आरसीसी कन्सल्टंट बाहुबली धामणेसह पाच जणांवर गुन्हा दाखल होताच महाड पोलिसांनी धामणेला मुंबईतून अटक केली. आज त्याला माणगाव न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने 30 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
LIVE : आतापर्यंत १६ जणांचा मृत्यू; बांधकाम व्यावसायिक फारुक काझीवर मनुष्यवधाचा गुन्हा
15:06 August 26
आरसीसी कन्सल्टंट बाहुबली धामणेला 30 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी
12:19 August 26
फारुक काझी याच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा नोंद
महाड इमारत दुर्घटना घडल्यानंतर सरकारने चौकशीचे आदेश दिले आहेत. मात्र, या इमारतीचा बांधकाम व्यवसायिक फारूक काझी फरार झाला आहे. तसेच पोलिसांनी सध्या काझी याच्या मुलाची चौकशी सुरू केली आहे. त्याच्याकडून फारूक काझी सध्या कोणत्या ठिकाणी आहे याची माहिती मिळवण्याचा प्रयत्न सुरू आहे. पोलिसांनी या इमारत दुर्घटने प्रकरणी फारुक काझी याच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा नोंद केला आहे.
12:13 August 26
मातीच्या ढिगाऱ्याखाली अडकला संसार, वस्तू शोधण्यासाठी रहिवाशांची धडपड
महाड येथील पाच मजली इमारत कोसळल्यानंतर अनेक संसार उद्धवस्त झाले. या दुर्घटनेत एकूण १६ जणांचा मृत्यू झाला, तर २ जणांना वाचविण्यात यश आले आहे. दुर्घटनेनंतर ३८ तास सुरू असलेले बचाव कार्य आज सकाळी १० वाजताच्या सुमारास थांबले. मात्र, या मातीच्या ढिगाऱ्याखाली अनेकांचे संसार अडकून पडले. या कोसळल्या इमारतीच्या ढिगारा उपसण्याचे काम सुरू आहे. मात्र, दुसरीकडे विखरुलेला संसार गोळा करण्यासाठी या इमारतीमधील रहिवाशांची धडपड आज या ठिकाणी पाहायला मिळाली आहे. अनेक जन आपआपले संसारपयोगी साहित्या या ढिगाऱ्यातून शोधून घेऊ लागले आहे.
11:23 August 26
महाड इमारत दुर्घटनेतील मृतांचा आकडा १६ वर; शेजारच्या इमारतीमधील एक दगावला
महाडमध्ये इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेत मृतांचा आकडा १६ वर गेला आहे. तारिक गार्डन ही इमारत कोसळल्यानंतर शेजारच्या इमारतीमधील एका रहिवासी जखमी झाला होता. त्यानंतर त्याला हृदय विकाराचा झटका आल्याने त्याचा ही मृत्यू झाला आहे.
10:06 August 26
शोध कार्य थांबवले; ढिगारा उपसण्याचे काम सायंकाळपर्यंत सुरूच राहणार
सोमवारी रायगड जिल्ह्यातील महाडमध्ये पाच मजली इमारत कोसळली होती. त्यानंतर एनडीआरएफकडून तत्काळ शोध व बचाव कार्य हाती घेण्यात आले होते. तब्बल ३८ तासांहून अधिक काळ चाललेल्या या शोध आणि बचाव कार्य सकाळी १० वाजताच्या सुमारास थांबविण्यात आले आहे. बचाव पथकाकाडून सोमवार पासून दिवसरात्र बचाव कार्य सुरू होते. या शोध मोहिमेत एनडीआरएफच्या पथकाने २ जणांना इमारतीच्या ढिगाऱ्यातून सुखरूप बाहेर काढले आहे. प्रशासनाच्या माहितीनुसार अडकलेल्या सर्व व्यक्तींना बाहेर काढण्यात आले आहे. अडकलेल्या व्यक्तीचा शोध कार्य आता थांबविले असले तरी सायंकाळपर्यंत येथील मातीचा ढिगारा काढण्याचे काम सुरू राहणार असल्याचे जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी सांगितले.
09:27 August 26
महाड इमारत दुर्घटनेतील मृतांचा आकडा १५ वर; महिलेचा मृतदेह सापडला
महाड इमारत दुर्घटनेतील बचावकार्यात एका महिलेचा मृतदेह हाती लागला आहे. कामरून अन्सारी (80) असे त्या मृत महिलेचे नाव आहे. या दुर्घटनेतील एकूण मृतांचा आकडा आता १५ झाला आहे. सुमारे 38 तासापासून हे बचावकार्य सुरू होते. या दुर्घटनेतून २ जणांचा जीव वाचविण्यात बचाव पथकाला यश आले आहे. गेल्या 38 तासापासून दिवसरात्र ढिगारा हटवण्याचे काम सुरू होते. बुधवारी सकाळी २ जणांचा इमारतीच्या ढिगाऱ्यात शोध सुरू होता. दुर्दैवाने दोघांचाही मृत्यू झाला असून दोन्ही मृतदेह बाहेर काढले आहेत.
08:08 August 26
06:26 August 26
महाड इमारत दुर्घटनेतील मृतांचा आकडा 14 वर, एकाचा शोध सुरूच
रायगड - महाड येथील इमारत दुर्घटनेला ३६ तास उलटून गेले आहेत. एनडीआरएफकडून अद्यापही बचावकार्य सुरूच आहे. या दुर्घटनेत बुधवारी सकाळपर्यंत १४ जणांचा मृत्यू झाला आहे, तर आणखी एक जण ढिगाऱ्याखाली अडकला असून त्याचे शोधकार्य सुरू आहे.
महाड शहरातील काजळपुरा परिसरात असलेली तारिक गार्डन ही पाच मजली इमारत सोमवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास कोसळली होती. इमारतीत ४७ कुटुंबं राहत होती. या दुर्घटनेत एकूण १७ जण ढिगाऱ्याखाली अडकले होते. त्यापैकी १४ जणांचा मृत्यू झाला. तर २ जणांना वाचविण्यात बचाव पथकाला यश आले आहे. अद्याप आणखी एकाचा शोध सुरू आहे.