ETV Bharat / state

गणेश मुर्तीकारांना मोठा दिलासा; मुर्तीमध्ये पीओपीचा वापर करता येणार - आशिष शेलार लेटेस्ट न्यूज

पीओपीच्या वापराचा पर्यावरणावर परिणाम याचा आभ्यास करण्यासाठी एक गट स्थापन करण्यात येईल, असे मंत्र्यांनी सांगितले होते. यामुळे या समितीचा अहवाल येईपर्यंत बंदीला स्थगिती देण्याचे निर्देश मंत्र्यांनी दिले आहेत.

गणेश मुर्तीकारांना मोठा दिलासा;  मुर्तीमध्ये पीओपीचा वापर करता येणार

author img

By

Published : Jan 13, 2021, 9:49 AM IST

रायगड (पेण)- पीओपी वापर व पर्यावरणावर होणारे परिणाम याबाबत अभ्यास करण्यासाठी अभ्यासगट स्थापन करण्यात आल्याने या कमिटीचा अहवाल येईपर्यंत पीओपीवरील बंदी स्थगित करण्यात यावी असे निर्देश आज केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी केंद्रीय प्रदुषण नियंत्रण मंडळाचे सचिव प्रशांत गार्गव्ह यांना दिले आहेत. त्यामुळे येत्या माघी गणेशोत्सवात पीओपीच्या मुर्तीवर बंदी राहणार नाही, अशी माहिती भाजपा नेते आमदार अँँड आशिष शेलार यांनी दिली.

गणेश मुर्तीकारांना मोठा दिलासा; मुर्तीमध्ये पीओपीचा वापर करता येणार

महाराष्ट्रातील सुमारे ५ लाख मुर्तीकार, कारागीरांचे गाऱ्हाणे आज पुन्हा भाजपा नेते आमदार आशिष शेलार यांनी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांच्याकडे मांडले. महाराष्ट्रात माघी गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर आला आहे, त्यामुळे याबाबत योग्य तो तोडगा काढावा अशी विनंती आमदार अँड आशिष शेलार यांनी केंद्रीय मंत्री जावडेकर यांना केली.

गणेशोत्सव समन्वय समिती पर्यावरण मंत्र्यांच्या भेटीला.
पीओपीवरील बंदीमुळे हजारो गणेश आणि दुर्गा मुर्तीकार अडचणीत आले आहेत. या व्यवसायात ५ लाखाहून अधिक कारागीर, मुर्तीकार, कारखानदार यांचा रोजगार अवलंबून आहे. कोरोना मुळे यावर्षी हा उद्योग अडचणी आला आहे. त्यामुळे याबाबत तोडगा निघावा, अशी विनंती करीत नुकतेच मुर्तीकार आणि सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीचे शिष्टमंडळाने आमदार अँड आशिष शेलार यांच्या नेतृत्वाखाली पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांची मुंबईत भेट घेतली होती. यामध्ये गणेशोत्सव समन्वय समितीचे अध्यक्ष अँड नरेश दहिबावकर, महाराष्ट्र गणेशोत्सव महासंघाचे अध्यक्ष जयेंद्र साळगावकर, अखिल सार्वजनिक उत्सव समितीचे अध्यक्ष हितेश जाधव यांच्यासह अन्य पदाधिकाऱ्यांचा समावेश होता.

गणेशोत्सव मंडळाच्या अध्यक्षांकडून निर्णयाचे स्वागत-

पीओपीच्या वापराचा पर्यावरणावर परिणाम याचा आभ्यास करण्यासाठी एक गट स्थापन करण्यात येईल, असे मंत्र्यांनी सांगितले होते. त्यानुसार केंद्रीय पर्यावरण विभागाने दिल्ली आयआयटीच्या केमिकल इंजिनिअरिंग डिपार्टमेंटचे प्रमुख प्रा.के.के.पंत, प्रो.सी.बालोममुमदार यांच्यासह पुण्याच्या राष्ट्रीय रासायनिक प्रयोग शाळेच्या डॉ.शुभांगी उंबरकर, डॉ. मोहन डोंगरे यांच्यासह वॉटर क्वलिटी मॅनेजमेंट विभागाचे सेक्रेटरी जे.चंद्राबाबू यांची कमिटी गठीत केली. त्यामुळे या समितीचा अहवाल येईपर्यंत बंदीला स्थगिती देण्याचे निर्देश मंत्र्यांनी दिले आहेत.

गेली वर्षभर आम्ही या विषयावर राज्य आणि केंद्र सरकारकडे पाठपुरावा करीत आहोत. आमदार अँड आशिष शेलार यांनी पक्षीय राजकारण बाजुला ठेवून उत्सवाप्रती प्रेम दाखवून या कामी पुढाकार घेतला. भाद्रपद गणेशोत्सवात जशी पीओपी वापराला सूट मिळवून दिली, तशीच सूट आता माघी गणेशोत्सवासाठी मिळाली, त्यामुळे विघ्न टळले असल्याचे मत हन्मुंबई गणेश मूर्तिकार संघाचे अध्यक्ष नाना तोंडवलकर यांनी व्यक्त केले आहे.

भाद्रपद गणेशोत्सव काळात कोरोनामुळे आमचे मूर्तिकार अडचणीत आले होते. त्या अडचणींवर मात करत आता माघी गणेशोत्सव काळात आमचा व्यवसाय पुढे जाईल, कारागीरांना रोजगार मिळेल, अशी अपेक्षा असताना पीओपी वरील बंदी ही मोठी अडचण होती. त्यामुळे आमदार अँड आशिष शेलार यांनी या कामी पुढाकार घेऊन सतत पाठपुरावा करून तूर्तास त्याला स्थगिती मिळवून दिली. त्यामुळे लाखो मूर्तिकारांना मोठा दिलासा मिळाला आहे. आम्हा मूर्तिकारांना, कारागिरांना यावर रोजगार अवलंबून असणाऱ्यांंना गणपती बाप्पाचा आशीर्वाद मिळाला असल्याची भावना महाराष्ट्र गणेशोत्सव महासंघाचे अध्यक्ष जयेंद्र साळगावकर यांनी व्यक्त केली आहे.

माघी गणेश आणि चैत्र नवरात्रीला मोठा दिलासा

आमचे मूर्तिकार व गणेशोत्सव मंडळे मोठ्या अडचणीत होते त्यातून दिलासा देण्याचे काम आमदार आशिष शेलार आणि केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी केले आहे. त्याबद्दल दोघांचेही आभार मानतो. आणि पीओपीवर पर्यावरण पूरक तोडगा ही लवकरच निघेल अशीही आशा असल्याचे अखिल सार्वजनिक उत्सव समितीचे अध्यक्ष हितेश जाधव म्हणाले

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.