ETV Bharat / state

महाड इमारत दुर्घटना : तातडीने खाली आल्याने बचावलो; रहिवाशाने सांगितली आपबिती

author img

By

Published : Aug 25, 2020, 3:15 PM IST

सायंकाळी व्यायाम करून आल्यानंतर मी किचनमध्ये काही खाण्यासाठी बसलो होतो. त्यावेळी फ्रिज काहीसा खाली गेल्याचे दिसले. म्हणून मी कुटुंबाला सोबत घेऊन पाचव्या मजल्यावरून ओरडत सगळ्यांना घेऊन खाली आलो. तळमजल्यावर आल्यावर इमारतीचा पिलर तुटू लागला. तर काही सेकंदात दुसरा पिलर तुटण्यास सुरुवात झाली. तेव्हा आम्ही तातडीने सर्वजण दुसऱ्या इमारतीत पोहचलो. त्यानंतर काही क्षणात इमारत जमीनदोस्त झाली. काही सेंकदाचा फरक पडला नाहीतर आम्हीही त्यात अडकलो असतो, अशी प्रतिक्रिया जावेद चिंचकर या बचावलेल्या रहिवाशी तरुणाने दिली.

Raigad Building Collapse
महाड इमारत दुर्घटना : तातडीने खाली आल्याने बचावलो; रहिवाशाने सांगितली आपबिती

रायगड - महाड शहरातील काजळपुरा परिसरात असलेली तारिक गार्डन ही पाच मजली इमारत सोमवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास कोसळली. या घटनेत दोघांचा मृत्यू झाला असून 7 जण जखमी झाले आहेत. इमारतीच्या ढिगाऱ्यात सुमारे 17 जण अडकल्याची माहिती मिळाली आहे. इमारतीत 47 कुटुंबं राहत होती. स्थानिक प्रशासन आणि नागरिकांकडून बचावकार्य सुरू आहे. दरम्यान, या घटनेत सुदैवाने बचावलेल्या तरुणाने आपबिती सांगितली.

सायंकाळी व्यायाम करून आल्यानंतर मी किचनमध्ये काही खाण्यासाठी बसलो होतो. त्यावेळी फ्रिज काहीसा खाली गेल्याचे दिसले. म्हणून मी कुटुंबाला सोबत घेऊन पाचव्या मजल्यावरून ओरडत सगळ्यांना घेऊन खाली आलो. तळमजल्यावर आल्यावर इमारतीचा पिलर तुटू लागला. तर काही सेकंदात दुसरा पिलर तुटण्यास सुरुवात झाली. तेव्हा आम्ही तातडीने सर्वजण दुसऱ्या इमारतीत पोहचलो. त्यानंतर काही क्षणात इमारत जमीनदोस्त झाली. काही सेंकदाचा फरक पडला नाहीतर आम्हीही त्यात अडकलो असतो, अशी प्रतिक्रिया जावेद चिंचकर या बचावलेल्या रहिवाशी तरुणाने दिली.

जावेद चिंचकर घटनेची माहिती देताना...

दरम्यान, या घटनेनंतर नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी घटनास्थळी भेट दिली. त्यानंतर त्यांनी, या इमारतीचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे आहे. केवळ सात ते आठ वर्षात इमारत कोसळली असून यामध्ये मोठा भ्रष्टाचार झाला असण्याची शक्यता वर्तवली. या इमारतीचा बांधकाम व्यावसायिक आणि ज्या अधिकाऱ्यांनी इमारत बांधकामाला परवानगी दिली, अशा सर्वांवर कारवाई केली जाईल, असे शिंदे यांनी सांगितले आहे.

हेही वाचा - महाड इमारत दुर्घटना : भूकंप झाला समजून बाहेर आल्यामुळे वाचला जीव - प्रत्यक्षदर्शी

हेही वाचा - महाड इमारत दुर्घटना : ढिगाऱ्याखालून 'नाना' अशी हाक मारत माझे नातू धावत येतील, आजोबांची आशा

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.