रायगड - यंदाची विधानसभा निवडणूक रायगडसाठी ऐतिहासिक ठरली आहे. या निवडणूकीत रायगड जिल्ह्यात शेकापचा सुफडा साफ झाला आहे. शेकापचा एकही उमेदवार जिल्ह्यात निवडून आला नाही. विधानसभा निवडणूकीत रायगड जिल्ह्यात शेकापचा एकही उमेदवार निवडून न येण्याची ही पहिलीच वेळ आहे.
पनवेलमध्ये भाजपचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी तर महाडमध्ये शिवसेनेचे आमदार भारत गोगावले यांनी विजयाची हॅट्रिक केली आहे. याशिवाय अलिबागमध्ये शिवसेनेचे महेंद्र दळवी तर पेणमध्ये भाजपचे रवींद्र पाटील यांनी शेकापच्या बालेकिल्ल्यात पहिल्यांदाच विजय मिळवून यश संपादन केले आहे. भाजपचे बंडखोर अपक्ष उमेदवार महेश बालदी यांनीही उरणमध्ये विजय मिळवला आहे.
जिल्ह्यात एकूण सात मतदारसंघ आहेत. यात महायुती विरूध्द महाआघाडी यांच्या सरळ लढत होत्या. त्यात महायुतीने पाच जागा जिंकल्या. आघडीने एका जागेवर यश मिळविले तर एका ठिकाणी अपक्ष उमेदवार विजयी झाला. शिवसेनेने तीन, भाजपने दोन, राष्ट्रवादी काँग्रेसने एक मतदारसंघात विजय मिळवला आहे. उरणमध्ये अपक्ष उमेदवार विजयी झाला आहे.
अलिबाग मतदारसंघ..
महेंद्र दळवी (शिवसेना) 111047
सुभाष पाटील (शेकाप) 78086
राजेंद्र ठाकूर (अपक्ष) 11853
अॅड. श्रद्धा ठाकूर (काँग्रेस) 2511
महाड मतदारसंघ..
भरतशेठ गोगावले, शिवसेना- 101370
देवेंद्र गायकवाड, मनसे- 2225
माणिकराव जगताप, काॅग्रेस- 80114
आशिष जाधव- 668
अर्जुन घाग- 1196
अशोक जंगले- 242
चंद्रकात धोंडगे- 1193
लक्ष्मण निंबाळकर- 276
नोटा - 2073
पेण मतदारसंघ..
रविशेठ पाटील (भाजप) 1,11,309
धैर्यशील पाटील (शेकाप) 87,714
नंदा म्हात्रे (काँग्रेस) 2,291
रवींद्र पाटील 23,595 मतांनी विजयी..
कर्जत मतदारसंघ..
महेंद्र थोरवे (शिवसेना) - 102029
सुरेशभाऊ लाड़ (राष्ट्रवादी काँग्रेस) - 83970
श्रीवर्धन मतदारसंघ..
आदिती तटकरे राष्ट्रवादी- ९२०७४
विनोद घोसाळकर शिवसेना ५२४५३
राष्ट्रवादीच्या आदिती तटकरे ३९६२१ मतांनी विजयी..
उरण मतदारसंघ..
मनोहर भोईर (शिवसेना) 68357
विवेक पाटील (शेकाप). 61501
महेश बालदी (अपक्ष) 74265
अपक्ष महेश बालदी 5908 ने विजयी..