ETV Bharat / state

पनवेलमध्ये शिक्षिकेचा उपायुक्तांविरोधात महापालिकेवर मोर्चा - महापालिका

पनवेल महापालिकेच्या शिक्षण विभागात उपशिक्षिका म्हणून काम करण्याऱ्या एका शिक्षिकेने पनवेल पालिकेचे उपायुक्त जमीर लेंगरेकर व पिचड यांच्याकडून होणाऱ्या मानसिक व छळवणूक विरोधात पनवेल महापालिकेवर मोर्चा काढला होता.

आंदोलनकर्ते
आंदोलनकर्ते
author img

By

Published : Dec 4, 2019, 12:31 AM IST

पनवेल - पनवेल महापालिकेच्या शिक्षण विभागात उपशिक्षिका म्हणून काम करण्याऱ्या एका शिक्षिकेने पनवेल पालिकेचे उपायुक्त जमीर लेंगरेकर व वरिष्ठ लिपिक नामदेव पिचड यांच्याकडून होणाऱ्या मानसिक व छळवणूकीविरोधात पनवेल महापालिकेवर मोर्चा काढला होता. महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघटनेनेही या शिक्षिकेला पाठिंबा जाहीर करत मोर्चात सहभाग घेतला. पनवेल महापालिकेचे उपायुक्त लेंगरेकर यांनी पालिका शिक्षण विभागात दडपशाही आणि दहशत निर्माण केली असून मनमानी कारभार करत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला.

पनवेलमध्ये उपायुक्तांविरोधात महापालिकेवर मोर्चा

पनवेल महापालिकेचे उपायुक्त जमीर लेंगरेकर यांची विशाखा समितीमार्फत चौकशी करून त्यांच्यावर आठ दिवसांत कारवाई करावी, अन्यथा 1 लाख शिक्षकांचा मोर्चा मुंबईत काढण्यात येईल, असा इशारा महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघटनेमार्फत राज्याध्यक्ष अर्जुन कोळी यांनी महापालिका आयुक्तांना दिला आहे.

रायगड जिल्हा परिषदेकडून समायोजन करण्यात आलेल्या उपशिक्षिका ज्योत्स्ना घरडा यांची 2 वर्षांत 4 वेळा बदली करण्यात आली आहे. उपायुक्त जमीर लेंगरेकर यांनी जाणीवपूर्वक आपल्याला त्रास देण्यासाठी या बदल्या केल्या असल्याची घरडा यांची तक्रार आहे. लेंगरेकर यांनी आपला मानसिक छळ केल्याबद्दल व वरिष्ठ लिपिक नामदेव पिचड यांच्यावर कारवाई करून त्यांना निलंबित करावे आणि त्यांची विशाखा समितीमार्फत चौकशी करावी, अशी मागणी घरडा यांनी केली होती. त्याला पाठिंबा देण्यासाठी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघटने राज्याध्यक्ष अर्जुन कोळी, जिल्हा अध्यक्ष बाबुराव पालकर, तालुका अध्यक्ष वसंत मोकल, प्रमोद लांगी यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढला होता.

यावेळी मोर्चासमोर उपायुक्तांनी आपल्याला कशी वागणूक दिली याबद्दल सांगताना ज्योत्स्ना घरडा यांना आपल्या भावना आवरणे कठीण झाले. आयुक्त गणेश देशमुख यांच्या अनुपस्थितीत शिष्टमंडळाने उपायुक्त संजय शिंदे यांना आपल्या मागण्यांचे निवेदन दिले. शिंदे यांनी नियमाप्रमाणे चौकशी सुरू असून, त्याचा अहवाल आल्यावर योग्य ती कारवाई करण्यात येईल, असे मोर्चेकर्‍यांना सांगितले.

याबाबतीत पनवेल पालिकाचे विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे यांनी या गोष्टीची तात्काळ दखल घेत या गोष्टीबाबत महासभेत प्रस्ताव आणून उपायुक्त यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्याची मागणी करणार असल्याचे सांगितले. याबाबत तक्रार अर्ज प्राप्त झाला असून त्या वर महिला तक्रार निवारण समिती पुनर्गठीत केली असून यामध्ये वर्ग १ दर्जाच्या महिला अधिकारी यांची नियुक्ती केली आहे. तक्रारदार यांच्या अर्जानुसार आम्ही विशाखा समितीमध्ये बदल केला असून त्यात चौकशी होईल व त्यांना न्याय मिळेल, असा विश्वास उपायुक्त संजय शिंदे यांनी व्यक्त केला.

याबाबत पालिका उपायुक्त जमीर लेंगरेकर यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी ऑन कॅमेरा न बोलता त्यांचा वरील सर्व आरोप फेटाळत शिक्षण विभागातील भ्रष्टाचार बाहेर काढल्यामुळे या सर्व लोकांनी एकत्र येत हे षड्यंत्र रचले असल्याचा आरोप केला. योग्य वेळी कागदोपत्री पुरावे सादर करण्याचे आश्वासनही दिले. शिक्षण विभागाच्या अंतर्गत बदल्या या शासनाच्या नियमानुसारच केले असल्याची प्रतिक्रिया उपायुक्त लेंगरेकर यांनी दिली.

Intro:सोबत एडिटेड पॅकेज जोडला आहे.

अर्जुन कोळी, अध्यक्ष, (महाराष्ट्र राज्य नगरपालिका व महानगरपालिका शिक्षक संघ)

बाईट:प्रीतम म्हात्रे, विरोधी पक्षनेते, पनवेल पालिका

बाईट:डॉ सुरेखा मोहकर, नगरसेविका

पनवेल

पनवेल महापालिकेच्या शिक्षण विभागात उपशिक्षिका म्हणून काम करण्याऱ्या एका शिक्षिकेने पनवेल पालिकेचे उपायुक्त जमीर लेंगरेकर व पिचड यांच्याकडून होणाऱ्या मानसिक व छळवणूक प्रकरणी पनवेल महापालिकेवर मोर्चा काढला होता. पनवेल पालिकेचे उपायुक्त लेंगरेकर यांनी मनपा शिक्षण विभागात दडपशाही आणि दहशत निर्माण केली असून मनमानी कारभार करत असल्याचा धक्कादायक आरोप यावेळी करण्यात आला.Body:पनवेल महापालिकेचे उपायुक्त जमीर लेंगरेकर यांची विशाखा समितीमार्फत चौकशी करून त्यांच्यावर आठ दिवसांत कारवाई करावी; अन्यथा एक लाख शिक्षकांचा मोर्चा मुंबईत काढण्यात येईल, असा इशारा महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघटनेमार्फत राज्य अध्यक्ष अर्जुन कोळी यांनी महापालिका आयुक्तांना दिला आहे.

रायगड जिल्हा परिषदेकडून समायोजन करण्यात आलेल्या उपशिक्षिका ज्योत्स्ना घरडा यांची दोन वर्षांत चार वेळा बदली करण्यात आली आहे. उपायुक्त जमीर लेंगरेकर यांनी जाणीवपूर्वक आपल्याला त्रास देण्यासाठी या बदल्या केल्या असल्याची घरडा यांची तक्रार आहे. लेंगरेकर यांनी आपला मानसिक छळ केल्याबद्दल व वरिष्ठ लिपिक नामदेव पिचड यांच्यावर कारवाई करून त्यांना निलंबित करावे आणि त्यांची विशाखा समितीमार्फत चौकशी करावी, अशी मागणी घरडा यांनी केली होती. त्याला पाठिंबा देण्यासाठी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघटने राज्य अध्यक्ष अर्जुन कोळी, जिल्हा अध्यक्ष बाबुराव पालकर, तालुका अध्यक्ष वसंत मोकल, प्रमोद लांगी यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढला होता.

या वेळी मोर्चासमोर उपायुक्तांनी आपल्याला कशी वागणूक दिली याबद्दल सांगताना ज्योत्स्ना घरडा यांना आपल्या भावना आवरणे कठीण झाले. आयुक्त गणेश देशमुख यांच्या अनुपस्थितीत शिष्टमंडळाने उपायुक्त संजय शिंदे यांना आपल्या मागण्यांचे निवेदन दिले. शिंदे यांनी नियमाप्रमाणे चौकशी सुरू असून, त्याचा अहवाल आल्यावर योग्य ती कारवाई करण्यात येईल, असे मोर्चेकर्‍यांना सांगितले.

या बाबतीत पनवेल पालिकाचे विरोधी पक्ष नेते प्रीतम म्हात्रे यांनी या गोष्टी ची तात्काळ दखल घेत या गोष्टीबाबत महासभेत प्रस्ताव आणून उपायुक्त यांना सक्तीच्या रजेवर पाटवण्याची मागणी करणार असल्याचे सांगितले. या बाबतीत तक्रार अर्ज प्राप्त झाला असून त्या वर महिला तक्रार निवारण समिती / विशाखा समिती पुनर्गठित केली असून यामध्ये वर्ग १ दर्जाच्या महिला अधिकारी यांची नियुक्ती केली आहे. तक्रारदार यांच्या अर्जानुसार आम्ही विशाखा समितीमध्ये बदल केला असून त्यात चौकशी होईल व त्यांना न्याय मिळेल असा विश्वास उपायुक्त संजय शिंदे यांनी व्यक्त केला. Conclusion:या बाबत पालिका उपायुक्त जमीर लेंगरेकर यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी ऑन कॅमेरा न बोलता त्यांचा वरील सर्व आरोप फेटाळत शिक्षण विभागातील भ्रष्ट्राचार बाहेर काढल्यामुळे या सर्व लोकांनी एकत्र येत हे षड्यंत्र माझ्या विरुद्ध रचले आहे.योग्य वेळी कागदोपत्री पुरावे मी सादर करेन.शिक्षण विभागाच्या अंतर्गत बदल्या या शासनाच्या नियमानुसारच केले असल्याची प्रतिक्रिया उपायुक्त लेंगरेकर यांनी दिली.
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.