ETV Bharat / state

राज्यात 230 जागेवर भाजपच जिंकणार - किरीट सोमैया

यंदाच्या विधानसभा निवडणुकीत भाजप, शिवसेना, आरपीआय (आठवले गट) व मित्रपक्षांची महायुती महाराष्ट्रात 288 पैकी किमान 230 जागा जिंकेल, असा विश्वास माजी खासदार व भाजप नेते किरीट सोमैया यांनी व्यक्त केला.

किरीट सोमैया
author img

By

Published : Oct 13, 2019, 3:57 PM IST

रायगड - सर्वसामान्य नागरिकाला केंद्रबिंदू मानून भाजप सरकारने काम केले. ते पाहता यंदाच्या विधानसभा निवडणुकीत भाजप, शिवसेना, आरपीआय (आठवले गट) व मित्रपक्षांची महायुती महाराष्ट्रात 288 पैकी किमान 230 जागा जिंकेल, असा विश्वास माजी खासदार व भाजप नेते किरीट सोमैया यांनी व्यक्त केला. पनवेलमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

बोलताना किरीट सोमैया

पनवेल विधानसभा मतदारसंघात केलेले कार्य पाहता या निवडणुकीत आमदार प्रशांत ठाकूर हे ऐतिहासिक व सर्वात मोठा विजय मिळवतील, असेही त्यांनी आवर्जून नमूद केले. पनवेल विधानसभा मतदारसंघातून भाजपचे विद्यमान आमदार प्रशांत ठाकूर आणि महाआघाडीकडून शेकापचे हरेश केणी यांच्यात मुख्य लढत आहे. प्रशांत ठाकूर यांच्या प्रचारासाठी मागील काही दिवसांपासून भाजप नेते किरीट सोमैया हे पनवेलकरांशी संवाद साधताना दिसून येत आहेत.

हेही वाचा - पवारसाहेबांचे सर्व दात पडले असून; आता फक्त सुळेच शिल्लक, गीतेंची बोचरी टीका

Intro:पनवेल

सोबत व्हिज्युअल आणि बाईट जोडली आहे

सर्वसामान्य नागरिकाला केंद्रबिंदू मानून भाजप सरकारने काम केले. ते पाहता यंदाच्या विधानसभा निवडणुकीत भाजप, शिवसेना, आरपीआय व मित्रपक्षांची महायुती महाराष्ट्रात 288 पैकी किमान 230 जागा जिंकेल, असा विश्वास माजी खासदार व भाजप नेते किरीट सोमय्या यांनी व्यक्त केला. ’पुन्हा आणू या आपले सरकार’ या शीर्षकाखाली पनवेलमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.Body:महाराष्ट्राचा चेहरामोहरा बदलला या वेळी किरीट सोमय्या यांनी समाजाच्या सर्व घटकांतील नागरिकांसाठी भाजपच्या नेतृत्वाखालील सरकारने केलेल्या कार्याचा आढावा सादर केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या समर्थ मार्गदर्शनाखाली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने महाराष्ट्राला पाच वर्षांपूर्वीच्या काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी सरकारच्या काळातील भ्रष्टाचार, निर्णयलकवा, निराशा व अस्वस्थतेच्या वातावरणातून बाहेर काढले आणि स्वच्छ प्रशासन, गतिमान निर्णय, सामाजिक सौहार्द आणि जबरदस्त विकासाच्या स्थितीत राज्याला आणले. आर्थिक व सामाजिक विकास करून नवमहाराष्ट्र होण्यास आपले राज्य सज्ज झाल्याचे त्यांनी नमूद केले.

Conclusion:पनवेल विधानसभा मतदारसंघात केलेले कार्य पाहता या निवडणुकीत आमदार प्रशांत ठाकूर ऐतिहासिक व सर्वांत मोठा विजय मिळवतील, असेही त्यांनी आवर्जून नमूद केले.पनवेल विधानसभा मतदारसंघातून भाजपचे विद्यमान आमदार प्रशांत ठाकूर आणि महाआघाडीकडून शेकापचे हरेश केणी यांच्यात मुख्य लढत आहे. प्रशांत ठाकूर यांच्या प्रचारासाठी गेल्या काही दिवसांपासून भाजप नेते किरीट सोमय्या हे पनवेलकरांशी संवाद साधताना दिसुन येत आहेत.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.