ETV Bharat / state

रक्षाबंधन : खोपोलीत दिव्यांग विद्यार्थिंनींचा पोलीस दादाच्या कर्तुत्वाला राखी बांधून सलाम - शालोम एज्युकेशन सेटर संचलित सोफिया मतिमंद शाळा

खोपोली येथील शालोम एज्युकेशन सेटर संचलित सोफिया मतिमंद शाळेच्या विद्यार्थिनींनी खोपोली पोलीस ठाण्यात जाऊन अधिकारी व पोलीस कर्मचारी यांना राखी बांधली. यावेळी विद्यार्थिनींनी पोलिसांच्या कर्तुत्वाला सलामही केला.

रक्षाबंधन
रक्षाबंधन
author img

By

Published : Aug 23, 2021, 5:06 AM IST

रायगड : खोपोली येथील शालोम एज्युकेशन सेटर संचलित सोफिया मतिमंद शाळेच्या विद्यार्थ्यांनी खोपोली पोलीस ठाण्यात जाऊन अधिकारी व पोलीस कर्मचारी यांना राखी बांधली. यावेळी विद्यार्थिनींनी पोलिसांच्या कर्तुत्वाला सलामही केला.

रक्षाबंधन
रक्षाबंधन

पोलीस अधिकारी-कर्मचारी गेले भारावून

मतिमंद शाळेच्या अध्यक्षा रूपा मजेठीया यांच्या मार्गदर्शनाखाली खोपोली येथे मतिमंद मुलांची शाळा सुरू आहे. यामध्ये २७ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. मुख्याध्यापिका शुभा पाटणकर यांच्या मार्गदर्शनाखाली हा छोटासा सोहळा आयोजित करण्यात आला. या प्रसंगाने उपस्थित पोलीसवर्ग भारावून गेले. सहाय्यक पोलीस निरीक्षक सतीश अस्वर, पोलीस कर्मचारी अजिंक्य पाटील, गायकवाड इत्यादी पोलिस कर्मचारी यांना विद्यार्थिनींनी राखी बांधल्या. यावेळी शिक्षिका साक्षी पवार, मंजु बोडके, पालक वर्ग, जयकुमार म्हात्रे उपस्थित होते. बहिण-भावाचा जिव्हाळ्याचा असलेला हा सण अशा पद्धतीने साजरा झाल्याने सर्वांनी या उपक्रमाचे कौतुक केले.

हेही वाचा - रक्षाबंधन : जो राखीचे संरक्षण करू शकला नाही, तो बहिणीचे काय संरक्षण करणार? अशीही एक स्पर्धा, जिथे मेहुणी-वहिणी राखी...

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.