रायगड : मुसळधार पावसामुळे बुधवारी रात्री रायगड जिल्ह्यातील इरशाळवाडीवर (इर्शाळगड ) येथे दरड कोसळल्याची घटना घडली. यामध्ये 100 पेक्षा जास्त लोक अडकले असल्याचे सांगितले जाते आहे. माध्यमांकडे आलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत 22 लोकांना रेस्क्यू करण्यात आले आहे. तर दरड कोसळल्यामुळे 10 जणांचा मृत्यू झाला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे घटनास्थळी पोहोचले असून त्यांनी मृत्यूमुखी पडलेल्या नागरिकांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत जाहीर केली आहे. मृतांच्या नातेवाईकांना 5 लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर करण्यात आली आहे. तसेच जखमींच्या उपचारांचा सर्व खर्च सरकार करणार असल्याचेही मुख्यमंत्री म्हणाले. दरम्यान या दुर्घटनेची माहिती घेण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना फोन केला आहे.
रायगड जिल्ह्यातील इरशाळवाडीवर येथे दरड कोसळल्याची घटना घडली असून यामध्ये 100 पेक्षा जास्त लोक अडकले असल्याचे सांगितले जाते आहे. आतापर्यंत 22 लोकांना रेस्क्यू करण्यात आले आहे. खालापूर पोलीस ठाणे हद्दीत चौक जवळील चौक दूरशेत्र येथे तात्पुरते कंट्रोल रूम तयार करण्यात आले आहे. त्या ठिकाणी एपीआय काळसेकर यांची नेमणूक करण्यात आली आहे. त्यांचा मोबाईल नंबर 8108195554 असा आहे.
-
Maharashtra | An incident of landslide reported at Irshalwadi village in Khalapur tehsil in Raigad District, two teams of NDRF have been moved: NDRF
— ANI (@ANI) July 19, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Maharashtra | An incident of landslide reported at Irshalwadi village in Khalapur tehsil in Raigad District, two teams of NDRF have been moved: NDRF
— ANI (@ANI) July 19, 2023Maharashtra | An incident of landslide reported at Irshalwadi village in Khalapur tehsil in Raigad District, two teams of NDRF have been moved: NDRF
— ANI (@ANI) July 19, 2023
90 टक्के वाडी दरडीखाली : चौक गावापासून 6 किमी डोंगर भागात मोरबे धरणाच्यावरील भागात आदिवासी वाडी आहे. ही दरड येथील रहिवासी घरांवर कोसळली असून 90 % वाडी ढिगाऱ्याखाली गेल्याचे सांगण्यात येत आहे. रात्री साडेदहा ते 11 वाजण्याच्या सुमारास दरड कोसळल्याची घटना घडली आहे. दरम्यान या वाडीमध्ये 50 ते 60 आदिवासी घरांची मोठी वस्ती होती. या गावात 30 ते 40 घरातील लोक या दरडीत अडकली आहेत. दरम्यान सतत सुरू असलेला पाऊस आणि दरड कोसळ्याच्या घटनांमुळे येथील मदत कार्यात अडचणी निर्माण होत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, 22 जणांना वाचवण्यात आले आहे. दरड कोसळल्याची घटना घडल्याचे कळाल्यानंतर बचाव कार्य सुरू झाले आहे. घटनास्थळी चार रुग्णवाहिका पोहोचल्या आहेत. पोलिसांनी सांगितले की, त्यांनी आतापर्यंत 22 जणांना घटनास्थळावरून वाचवले आहे, मात्र अनेकजण ढिगाऱ्याखाली अडकले असावेत, अशी शक्यता आहे.
-
#WATCH | Maharashtra: Rescue operation underway by NDRF after a landslide occurred in Irshalwadi village of Khalapur tehsil of Raigad district.
— ANI (@ANI) July 20, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
According to the Raigad police, four people have died and three others have been injured. pic.twitter.com/z14SKMjyuK
">#WATCH | Maharashtra: Rescue operation underway by NDRF after a landslide occurred in Irshalwadi village of Khalapur tehsil of Raigad district.
— ANI (@ANI) July 20, 2023
According to the Raigad police, four people have died and three others have been injured. pic.twitter.com/z14SKMjyuK#WATCH | Maharashtra: Rescue operation underway by NDRF after a landslide occurred in Irshalwadi village of Khalapur tehsil of Raigad district.
— ANI (@ANI) July 20, 2023
According to the Raigad police, four people have died and three others have been injured. pic.twitter.com/z14SKMjyuK
-
महाराष्ट्रातील रायगड येथे अतिवृष्टीमुळे झालेल्या भूस्खलनाबाबत मुख्यमंत्री श्री @mieknathshinde यांच्याशी बोलणं केलं आहे. NDRF च्या 4 टीम घटनास्थळी पोहोचल्या आहेत आणि स्थानिक प्रशासनासह बचाव कार्यात युद्ध पातळीवर सुरू आहे. लोकांना घटनास्थळावरून बाहेर काढणे आणि जखमींवर तातडीने…
— Amit Shah (@AmitShah) July 20, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">महाराष्ट्रातील रायगड येथे अतिवृष्टीमुळे झालेल्या भूस्खलनाबाबत मुख्यमंत्री श्री @mieknathshinde यांच्याशी बोलणं केलं आहे. NDRF च्या 4 टीम घटनास्थळी पोहोचल्या आहेत आणि स्थानिक प्रशासनासह बचाव कार्यात युद्ध पातळीवर सुरू आहे. लोकांना घटनास्थळावरून बाहेर काढणे आणि जखमींवर तातडीने…
— Amit Shah (@AmitShah) July 20, 2023महाराष्ट्रातील रायगड येथे अतिवृष्टीमुळे झालेल्या भूस्खलनाबाबत मुख्यमंत्री श्री @mieknathshinde यांच्याशी बोलणं केलं आहे. NDRF च्या 4 टीम घटनास्थळी पोहोचल्या आहेत आणि स्थानिक प्रशासनासह बचाव कार्यात युद्ध पातळीवर सुरू आहे. लोकांना घटनास्थळावरून बाहेर काढणे आणि जखमींवर तातडीने…
— Amit Shah (@AmitShah) July 20, 2023
"दिवस उजाडल्यावर आम्हाला परिस्थितीची चांगली कल्पना येईल. सध्या पोलीस आणि जिल्हा प्रशासनातील 100 हून अधिक लोक बचाव कार्यात गुंतले आहेत आणि आम्हाला NDRF, स्थानिक आणि काही स्वयंसेवी संस्थांकडूनही मदत मिळत आहे," -रायगड पोलीस अधिकारी
इरसाळवाडी गावावर दरड कोसळल्याची माहिती मिळताच मंत्री उदय सामंत, गिरीश महाजन, दादा भुसे आणि महेश बालदी यांनी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रायगड जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क साधून घटनेचा आढावा घेतला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे घटनास्थळी पोहोचले आहेत.
-
Landslide in Raigad | CM Eknath Shinde has announced that Rs 5 lakh each will be given to the families of the deceased and the government will bear the cost of treatment of the injured: Maharashtra CMO https://t.co/r26rmMtmHm pic.twitter.com/a7p4hSPs1z
— ANI (@ANI) July 20, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Landslide in Raigad | CM Eknath Shinde has announced that Rs 5 lakh each will be given to the families of the deceased and the government will bear the cost of treatment of the injured: Maharashtra CMO https://t.co/r26rmMtmHm pic.twitter.com/a7p4hSPs1z
— ANI (@ANI) July 20, 2023Landslide in Raigad | CM Eknath Shinde has announced that Rs 5 lakh each will be given to the families of the deceased and the government will bear the cost of treatment of the injured: Maharashtra CMO https://t.co/r26rmMtmHm pic.twitter.com/a7p4hSPs1z
— ANI (@ANI) July 20, 2023
अग्निशमन दलाच्या जवानाचा मृत्यू : अंधार आणि पावसामुळे माती निसरडी झाल्याने मदत पथकाला बचावकार्यात अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. घटनास्थळी जात असताना एका अग्निशमन दलाच्या जवानाचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. घटनास्थळी पोहोण्यासाठी मुसळधार पाऊस आणि मोठ्या प्रमाणावर असलेले धुक्यामुळे बचाव पथकाला बचावकार्यात अडचणी येत आहे. १९ जुलैला रात्री अकरा वाजेपर्यंतच्या माहितीनुसार रायगड जिल्ह्यातील सावित्री, अंबा, पाताळगंगा व कुंडलिका या नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे.
माळीणची पुनरावृत्ती : इरसाळवाडीवर काल रात्री दरड कोसळल्याची घटना घडली. या दरडीखाली 30 ते 40 घरे दबल्याचा अंदाज आहे. हा आदिवासी पाडा असून यथे साधारण 250 लोकं राहात असल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान इरसाळवाडीवर दरड कोसळल्याची घटना घडल्यानंतर माळीणची घटना आठवू लागली आहे. माळणीमध्येही भूस्खलन होऊन संपूर्ण गाव मातीच्या ढिगाऱ्याखाली दबले होते. माळीणची घटना वर्ष 2014 मध्ये घडली होती.
हेही वाचा -