ETV Bharat / state

रायगड : शासनाकडून ५० कोटींचा वाढीव निधी जिल्हा प्रशासनाला प्राप्त - raigad 50 crore extra help

निसर्ग चक्रीवादळात नुकसान झालेल्या नागरिकांच्या घराच्या पडझडीसाठी, भांडी, कपडे, मच्छीमार यांना पूर्वीच्या निकषात बदल करून वाढीव मदत देण्याचा निर्णय शासनाने घेतला होता. त्यानुसार शासनाने 50 कोटी वाढीव निधी हा जिल्हा प्रशासनाकडे वर्ग केल्याने नुकसानग्रस्तांच्या खात्यात आता आठवड्याभरात वाढीव मदत मिळण्यास सुरुवात होणार आहे.

रायगड
रायगड
author img

By

Published : Aug 15, 2020, 2:07 PM IST

रायगड - निसर्ग चक्रीवादळात नुकसान झालेल्या नागरिकांच्या घराच्या पडझडीसाठी, भांडी, कपडे, मच्छीमार यांना पूर्वीच्या निकषात बदल करून वाढीव मदत देण्याचा निर्णय शासनाने घेतला होता. यासाठी 50 कोटीच्या निधीची वाढीव गरज शासनाकडून जिल्हा प्रशासनाला प्राप्त न झाल्याने नुकसानग्रस्त नुकसान भरपाईपासून वंचित राहिले होते. शासनाने 50 कोटी वाढीव निधी हा जिल्हा प्रशासनाकडे वर्ग केल्याने नुकसानग्रस्थांच्या खात्यात आता आठवड्याभरात वाढीव मदत मिळण्यास सुरुवात होणार आहे. अशी माहिती जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी दिली आहे.

3 जून रोजी आलेल्या निसर्ग चक्रीवादळात जिल्ह्यातील दोन लाख घराचे नुकसान झाले होते. चक्रीवादळ नंतर राज्य शासनाने त्वरित पावले उचलून पावणे चारशे कोटी रुपये जिल्हा प्रशासनाकडे वर्ग केले. यातील पावणे तीनशे कोटी रुपये हे घराच्या नुकसानीसाठी देण्यात आले होते. त्यानुसार जिल्हा प्रशासनाने घराच्या पडझड झालेल्या नुकसानग्रस्तांना 203 कोटींची नुकसान भरपाईचे वाटप केले आहे.

राज्य शासनाच्या झालेल्या कॅबिनेट बैठकीत नुकसानग्रस्थांना वाढीव मदत देण्याचा निर्णय घेतला होता. पूर्वी अशंतः आणि पूर्णतः अशा दोन निकषांनुसार शासकीय मदत दिली जात होती. मात्र, आता 25 टक्के आणि 50 टक्के घरांचे नुकसान झालेल्या आपदग्रस्तांना वाढीव मदत दिली जाणार होती. मात्र, त्यासाठी 21 कोटी रुपयांचा निधीची आवश्यक होती.

कपडे, भांडी नुकसानीसाठी 37 कोटीची गरज असताना 9 कोटी निधी उपलब्ध झाला होता. तर 28 कोटीच्या निधीची अजून गरज होती. मच्छीमारांच्या नुकसानीसाठी 1 कोटींची गरज होती. त्यापैकी मत्स्य विभागला 20 लाख निधी प्राप्त झाला होता. तर 80 लाख निधीची प्रतीक्षा होती. वाढीव असलेला 50 कोटी निधी राज्य शासनाकडून प्राप्त न झाल्याने नुकसानग्रस्थांचे वाढीव निधी वाटप रखडले होते. मात्र, राज्य शासनाने 50 कोटी वाढीव निधी जिल्हा प्रशासनाकडे वर्ग केला आहे. त्यामुळे नुकसानग्रस्थांचे रखडलेली नुकसान भरपाई सुरू करण्यात आली आहे.

राज्य शासनाने जिल्ह्यातील नुकसानग्रस्थांचा वाढीव निधी दिल्याने नागरिकांच्या खात्यात आता भरपाई जमा होण्यास सुरुवात होणार आहे. राज्य शासनाने जुन्या निकषात बदल करून वाढीव मदत नुकसानग्रस्थांना देण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार 50 कोटींच्या वाढीव निधीची गरज होती. याबाबत शासनाला कळविण्यात आले होते. शासनाने तातडीने 50 कोटी निधी प्रशासनाकडे वर्ग केला आहे. तहसीलदारमार्फत यादी तयार करून आठवड्याभरात नुकसानग्रस्थाच्या खात्यात पैसे जमा केले जातील.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.