप्रकरणी खालापूर पोलीस ठाण्यात दोन जणांवर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत मिळालेल्या माहिती नुसार ही घटना खालापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत 19 व 20 फेब्रुवारी 2020 च्या दरम्यान घडली.

एक वर्षाने गुन्हा दाखल -

कामाच्या शोधात असलेल्या नाशिक येथील महिलेला सोन्याच्या दुकानात काम देतो असे सांगून दोघांनी कारमध्ये बसवून आणले होते. दरम्यान, रस्त्याने जात असताना अंधाराचा फायदा घेत दोघांनी महिलेवर बलात्कार केला. त्यानंतर तिला विवस्त्र करत चित्रफीत काढली. तसेच याघटनेची वाच्यता केल्यास ही चित्रफीत सोशल मीडियावर शेयर करण्यात येईल, अशी धमकीही त्या दोघांनी महिलेला दिली. त्यामुळे या महिलेने या घटनेची तक्रार केली नाही. अखेर 5 जून रोजी या महिलेने खालापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला.

हेही वाचा - 'अंकल जी, राजभवनातल्या सोयऱ्या-धायऱ्यांसह दिल्लीला परत जा'; महुआ मोइत्रांची राज्यपालांवर खोचक टीका

Last Updated : Jun 6, 2021, 11:42 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.