रायगड - पुलवामा गुरुवारी सीआरपीएफच्या ताफ्यावर झालेल्या हल्ल्यामुळे देशभरात संतापाची लाट उसळली आहे. पुलवामा येथे झालेल्या भ्याड हल्ल्याचा पनवेलमधील विविध संस्थांनी तीव्र निषेध केला आहे. या हल्ल्यात हुतात्मा झालेल्या जवानांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. यावेळी पनवेलकरांनी पाकिस्तान विरोधी घोषणा देत पुलवामा हल्ल्याचा तत्काळ बदला घ्यावा, अशी मागणी केली आहे.
जम्मू-काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यातील अवंतिपुरावर जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेने केलेल्या आत्मघातकी हल्ल्यात केंद्रीय राखीव पोलीस दलाचे ४४ जवान हुतात्मा झाले. स्फोटकांनी भरलेले वाहन दहशतवाद्यांनी जवानांच्या बसवर धडकवले. या हल्ल्यात काही जवान जखमी झाले आहेत. सुमारे शंभर किलो स्फोटकांनी भरलेले वाहन ताफ्यावर धडकवून दहशतवाद्यांनी हा हल्ला केला. उरी येथील लष्करी तळावर दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्याचा हा सर्वात मोठा हल्ला आहे. या हल्ल्याची फक्त राजकीय नेत्यांनीच नाही तर खेळाडूंनीही कठोर शब्दात निषेध व्यक्त केला आहे. कामोठे मधील व्हॉलीबॉल लव्हर्स ग्रुपच्या खेळाडूंनी देखील याचा तीव्र निषेध केला. हातात मेणबत्त्या घेऊन पनवेलकरांनी पाकिस्तान विरोधी घोषणाबाजीही केली. "पाकिस्तान मुर्दाबाद, गर्व से कहो हम हिंदू है, वंदे मातरम" अशी घोषणा देखील यावेळी देण्यात आल्या.
![undefined](https://s3.amazonaws.com/saranyu-test/etv-bharath-assests/images/ad.png)