ETV Bharat / state

रायगडच्या पर्यटनाला कोरोनाचा फटका - News about the Corona virus

कोरोनाच्या भीतीमुळे रागडच्या पर्यटनाला मोठा फटका बसला असून होळींच्या सुट्ट्यांसाठी पर्यटकांनी तयार केलेले बेत त्यांना रद्द करावे लागले आहेत. याचा फटका जिल्ह्यातील हॉटेल, रिसॉर्ट आणि समुद्र किनाऱ्यावरील व्यावसायिकांना बसला आहे.

Raigad's tourism business has declined due to the Korna virus
रायगडच्या पर्यटनाला कोरोना विषानूचा फटका
author img

By

Published : Mar 7, 2020, 4:33 PM IST

रायगड - कोरोनाच्या भीतीमुळे रायगडच्या पर्यटनाला मोठा फटका बसला आहे. शनिवारपासून लागोपाठ होळीची सुट्टी असल्याने अनेकांनी समुद्रकिनाऱ्यावर जाण्याचे बेत आखले. मात्र, कोरोनाच्या धसक्याने जिल्ह्यात येणाऱ्या पर्यटकांना हे सर्व बेत रद्द करावे लागले आहेत. रिसॉर्ट, हॉटेल, लॉजिंगमध्ये केलेले बुकिंग रद्द केले आहे. त्यामुळे कोरोना विषाणूचा फटका जिल्ह्यातील हजारो हॉटेल, रिसॉर्ट आणि समुद्र किनाऱ्यावरील व्यवसायिकांना बसला आहे. परदेशी नागरिकांना जिल्ह्यात नो एन्ट्री असल्याचे जिल्हा प्रशासनाने जाहीर केले आहे.

हेही वाचा - ऐतिहासिक चवदार तळ्याचे पाणी होणार स्वच्छ, जैव स्वच्छता पध्दतीचा वापर

दरवर्षी होळीच्या निमित्ताने बहरणारे समुद्रकिनारे यंदा सुनेसुने दिसण्याची शक्यता आहे. रायगड जिल्ह्यातील अलिबाग, मुरुड, वरसोली, काशिद, दिवेआगार, हरिहरेश्वर, श्रीवर्धनमधील समुद्रकिनारे धुलिवंदन आणि होळी सणाच्या निमित्त गर्दीने फुलून जातात. हॉटेल्स आणि रिसॉर्टमध्ये तर जागाही मिळत नाही. मुंबई, पुणे, ठाणे या भागातून अनेक कुटुंबे चार दिवस येणाऱ्या सुट्टीची संधी साधून आपल्या कच्च्याबच्च्यांसह पर्यटनासाठी जाणार होते. मात्र, या वेळेला कोरोनाच्या भीतीमुळे अनेकांनीबनवलेले प्लॅन रद्द केले आहेत. या पाश्वभूमीवर आरोग्य विभाग आणि प्रशासनाने गर्दीची ठिकाणे टाळा, असे आवाहनही केले आहे.

रायगडच्या पर्यटनाला करोना व्हायरसचा फटका

कोरोना विषानू संसर्गजन्य रोग असल्याने जिल्हा प्रशासनाकडून योग्य ती खबरदारी घेतली जात आहे. सुरक्षेच्या दृष्टीने जिल्हा प्रशासनाने पावले उचलली असून नागरिकही सतर्कता बाळगत असल्याने यावेळी होळीनिमित्त आणि सुट्टीमुळे जिल्ह्यात येणाऱ्या पर्यटकांची संख्या रोडावली आहे. याचा फटका हा हॉटेल व्यवसायिकांना बसला आहे.

हेही वाचा - अल्पवयीन गतिमंद मुलीवर अतिप्रसंग; रायगडमधील संतापजनक प्रकार

परदेशी नागरिकांना रायगडामध्ये नो एन्ट्री -

रायगडमध्ये पर्यटनाचा आनंद लुटण्यासाठी येणारे परदेशी पर्यटक रेडिसन ब्ल्यू, फाऊंटन, ट्रॉपिकाना या बड्या हॉटेलमध्ये वास्तव्य करत असतात. त्याचप्रमाणे काशिद येथील प्रकृती रिसॉर्ट, अलिबागच्या फर्न रिसॉर्टला परदेशी पर्यटकांचा ओघ असतो. मात्र, जिल्हा प्रशासनाने खबरदारी म्हणून परदेशी पर्यटकांना जिल्ह्यात येण्यास मज्जाव केला आहे. बोटीने येणाऱ्या पर्यटकांच्या तपासणीसाठी मांडवा जेट्टी येथे देखील विशेष पथक आरोग्य विभागाकडून नेमले जाणार आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.