ETV Bharat / state

रायगडच्या रिलायन्स गॅस पाईपलाईन बाधीत शेतकऱ्यांचा अर्धनग्न आंदोलनाचा इशारा - अर्धनग्न आंदोलन

रायगडमधील रिलायन्स पाईपलाईनमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांनी समान हमीभाव न मिळाल्यास अर्धनग्न आंदोलनाचा इशारा दिला आहे. जर हमीभाव मिळाला नाही तर सीएसटी ते मंत्रालय अर्धनग्न आंदोलन करणार, असे या शेतकऱ्यांनी सांगितले आहे.

रायगडच्या रिलायन्स गॅस पाईपलाईन बाधीत शेतकऱ्यांचा अर्धनग्न आंदोलनाचा इशारा
author img

By

Published : Jul 30, 2019, 6:39 PM IST

मुंबई - रिलायन्स गॅस कंपनीने अल्प दरात जमिनी संपादित केल्याचा आरोप रायगड जिल्ह्यातील स्थानिक शेतकऱ्यांनी केला आहे. याच पार्श्वभूमीवर पेन, खालापूर येथील प्रकल्प बाधित शेतकऱ्यांनी मंगळवारपासून आझाद मैदान येथे आंदोलन सुरू केले आहे. जोपर्यंत आपल्याला न्याय मिळणार नाही, तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही, असा इशारा या शेतकऱ्यांनी दिला आहे.

रायगडच्या रिलायन्स गॅस पाईपलाईन बाधीत शेतकऱ्यांचा अर्धनग्न आंदोलनाचा इशारा

रायगडमधील पेन, खालापूर येथील 240 शेतकरी या रिलायन्स गॅस लाईन कंपनीच्या पाईपलाईन प्रकल्पात बाधित झालेले आहेत. त्या शेतकऱ्यांना कमी जमीनभाव दिलेला आहे. त्यामुळे विविध मागण्या घेऊन हे शेतकरी आपल्या प्रकल्पग्रस्त संघटनेच्या मार्फत व शेतकरी विष्णू पाटील यांचा नेतृत्वाखाली आझाद मैदानात आंदोलनासाठी आले आहेत. शासनाने व रिलायन्स कंपनीने जर बाधीत शेतकऱ्यांच्या मागण्यांना दाद दिली नाही तर पुढील काळात हे आंदोलन अधिक तीव्र करणार. तसेच सीएसटी ते मंत्रालय असे अर्धनग्न आंदोलन करणार आहोत, असे विष्णू पाटील यांनी सांगितले आहे.

काय आहे रिलायन्स गॅस पाईपलाईन प्रकरण?

रायगडमध्ये रिलायन्सले गॅस पाईपलाईन प्रकल्प राबवताना शेतकऱ्यांना लेखी हमीपत्र देऊन वाजवी मोबदला दिलेला नाही. मोबदला देताना सर्वसमान हे तत्व असायला हवे, ते तत्वही पाळले गेले नाही. तसेच ज्या शेतकऱ्यांनी आपल्या शेतातून पाईपलाईन जात असताना विरोध केला तेव्हा त्यांच्यावर गुन्हे टाकण्यात आले आहेत. हा अन्याय आहे, त्यामुळे सर्वांनाच समान मोबदला मिळावा या प्रमुख मागणीसह अन्य मागण्यांसाठी आंदोलन करण्यात येत आहे.

Intro: रिलायन्स पाईपलाईन बाधित शेतकरयांचे समान हमी भाव मिळावा यासाठी आंदोलन; जर भाव मिळाला नाही तर सीएसटी ते मंत्रालय अर्धनग्न तीव्र आंदोलन करणार रिलायन्स गॅस लाईन कंपनीने अल्पदरात शेतीचा मोबदला देऊन दडपशाहीने जमिनीची संपादित केले आहेत. त्याच्या निषेधार्थ अनेकदा उपोषण आंदोलन करून सुद्धा शासनाने व कंपनीने अद्याप कोणतीही दखल घेतली नाही .तर याचा निषेधार्थ आज रायगड जिल्ह्यातील पेन, खालापूर येथील प्रकल्प बाधित शेतकरी आज आझाद मैदान येथे न्याय मिळण्यासाठी भर पावसात आपली शेतीची कामे थांबवून आंदोलन केले आहे.आणि जोपर्यंत आपल्याला न्याय मिळणार नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही असे शेतकरी सांगत आहेत.

Body:या मागण्या रिलायन्स गॅस लाईन ही महाराष्ट्र ते गुजरात या ठिकाणी करण्यात येणार आहे त्यामध्ये रायगड मधील पेन खालापूर येथील 240 शेतकरी या रिलायन्स गॅस लाईन कंपनीच्या पाईपलाईन प्रकल्पात बाधित झालेले आहेत त्या शेतकऱ्यांना प्रत्येकी कमी जास्त जमीन भाव दिलेला आहे त्यामुळे त्यांचा त्याला विरोध आहे तसेच आधी विविध मागण्या घेऊन ते आज शेतकरी संघटना व बाधित शेतकरी विष्णू पाटील यांचा नेतृत्वाखाली आझाद मैदानात आंदोलनासाठी आले आहे.जर शासनाने व रिलायन्स कंपनीने बाधीत शेतकऱ्यांचा मागण्याना दाद दिली नाही तर पुढील काळात हे आंदोलन तीव्र करत सीएसटी ते मंत्रालय अर्ध नग्न आंदोलन करणार आहेत असे विष्णू पाटील यांनी सांगितले.

Conclusion:रिलायन्स गॅस लाईन प्रकल्प राबवताना शेतकऱ्यांना लेखी हमीपत्र देऊन वाजवी मोबदला दिलेला नाही .मोबदला देताना सर्वसमान हे तत्व आहे हे तत्व पाळले नाही .तसेच ज्या शेतकऱ्यांनी आपल्या शेतातून पाईपलाईन जात असता यावर विरोध केला तेव्हा त्यांच्यावर गुन्हे टाकण्यात आले आहेत.त्यामुळे शेतकरी मानसिक त्रासात आहेत.त्यांना काहीच मोबदला दिलेला नाही हा अन्याय आहे त्यामुळे सर्वांनाच समान मोबदला मिळावा ही प्रमुख मागणी करत हे आंदोलन करण्यात आलेला आहे.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.