रायगड - महाड औद्योगिक वसाहतीतील सांडपाणी वाहून नेण्यासाठी टाकण्यात येणाऱ्या पाईपलाईनला आग लागल्याची घटना शुक्रवारी संध्याकाळी घडली. अग्नीशमन दल आणि स्थानिकांच्या मदतीने ही आग आटोक्यात आणण्यात आली आहे.
हेही वाचा - मी असा किती दिवस मार खाऊ? वृद्धेच्या प्रश्नाने जयंत पाटील भावूक
या घटनेमुळे काही काळ मुंबई-गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी झाली होती. आग आणि धुराचे लोट पसरल्याने राजेवाडी फाटा परिसरात गोंधळ उडाला होता. मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणादरम्यान औद्योगिक वसाहतीची सांडपाणी वाहून नेणारी पाईपलाईन नव्याने टाकण्याचे काम सुरू आहे. महामार्गालगत मोकळ्या जागेत एचडीपीई प्रकारचे पाईप ठेवण्यात आले आहेत.
हेही वाचा - 'त्या' टि्वटमुळे कपिल मिश्रा यांना निवडणूक आयोगाने पाठवली नोटीस