ETV Bharat / state

जिल्ह्यात दुपारनंतर पावसाला झाली सुरुवात - raigad rain news

17 मेच्या रात्री तौक्ते वादळ मुंबईकडे सरकले तरी रायगडमध्ये वादळाचा परिणाम जाणवत होता. जिल्ह्यात पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवलेली होती, आज दुपारनंतर पावसानेही हजेरी लावली असून वातावरणात गारवा निर्माण झाला आहे.

rain started in raigad in aftertnoon
जिल्ह्यात दुपारनंतर पावसाला झाली सुरुवात
author img

By

Published : May 19, 2021, 4:16 PM IST

Updated : May 19, 2021, 5:19 PM IST

रायगड - तौक्ते चक्रीवादळ आल्यानंतर जिल्ह्यातील वातावरणात बदल झाला आहे. वादळ निघून गेल्यानंतरही वारे वाहत आहे. जिल्ह्यात पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवलेली होती, आज दुपारनंतर पावसानेही हजेरी लावली असून वातावरणात गारवा निर्माण झाला आहे.

जिल्ह्यात दुपारनंतर पावसाला झाली सुरुवात
सकाळी ऊन दुपारनंतर पाऊसजिल्ह्यात आज तीन दिवसानंतर सकाळी रायगडकरांना सूर्यदर्शन झाले. मात्र दुपारनंतर अचानक वातावरणात बदल झाला असून मुसळधार पावसाला सुरूवात झाली आहे. त्यातच विजांचा कडकडाट होत आहे. अचानक सुरू झालेल्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.तौक्ते चक्रीवादळाचा परिणाम अजूनही सुरूच17 मेच्या पहाटे तौक्ते चक्रीवादळ हे रायगडच्या समुद्रात थडकले. त्यानंतर 30 तास वादळाने जिल्ह्यात थैमान घातले होते. सोसाट्याचा वारा आणि मुसळधार पाऊस सुरू झाला होता. त्यानंतर 17 मेच्या रात्री वादळ मुंबईकडे सरकले तरी वादळाचा परिणाम जाणवत होता. अजूनही वातावरण बदलत असून पावसाच्या सरी जिल्ह्यात पडत आहे. वाऱ्याचा जोर काही प्रमाणात कमी झाला असला तरीही वारे जोराने वाहत आहे. त्यामुळे वादळ निघून गेले असले तरी त्याचा परिणाम अजून जाणवत आहे.

Last Updated : May 19, 2021, 5:19 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.