ETV Bharat / state

संचारबंदीतही रायगडकरांची रस्त्यांवर गर्दी, काढाव्या लागल्या उठाबशा

कोरोना विषाणूची लागण होऊ नये यासाठी शासनाने संचारबंदी लागू केली आहे. यामुळे, रायगड जिल्ह्यातील सीमाही बंद केल्या गेल्या आहेत. अशातही आज सकाळपासून नागरिक खरेदीसाठी बाहेर पडले आहेत.

author img

By

Published : Mar 24, 2020, 3:59 PM IST

संचारबंदीतही रायगडकरांची रस्त्यांवर गर्दी

रायगड - कोरोना विषाणूची लागण होऊ नये यासाठी शासनाने संचारबंदी लागू केली आहे. त्याचबरोबर आंतरजिल्हा बंदीही केली आहे. यामुळे, रायगड जिल्ह्यातील सीमाही बंद केल्या गेल्या आहेत. अशातही आज सकाळपासून नागरिक खरेदीसाठी बाहेर पडले आहेत. तर, अनावश्यक घराबाहेर पडणाऱ्या नागरिकांना पोलिसांकडून प्रसादही मिळत आहे.

हेही वाचा - सीमाबंदीमुळे वरुडमध्ये १८ कोटी किमतीच्या ५०० ट्रक संत्रा मंडीत पडून

संचारबंदी लागू केली असल्याने गर्दी करू नका, असे आवाहन पोलिसांमार्फत केले गेले आहे. याच पार्श्वभूमीवर शहरात येणारी वाहने पोलिसांनी पुन्हा माघारी फिरवली आहेत. अत्यावश्यक सेवा सुरू ठेवण्यात आल्या आहेत. अशातच 25 मार्चला गुढीपाडवा सण असल्याने खरेदीसाठी बाजारात नागरिकांनी गर्दी केलेली दिसत आहे. तर, अत्यावश्यक सेवेव्यतिरिक्त इतर दुकाने बंद असल्याने गुढीपाडवा सणावर कोरोनाचा परिणाम दिसत आहे. कोरोना विषाणू हा गर्दीमुळे मोठ्या प्रमाणात पसरत आहे. मात्र, याबाबत अजूनही नागरिक जागृत नाहीत ही खरी खंत आहे.

हेही वाचा - औरंगाबादच्या कन्नडमध्ये संचारबंदीवेळी बाहेर फिरणाऱ्या नागरिकांना पोलिसांनी दिला चोप

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.