ETV Bharat / state

Attack on Prasad Sawant: माथेरान शिवसेना संपर्कप्रमुख प्रसाद सावंत यांच्यावर हल्ला; रुग्णालयात उपचार सुरू - Shiv Sena party chief

बंडखोरीला सुरुवात झाल्यापासून आपण शिवसेना पक्षप्रमुख यांच्यासोबत अशी टिप्पणी करणारे माथेरान शिवसेनेचे शहर संपर्क प्रमुख प्रसाद सावंत यांच्या गाडीवर जमावाने हल्ला केला आहे. दरम्यान या हल्ल्यात प्रसाद सावंत यांच्या गाडीचे मोठे नुकसान झाले आहे.

Prasad Sawant
प्रसाद सावंत
author img

By

Published : Jun 26, 2022, 10:55 AM IST

रायगड - शिवसेना पक्षमधील फुटीनंतर त्या वादाचा परिणाम कर्जत विधानसभा मतदारसंघात (Karjat Assembly constituency) देखील दिसून आला आहे. बंडखोरीला सुरुवात झाल्यापासून आपण शिवसेना पक्षप्रमुख (Shiv Sena party chief) यांच्यासोबत अशी टिप्पणी करणारे माथेरान शिवसेनेचे शहर संपर्क प्रमुख प्रसाद सावंत यांच्या गाडीवर जमावाने हल्ला केला आहे. दरम्यान या हल्ल्यात प्रसाद सावंत यांच्या गाडीचे मोठे नुकसान झाले आहे. त्यावेळी झालेल्या मारहाणीत जखमी झालेले प्रसाद सावंत यांना कळंबोळी येथील एमजीएम रुग्णालयात (MGM Hospital) हलविण्यात आले आहे.

माथेरान मध्ये २४ जूनच्या रात्री झालेल्या भांडणाबद्दल कर्जत पोलीस उपअधीक्षक विजय लगारे यांनी सर्वांना कर्जत येथील कार्यालयात बोलावून घेतले होते. त्यावेळी शिवसेनेमधील दोन्ही गट हजर होते. या ठिकाणी बैठक उरकून प्रसाद सावंत हे आपल्या वैयक्तिक कामासाठी मुंबईला जाण्यासाठी निघाले होते. कर्जत उपाधिक्षक कार्यालयातून निघालेली त्यांची इनोव्हा क्रेस्टा ही गाडी कर्जत शहरातून बाहेर पडत असताना मुद्रे नानामास्तर नगरच्या समोरील रस्त्यावर येताच सावंत यांची एम एच ४६ ए झेड ४५०० ही गाडी आली असता, समोरून एक इनोवा गाडी आडवी आली. या गाडीमधून काहीजण लाठी- काठ्या घेवून खाली उतरले. त्या ठिकाणी तोंडावर मास्क लावलेल्या १५ हून अधिक तरुणांच्या जमावाने प्रसाद सावंत यांच्या गाडीवर आणि त्यांच्यावर हल्ला केला आहे.

यावेळी प्रसाद सावंत यांना प्रचंड मारहाण केल्यानंतर समोरून पोलिसांची गाडी येत असल्याचे पाहून ते सर्व तरुण तेथून पळून गेले. यावेळी त्या तरुणांपैकी काहींनी तू जास्त बोलतो, जास्त पोस्ट पाठवतो असे सांगून कसा विरोधात काम करतो तेच बघतो असे सांगून मारहाण केली आहे. ही घटना घडल्यानंतर मोठ्या संख्येने शिवसैनिक कर्जत उपजिल्हा रुग्णालयात जमले. तेथे प्रसाद सावंत यांच्यावर प्राथमिक उपचार करून, नवी मुंबई मधील एमजीएम रुग्णालयात त्यांना हलविण्यात आले. प्रसाद सावंत यांच्यावर हल्ला झाला, त्यावेळी त्यांचे भाचे श्रेयस गायकवाड आणि चालक शिवाजी हे सोबत होते. पोलिसांनी सावंत यांचे वाहन कर्जत पोलीस ठाणे येथे आणून लावले आहे. नवी मुंबईत उपचार करण्यासाठी नेले जात असताना कर्जतचे पोलीस उपाधिक्षक यांनी पोलिसांचा बंदोबस्त दिला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलिस करत आहेत.

हेही वाचा- आना हि पडेगा.. चौपाटीमे...बंडखोर आमदारांना संजय राऊत यांचा खोचक टोला!

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.