अन्वय नाईक आत्महत्या प्रकरण : पोलिसांची पुनर्विचार याचिका योग्यच, न्यायालयाचा निर्वाळा - अर्णब गोस्वामी अपडेट
रायगड पोलिसांनी जिल्हा सत्र न्यायालयात केलेल्या पुनर्विचार याचिकेवर सुनावणी आज सुरू झाली आहे. आरोपी नितेश सरडा यांच्या वकिलांनी पुनर्विचार याचिका ही मेंटेनेबल आहे का, याबाबत सोमवारी अर्ज करून युक्तिवाद केला होता. याबाबतचा निर्णय न्यायालयाने राखून ठेवला होता. सकाळी न्यायालयात सुनावणी सुरू झाल्यानंतर न्यायालयाने आरोपी वकिलांचा अर्ज फेटाळला आहे.

रायगड - पोलिसांनी जिल्हा सत्र न्यायालयात केलेली पुनर्विचार याचिका मेंटेनेबल आहे, का याबाबत आरोपी पक्षातर्फे केलेला अर्ज जिल्हा सत्र न्यायालयाने फेटाळला आहे. नितेश सरडा यांच्या वकिलांनी हा अर्ज केला होता. त्यावर काल नितेश सरडा याच्या वकिलांनी युक्तिवाद केला होता. याबाबतचा निकाल न्यायालयाने राखून ठेवला होता. तो आज न्यायालयाने निकाली काढला आहे. त्यामुळे पुनर्विचार याचिकेवर थोड्या वेळात सुनावणी सुरू होणार आहे.
तीन दिवसांपासून पुनर्विचार याचिकेवर सुनावणी सुरू -
अर्णब गोस्वामी, नितेश सरडा आणि फिरोज शेख याना मिळालेल्या न्यायालयीन कोठडीबाबत रायगड पोलिसांनी जिल्हा सत्र न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल केली होती. यावर तीन दिवसांपासून जिल्हा सत्र न्यायाधीश आर जे मल्लशेट्टी यांच्यासमोर सुनावणी सुरू आहे.
न्यायालयाने आरोपीच्या वकिलांचा अर्ज फेटाळला -