ETV Bharat / state

खोपोलीत चिमुरडीवर पाळीव डुकराचा जीवघेणा हल्ला - ताज्या बातम्या

खोपोली शहरातील पटेल नगर येथे चार वर्षीय चिमुरडीवर पाळीव डुकराने जीवघेणा हल्ला केल्याची घटना घडली आहे. या हल्ल्यात ती गंभीर जखमी झाली आहे. आईफा अमीर शेख असे या मुलीचे नाव आहे.

जखमी मुलगी
जखमी मुलगी
author img

By

Published : May 29, 2021, 7:02 PM IST

रायगड - खोपोली शहरातील पटेल नगर येथे चार वर्षीय चिमुरडीवर पाळीव डुकराने जीवघेणा हल्ला केल्याची घटना घडली आहे. या हल्ल्यात ती गंभीर जखमी झाली आहे. आईफा अमीर शेख असे या मुलीचे नाव आहे. सुदैवाने येथील नागरिकांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला. या भागात वारंवार असे प्रकार घडत असल्याने डुकरे मोकाट सोडणाऱ्या मालकांवर कारवाईची मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.

नागरिकांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला

खोपोली शहरातील पटेल नगर, शिळगाव परीसरात डुक्कर पालन करणारे व्यवसायिक मोकाट डुकरे आणून सोडत आहेत. त्यांचे संगोपन न करता खुल्या परिसरात सोडतात. त्यांची वाढ झाल्यावर विक्री करून भरमसाठ पैसै कमवितात. मात्र मालकांच्या दुर्लक्षपणामुळे डुकरे लहान मुलांवर हल्ला करीत असल्याच्या घटना घडत आहेत. असाच प्रकार पटेलनगर भागात घडला असून येथील मालकाने पाळीव डुक्कर मोकाट सोडल्याने अंगणात खेळणाऱ्या लहान मुलांवर या डुकराने हल्ला केला. यामध्ये एका मुलीचे लचके तोडून ती गंभीर जखमी झाली आहे. सुदैवाने येथील नागरिकांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला.

नागरिकांकडून डुक्कर मालकांवर कारवाईची मागणी
ही घटना समजताच नगरसेवक नासीर पटेल आणि सामाजिक कार्यकर्ते विशाल गायकवाड यांनी तत्काळ भेट देऊन मदतकार्य केले. खोपोली नगरपालिका प्रशासन किंवा संबधित यंत्रणेने याची दखल घेऊन कारवाई करावी अन्यथा जीवघेणे प्रकार सुरूच राहतील, अशी मागणी येथील नागरिकांनी केली आहे.

हेही वाचा - आदिवासी तरुणाचे यश; गुळवेल पुरविण्याचे मिळाले दीड कोटींचे कंत्राट

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.