ETV Bharat / state

आमदार प्रताप सरनाईक यांचा पोलादपूर उमरठ येथे जाहीर निषेध - प्रताप सरनाईक तानाजी मालुसरे वादग्रस्त वक्तव्य

पोलादपूर तालुक्यातील तानाजी मालुसरे यांचे समाधीस्थळ असलेल्या उमरठ येथे सुभेदार नरवीर तानाजी मालुसरे उत्सव समिती उमरठ व सुभेदार नरवीर तानाजी मालुसरे संस्था तसेच नरवीरप्रेमींनी प्रताप सरनाईक यांनी केलेल्या वक्तव्याबाबत आज जाहीर निषेध केला. प्रताप सरनाईक यांनी केलेल्या वक्तव्याबद्दल तातडीने सिंहगड अथवा उमरठ येथे येऊन माफी मागावी अन्यथा तीव्र आंदोलन केले जाईल, अशा इशाराही यावेळी देण्यात आला आहे.

रायगड
रायगड
author img

By

Published : Dec 20, 2020, 4:55 PM IST

रायगड - शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी एका मुलाखतीत तानाजी मालुसरे यांच्याबाबत अवमान करणारे व्यक्तव्य केल्याने शिवप्रेमी आणि नरवीरप्रेमी यांच्यात संतापाची लाट पसरली आहे. पोलादपूर तालुक्यातील तानाजी मालुसरे यांचे समाधीस्थळ असलेल्या उमरठ येथे सुभेदार नरवीर तानाजी मालुसरे उत्सव समिती उमरठ व सुभेदार नरवीर तानाजी मालुसरे संस्था तसेच नरवीरप्रेमींनी प्रताप सरनाईक यांनी केलेल्या वक्तव्याबाबत आज जाहीर निषेध केला. प्रताप सरनाईक यांनी केलेल्या वक्तव्याबद्दल तातडीने सिंहगड अथवा उमरठ येथे येऊन माफी मागावी अन्यथा तीव्र आंदोलन केले जाईल, अशा इशाराही यावेळी देण्यात आला आहे.

रायगड

नरवीर तानाजी मालुसरे यांच्याशी सरनाईक यांनी केली स्वतःची तुलना

आमदार प्रताप सरनाईक यांनी एका वृत्तवाहिनीवर एक मुलाखत दिली होती. या मुलाखतीत प्रताप सरनाईक यांनी स्वतःची नरवीर तानाजी मालुसरे याच्यांशी तुलना केली. दिल्ली आणि महाराष्ट्राच्या लढाईत प्रताप सरनाईक यांचा तानाजी मालुसरे झाला. तानाजी मालुसरे हे 16 व्या शतकातील होते. ते रयतेच्या रक्षणासाठी महाराजांपुढे नतमस्तक होऊन धारातीर्थ पडले. मी 21 व्या शतकातील असून सहजासहजी धारतीर्थ पडणार नाही, असे व्यक्तव्य आमदार प्रताप सरनाईक यांनी केले होते.

उमरठ येथे प्रताप सरनाईक यांचा केला निषेध

प्रताप सरनाईक यांनी नरवीर तानाजी मालुसरे यांच्याबाबत केलेल्या व्यक्तव्याबाबत आज उमरठ येथे सुभेदार नरवीर तानाजी मालुसरे उत्सव समिती उमरठ आणि सुभेदार नरवीर तानाजी मालुसरे संस्था तसेच नरवीर प्रेमींनी निषेध केला. आमदार प्रताप सरनाईक यांनी उमरठ आणि सिंहगड येथे येऊन जाहीर माफी मागावी अन्यथा तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशारा देण्यात आला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.