ETV Bharat / state

जिल्ह्यातील पारंपरिक राजकीय विरोधक लोकसभा निवडणुकीत एकाच व्यासपीठावर - राष्ट्रवादी

२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत पुन्हा काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात आघाडी झाली आहे. आघाडीमधून सुनील तटकरे यांना उमेदवारी जाहीर झाली. शेकापही आघाडीत सामील झाला आहे.

तटकरे
author img

By

Published : Mar 30, 2019, 8:28 AM IST

रायगड - राजकीय लोकप्रतिनिधी फायद्यासाठी एकत्र येऊन आघाडी, युती करीत असतात. अशीच आघाडी रायगडमध्ये सध्या पाहायला मिळत आहे. एकमेकांचे पारंपरिक कट्टर राजकीय विरोधक असणारे काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व शेकाप पक्षाचे नेते एकाच व्यासपीठावर पाहण्याचा योग रायगडकर सध्या अनुभवत आहेत.

काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शेकाप पदाधिकारी व्यासपीठावर

२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत पुन्हा काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात आघाडी झाली आहे. आघाडीमधून सुनील तटकरे यांना उमेदवारी जाहीर झाली. शेकापही आघाडीत सामील झाला आहे. याबाबत, अलिबाग व पेणमधील काँग्रेस नेत्यांनी विरोध केला होता. पेणचे काँग्रेसचे माजी मंत्री रवींद्र पाटील यांनी भाजपात प्रवेश केला आहे. तर, अलिबागचे काँग्रेसचे माजी आमदार हे शेकापचे जयंत पाटील व राष्ट्रवादी काँग्रेसचे सुनील तटकरे यांच्यावर नाराज होते. मधुकर ठाकूर यांची नाराजी मिटविण्यात सुनील तटकरे यांना यश आले आहे. तर, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष व माजी आमदार माणिक जगताप हे सुद्धा तटकरे यांना निवडणुकीत मदत करण्यास सरसावले आहेत.

लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने काँग्रेसचे माणिक जगताप, मधुकर ठाकूर, शेकापचे आमदार जयंत पाटील, आमदार पंडित पाटील, माजी आमदार मीनाक्षी पाटील, सुनील तटकरे यांच्यासह काँग्रेस, शेकाप, राष्ट्रवादी पदाधिकारी, कार्यकर्ते एकत्र व्यासपीठावर तसेच सुनील तटकरेचा प्रचार करताना जिल्ह्यात दिसत आहेत.

जिल्ह्यात शेकाप हा काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना यांचा १ नंबरचा राजकीय शत्रू मानला जातो. शेकापचे सरचिटणीस आमदार जयंत पाटील यांचे राज्याच्या राजकारणात मोठे वजन असल्याने त्यांना शह देणे आजपर्यत कोणालाच जमलेले नाही. अलिबागचे काँग्रेसचे माजी आमदार मधुकर ठाकूर हे नेहमी शेकापवर आरोप करत असतात. तर, सुनील तटकरे हे सुद्धा शेकापच्या विरोधात होते. मात्र, रायगड जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे सुनील तटकरे व शेकापचे जयंत पाटील यांच्यात मनोमिलन झाले होते. त्यानंतर, रायगड जिल्हा परिषदेत दोन्ही पक्षाची सत्ता आली होती.

जिल्ह्यातील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शेकाप यांच्यातील नेत्यांची आघाडी झाली आहे. परंतु, कार्यकर्ते ही आघाडी कितपत स्वीकारतील हे मात्र २५ मे च्या लोकसभा निकालानंतर कळणार आहे. मात्र तूर्तास तरी राजकारणाच्या या लढाईत एकमेकांचे शत्रू असणारे नेते एकत्र आल्याने जिल्ह्यात चर्चा होत आहे.

Intro:जिल्ह्यातील पारंपरिक राजकीय विरोधक लोकसभा निवडणुकीत दिसत आहेत एकाच व्यासपीठावर

काँग्रेस, शेकाप, राष्ट्रवादी काँग्रेस नेत्यांमध्ये झाले मनोमिलन

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस सुनील तटकरे यांची किमया
रायगड : राजकारणात कोण कुणाचा शत्रू व मित्र होईल याचे भाकीत कोणताही भविष्यकार सांगू शकणार नाही. राजकीय लोकप्रतिनिधी मात्र आपल्या फायद्यासाठी एकत्र येऊन आघाडी, युती करीत असतात. अशीच आघाडी रायगडमध्ये सध्या पाहायला मिळत असून एकमेकांचे पारंपरिक कट्टर राजकीय विरोधक असणारे काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व शेकाप पक्षाचे नेते एकाच व्यासपीठावर पाहण्याचा योग रायकडकर सध्या अनुभवत आहेत. हा योग जुळून आणला आहे तो राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस व आघाडीचे लोकसभेचे उमेदवार सुनील तटकरे यांनी. त्यामुळे आगामी काळात ही आघडी अशीच टिकून राहणार की नाही हे लोकसभा निवडणुकीनंतर कळणार आहे.

जिल्ह्यात शेकाप हा काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना यांचा एक नंबरचा राजकीय शत्रू म्हणून मानला जातो. शेकापचे सरचिटणीस आमदार जयंत पाटील यांचे राज्याच्या राजकारणात मोठे वजन असल्याने त्यांना शह देणे आजपर्यत कोणालाच जमलेले नाही. अलिबागचे काँग्रेसचे माजी आमदार मधुकर ठाकूर हे नेहमी शेकापवर आरोप करीत असतात. तर सुनील तटकरे हे सुद्धा शेकापच्या विरोधात पूर्वी होते. मात्र राजीपच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे सुनील तटकरे व शेकापचे जयंत पाटील यांच्यात मनोमिलन झाले. त्यानंतर रायगड जिल्हा परिषदेत दोन्ही पक्षाची सत्ता आली.

Body:2019 च्या लोकसभा निवडणुकीत पुन्हा काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात आघाडी झाली असून आघडी मधून सुनील तटकरे याना उमेदवारी जाहीर झाली.. या आघाडीत शेकापही सामील झाले आहे. याबाबत अलिबाग व पेण मधील काँग्रेस नेत्यांनी विरोध केला होता. पेणचे काँग्रेसचे माजी मंत्री रवींद्र पाटील यांनी भाजपात प्रवेश केला आहे. तर अलिबागचे काँग्रेसचे माजी आमदार हे शेकापचे जयंत पाटील व राष्ट्रवादी काँग्रेसचे सुनील तटकरे यांच्यावर नाराज होते. मात्र मधुकर ठाकूर याची नाराजी मिटविण्यात सुनील तटकरे याना यश आले आहे. तर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष व माजी आमदार माणिक जगताप हे सुद्धा तटकरे याना निवडणुकीत मदत करण्यास सरसावले आहेत.

Conclusion:आघाडीचे लोकसभा उमेदवार सुनील तटकरे यांनी काँग्रेस व शेकाप नेत्यांना एकत्र आणून किमया केली आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने काँग्रेसचे माणिक जगताप, मधुकर ठाकूर, शेकापचे आ. जयंत पाटील, आ. पंडित पाटील, माजी आमदार मीनाक्षी पाटील, सुनील तटकरे यांच्यासह काँग्रेस, शेकाप, राष्ट्रवादी पदाधिकारी, कार्यकर्ते एकत्र व्यासपीठावर तसेच सुनील तटकरेचा प्रचार करताना जिल्ह्यात दिसत आहेत.

जिल्ह्यातील ही काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शेकाप यांच्यातील नेत्याची आघाडी झाली असली तरी कार्यकर्ते ही आघाडी कितपत स्वीकारतील हे मात्र 25 मे च्या लोकसभा निकालानंतर कळणार आहे. मात्र तूर्तास तरी राजकारणाच्या या लढाईत एकमेकांचे शत्रू असणारे नेते एकत्र आल्याने जिल्ह्यात चर्चेला वाव मिळत आहे.
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.