रायगड : जुन्या मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्गावर मोकाट गुरांचा वावर वाढला आहे. ही बाब अपघाताला कारण ठरत आहे. रस्त्याच्या देखभालीची जबाबदारी आयआरबी कंपनीची आहे. मात्र, कंपनी याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याने वाहन चालकांचा जीव टांगणीला लागला आहे.
अपघाताला कारणीभूत ठरताता मोकाट जनावरे -
जुन्या मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्गवर वाहनांची मोठ्या प्रमाणात वर्दळ आहे. प्रवासी, चाकरमानी, लहान-मोठी वाहने या मार्गावरून प्रवास करतात. वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. खालापूर तालुक्यात अधिक प्रमाणावर कारखाने असल्याने कारखान्यांची अवजड वाहनेही याच मार्गावरून जातात. अशा परिस्थितीत महामार्गावर मोकाट जनावरे मुक्तपणे फिरत आहेत. त्यामुळे दिवसेंदिवस अपघाताचा धोका वाढत आहे.
प्रशासनाचा कानाडोळा -
या महामार्गावर अनेकदा लहान-मोठे अपघात घडले आहेत. तरीदेखील मोकाट जनावरांच्या संचाराकडे संबंधित प्रशासन कानाडोळा करत असल्याचा आरोप नागरिक करत आहेत. या मोकाट जनावरांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी वाहन चालक आणि नागरिकांकडून होत आहे.