ETV Bharat / state

धक्कादायक ! पनवेलमध्ये सख्ख्या भावानेच केला बहिणीवर बलात्कार

बहीण भावाच्या नात्याला काळीमा फासणारी घटना पनवेलमध्ये उघडकीस आली आहे. सख्ख्या भावानेच बहिणीवर बलात्कार केल्याचा प्रकार घडला आहे. याप्रकरणी खांदेश्वर पोलिसांनी पॉक्सो, लैंगिक अत्याचार प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

physical abused case in panvel
author img

By

Published : Nov 20, 2019, 6:08 AM IST

Updated : Nov 20, 2019, 8:18 AM IST

पनवेल - बहीण भावाच्या नात्याला काळीमा फासणारी घटना पनवेलमध्ये उघडकीस आली आहे. सख्ख्या भावानेच बहिणीवर बलात्कार केल्याचा प्रकार घडला आहे. याप्रकरणी खांदेश्वर पोलिसांनी पॉक्सो, लैंगिक अत्याचार प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

अल्पवयीन (16 वर्षीय) मुलीच्या पोटात दुखू लागल्याने कुटुंबीयांनी तिला कामा रुग्णालयात दाखल केले होते. तेथे ती गर्भवती असल्याचे लक्षात येताच याबाबत तिच्या आई वडिलांनी विचारपूस केली. त्यावेळी तिच्या सख्ख्या भावानेच तिच्यावर बलात्कार केल्याचे तिने सांगितले. दोघेही भाऊ-बहीण हे महाविद्यालयीन शिक्षण घेत होते. ऑगस्ट महिन्यात पीडित मुलगी मध्यरात्रीच्या सुमारास झोपलेली असताना तिच्या भावाने जबरदस्तीने तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचे उघड झाले.

लैंगिक अत्याचार करणारा आपला सख्खा मोठा भाऊच असल्याने पीडित मुलीने घाबरून तसेच बदनामीच्या भीतीने सदर प्रकाराची माहिती कुणालाच दिली नाही. मुलीच्या आई-वडिलांना मोठा धक्का बसला असून, त्यांनी जबाब नोंदवून आरोपी मुलावर गुन्हा दाखल केला आहे. संबंधित गुन्हा पनवेल भागात घडल्याने आझाद मैदान पोलिसांनी हा गुन्हा खांदेश्वर पोलिसांकडे पुढील तपासासाठी वर्ग केला आहे.

Intro:सोबत फाईल फुटेज जोडले आहे
पनवेल

भावानेच बहिनीवर बलात्कार केल्याची नात्याला काळीमा फ़ासणार घटना पनवेलमध्ये उघड़कीस आली. यात बहीण गर्भवती राहिल्यानंतर हे प्रकरण उघड़कीस आले. याप्रकरणी खान्देश्वर पोलिसांनी पॉक्सो, लैंगिक अत्याचार प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
Body:
अल्पवयीन 16 वर्षीय मुलगी खांदेश्वर येथील रहिवासी आहे. पोटात दुखू लागल्याने कुटुंबियानी तिला कामा रुग्णालय येथे दाखल केले. तेथे ती गर्भवती असल्याचे लक्षात येताच याबाबत तिच्या आई वडिलांनी विचारपूस केली असता तिच्या सख्या भावानेच तिच्यावर बलात्कार केल्याचं तिने सांगितलं. दोघेही भाऊ-बहीण हे महाविद्यालयीन शिक्षण घेत होते. ऑगस्ट महिन्यात पीडित मुलगी मध्यरात्रीच्या सुमारास झोपलेली असताना तिच्या भावाने जबरदस्तीने तिच्यावर लैंगिक अत्याचार केला होता.

लैंगिक अत्याचार करणारा आपला सख्खा मोठा भाऊच असल्याने पीडित मुलीने घाबरून तसेच बदनामीच्या भीतीने सदर प्रकाराची माहिती कुणालाच दिली नाही; मुलीच्या आई-वडिलांना हा मोठा धक्का बसला असून त्यांनी जबाब नोंदवून आरोपी तरुणावर गुन्हा दाखल केला. Conclusion:
गुन्हा पनवेल भागात घडल्याने आझाद मैदान पोलिसांनी सदरचा गुन्हा खांदेश्वर पोलिसांकडे पुढील तपासासाठी वर्ग केला आहे. त्यानुसार खांदेश्वर पोलिसांनी या प्रकरणातील आरोपी तरुणावर बलात्कारासह पोक्‍सो कलमान्वये गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे.

Last Updated : Nov 20, 2019, 8:18 AM IST

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.