ETV Bharat / state

रायगड : माथेरान पर्यटन खुले करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांचे संकेत

author img

By

Published : Jun 8, 2021, 8:46 PM IST

जिल्हाधिकारी कार्यालयात माथेरानचे पर्यटन सुरू करण्याकरिता चर्चा करण्यात आली. यावेळी जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी रायगड जिल्ह्यातील परिस्थिती लक्षात घेऊन नियम अटींचे काटेकोर पालन करून आपले माथेरान पर्यटनासाठी खुले करण्यासाठी योग्यरीत्या खबरदारी घेऊन येत्या १५ जूनपर्यंत निर्णय घेतला जाईल, असे स्पष्ट संकेत दिले आहेत.

रायगड : माथेरान पर्यटन खुले करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांचे संकेत
रायगड : माथेरान पर्यटन खुले करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांचे संकेत

रायगड : कोविड महामारीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी "ब्रेक द चैन" अमलात आणल्याने सरकारकडून कडक लॉकडाऊन घोषित करण्यात आला होता. यामुळे अनेक पर्यटनस्थळांवरील व्यवसायावर संक्रांत आली. मुंबई पुण्यापासून अगदी जवळचे थंड हवेचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध असलेले माथेरान गेल्या काही महिन्यापासून पर्यटनासाठी बंद आहे. यामुळे येथील छोट्या मोठ्या व्यवसायिकांना उदरनिर्वाह चालवणे कठीणच होऊन बसले आहे.

माथेरान पर्यटन सुरू झाल्यास अनेकांना मिळणार रोजगार
सध्या माथेरानमधील कोरोना रूग्ण संख्या कमी झाल्याने माथेरान पर्यटनस्थळाचे प्रवेशद्वार पर्यटकांसाठी खुले करावे यासाठी माथेरानच्या नगराध्यक्षा प्रेरणा सावंत यांनी रायगडच्या जिल्हाधिकारी निधी चौधरी यांची अलिबाग येथे भेट घेतली.

माथेरान पर्यटनासाठी सुरू करण्याची नगराध्यक्षा प्रेरणा सावंत यांची मागणी
यावेळी नगराध्यक्षा प्रेरणा सावंत यांनी माथेरानचे पर्यटन लवकरच सुरू करण्याच्या दृष्टीने जिल्हा प्रशासनाने पाऊले उचलावीत अशा प्रकारची मागणी जिल्हाधिकारी निधी चौधरी यांच्याकडे २ जून रोजी निवेदनाद्वारे केली होती. यानुसार दि.८ रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात माथेरानचे पर्यटन सुरू करण्याकरिता चर्चा करण्यात आली. यावेळी जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी रायगड जिल्ह्यातील परिस्थिती लक्षात घेऊन नियम अटींचे काटेकोर पालन करून आपले माथेरान पर्यटनासाठी खुले करण्यासाठी योग्यरीत्या खबरदारी घेऊन येत्या १५ जूनपर्यंत निर्णय घेतला जाईल, असे स्पष्ट संकेत दिले आहेत. यावेळी गटनेते तथा बांधकाम सभापती प्रसाद सावंत तसेच माथेरान नगरपरीषदेचे वरीष्ठ लिपीक रत्नदीप प्रधान उपस्थित होते.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.