ETV Bharat / state

'सरकारला इमारतींच्या ऑडीटबद्दल गांभीर्य नाही' - pravin darekar on mahad incident news

शहरातील तसेच ग्रामीण भागातील धोकादायक इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याची मागणी सरकारने केली होती. मात्र, सरकारला याबाबत गांभीर्य नाही. आतातरी सरकारने जुन्या इमारतीचे स्ट्रक्चरल ऑडिट करावे आणि नागरिकांचे जीव वाचवावे, अशी विनंतीही विरोधी पक्षनेते दरेकर यांनी केली आहे.

pravin darekar
प्रविण दरेकर
author img

By

Published : Aug 24, 2020, 9:33 PM IST

Updated : Aug 24, 2020, 10:54 PM IST

रायगड - महाडमध्ये पाच मजली इमारत पडून झालेली दुर्घटना ही अत्यंत गंभीर आहे. आतापर्यंत शहरी भागात इमारत पडल्याच्या अनेक दुर्घटना घडत होत्या. पण, आता ग्रामीण भागातही अशा घटना घडू लागल्या आहेत. भविष्यात अशा घटना घडू नयेत यासाठी शहरासह ग्रामीण भागातील धोकादायक इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याची मागणी केली होती. मात्र, सरकारला याबाबत गांभीर्य नाही, अशी टिका विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी केली आहे.

बोलताना विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर

या इमारतीच्या ढिगाऱ्याखाली दीडशे जण अडकले असल्याची माहिती मिळत आहे, अशी अहिती प्रवीण दरेकर यांनी दिली आहे. शहरातील तसेच ग्रामीण भागातील धोकादायक इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याची मागणी केली होती. मात्र सरकारला याबाबत गांभीर्य नाही. आतातरी जुन्या इमारतीचे स्ट्रक्चरल ऑडिट करावे आणि नागरिकांचे जीव वाचवावे, अशी विनंतीही यानिमित्ताने दरेकर यांनी केली आहे.

महाड शहरातील काजळपुरा परिसरात असलेली तारिक गार्डन ही 5 मजली इमारत आज सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास कोसळली. या इमारतीत 47 कुटुंबे राहात होती. यात 150 नागरिक असल्याचे बोलले जात आहे. इमारतीतील सर्व कुटुंबे मुस्लीम धर्मीय होती. स्थानिक प्रशासन आणि नगरिकांकडून बचाव कार्य सुरू करण्यात आले आहे. आतापर्यंत 20 जणांना ढिगाऱ्याबाहेर काढण्यात आले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तसेच बचावकार्य सुरू आहे.

हेही वाचा - BREAKING: महाडमध्ये ५ मजली इमारत कोसळली, 150 नागरिक अडकल्याची भीती

Last Updated : Aug 24, 2020, 10:54 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.