ETV Bharat / state

ताम्हिणी घाटात ट्रॅव्हल्स बसचा भीषण अपघात; 2 ठार तर 55 जण जखमी - Raigad Accident

Raigad Accident : रायगडच्या ताम्हिणी घाटात ट्रॅव्हल्स बसचा भीषण अपघात झालाय. यात 2 जणांचा मृत्यू झालाय. तर 55 जण जखमी झाले आहेत.

Raigad Accident
Raigad Accident
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 30, 2023, 10:18 AM IST

Updated : Dec 30, 2023, 2:35 PM IST

रायगड Raigad Accident : रायगडच्या माणगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ताम्हिणी घाट परिसरात आज सकाळी साडेसातच्या सुमारास ट्रॅव्हल्स बस उलटून अपघात झाला. हा अपघात इतका भीषण होता की, यात दोघांचा जागीच मृत्यू झालाय. तर 55 प्रवासी जखमी झाले आहेत. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तसंच जखमींना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात नेण्यात आलं. रायगडचे पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी ही माहिती दिलीय.

पुण्यावरुन माणगावकडे येत होती बस : रायगडच्या माणगांव पोलीस ठाणे हद्दीताल ताह्मिणी घाटात सकाळी 07.30 वाजताच्या सुमारास ट्रॅव्हल बस उलटली. मिळालेल्या माहितीनुसार, ही ट्रॅव्हल्स बस क्रमांक MH 04 FK 6299 पुण्यावरुन माणगावकडे येत होती. मात्र, यादरम्यान ही बस रस्त्याखाली उतरली आणि पलटी झाली. यात या बसचा भीषण अपघात झालाय.

सहलीसाठी जाताना अपघात : या बसनं पुण्यातील काही स्थानिक लोक सहलीसाठी जात होते. आज सकाळी ते पुण्याहून हरिहरेश्वरच्या दिशेनं निघाले. बसमध्ये 57 प्रवासी प्रवास करत होते. पण ताम्हिणी घाटात आल्यानंतर चालकाचा बसवरचा ताबा सुटला आणि ही बस उलटली. त्यानंतर अपघातस्थळी एकच गोंधळ उडाला. अपघात होताच प्रवाश्यांनी आरडाओरड केल्यानं परिपसरात घबराट पसरली. या भयंकर अपघातात दोन महिलांचा मृत्यू झालाय. तर 55 जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमी झालेल्यांना माणगावच्या उपजिल्हा रुग्णालयात तातडीनं दाखल करण्यात आलं. अपघातामुळं या मार्गावरची वाहतूक काही वेळासाठी विस्कळीत झाली होती. आता मात्र ही वाहतूक सुरळीत झालीय.

हेही वाचा :

  1. साईबाबांच्या दर्शनाला जाणाऱ्या भाविकांच्या वाहनाचा भीषण अपघात, कर्नाटकातील चार भाविकांचा मृत्यू
  2. नगर-कल्याण महामार्गावर भीषण अपघात, आठ जण जागीच ठार, एकाच कुटुंबातील चौघांचा समावेश
  3. भोपाळ गॅस गळती : जगातील सर्वात भीषण औद्योगिक अपघाताला ३९ वर्ष पूर्ण, वाचा त्या रात्री नेमकं काय घडलं?
  4. जिल्हाधिकाऱ्याच्या वाहनानं चिरडल्यानं तीन जणांचा जागीच मृत्यू, अपघातानंतर आयएएस अधिकाऱ्यानं काढला पळ?

Last Updated : Dec 30, 2023, 2:35 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.