ETV Bharat / state

रायगड जिल्हा परिषदेच्या अनुकंपा भरतीत गोलमाल; मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या आदेशाने नितीनला मिळाला न्याय - raigad zp compassion job

अनुकंपाच्या निकषामध्ये बसत असूनही एका तरुणाला नोकरीसाठी रायगड जिल्हा परिषदेमध्ये गेल्या तीन वर्षांपासून हेलपाटे मारावे लागत होते. मात्र, अखेर त्याने जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या घडलेला प्रकार कथन केला. यानंतर त्याला न्याय मिळाला आहे.

raigad zilla parishad
रायगड जिल्हा परिषद
author img

By

Published : Sep 17, 2020, 6:09 PM IST

Updated : Sep 17, 2020, 7:37 PM IST

रायगड - जिल्हा परिषदेचा शिक्षण विभाग हा नेहमीच चर्चेचा विषय ठरत आहे. जिल्हा परिषदेच्या अनुकंपा भरतीत घोटाळा झाल्याचे प्रकरण समोर आले आहे. अनुकंपा असलेल्या एका शिक्षकाने अनुकंपा परिपूर्ण प्रस्ताव देऊनही शिक्षण विभागाच्या हलगर्जीपणामुळे आपली हक्काची नोकरी गमावण्याची वेळ आली आहे. याबाबत शिक्षकाच्या माध्यमातून राहुल गायकवाड या सामाजिक कार्यकर्त्याने जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील यांच्याकडे तक्रार केल्यानंतर हा प्रकार समोर आला आहे.

रायगड जिल्हा परिषदेच्या अनुकंपा भरतीत गोलमाल; मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या आदेशाने नितीनला मिळाला न्याय

या प्रकरणात शिक्षकाला न्याय मिळवुन देण्याचे आश्वासन किरण पाटील यांनी दिले आहे. कर्जत तालुक्यातील मार्गाची वाडी येथे राहणारे चिमण मधुकर केवारी हे जिल्हा परिषदेच्या शाळेवर लोधिवली येथे शिक्षक म्हणून कार्यरत होते. 12 जानेवारी 2017ला त्यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात एक मुलगा, दोन मुली आणि पत्नी असा परिवार आहे. मुलगा नितीन केवारी हा डी. एड्. पूर्ण करून शिक्षक झालेला आहे. नितीन हा एकटाच घरात कमवणारा असल्याने घराची जबाबदारी त्याच्यावर आली.

वडिलांच्या जागेवर अनुकंपामध्ये नोकरी मिळावी, यासाठी नितीनने 13 एप्रिल 2018मध्ये परिपूर्ण प्रस्ताव जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडे दिला होता. मात्र, गेली तीन वर्षे सर्व कागदपत्रे देऊनही शिक्षण विभागाकडून शासकीय नोकरीत नसल्याचे पत्र देण्याबाबत कळविले जात होते. कागदपत्र देऊनही आणि वारंवार जिल्हा परिषदेत हेलपाट्या मारुनही नितीनच्या पदरी निराशा आली आहे. कुटुंबाचा निर्वाह करण्यासाठी उच्च शिक्षित असूनही रोजंदारीवर काम करावे लागत आहे. जिल्हा परिषदेमार्फत 2020साली अनुकंपा भरती प्रक्रिया घेण्यात आली. अनुकंपामध्ये निवड झालेल्यांची यादी 23 मार्च 2020 रोजी लावण्यात आली होती. मात्र, या यादीत नितीन याचे नाव आले नाही. यासाठी नितीन याने पुन्हा जिल्हा परिषद शिक्षण विभागाकडे संपर्क साधला. मात्र, त्याला त्यांनी योग्य तो प्रतिसाद दिला नाही.

अखेर त्याने मानवाधिकार संस्थेचे जिल्हाध्यक्ष राहुल गायकवाड यांच्याशी संपर्क साधून झालेल्या प्रकाराबाबत सांगितले. आज (गुरुवारी) गायकवाड यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील यांना भेटून झालेला प्रकार कथन केला.

मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी घेतली शिक्षण आणि सामान्य प्रशासनाची झाडाझडती -

नितीन केवारी याच्या प्रस्तावाबाबत डॉ. किरण पाटील यांनी अधिकाऱ्यांना चांगलेच फैलावावर घेतले. सर्व कागदपत्रे दिली असताना आपण पहिली नाहीत का? अशी विचारणा करुन तातडीने सर्व फाईल सादर करण्याच्या सूचना दिल्या. तसेच कोणतीही फाईलमध्ये त्रुटी नाही, असे लिहून देण्यासह सांगितले. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या केबिनमधील वातावरण हे तप्त झाले होते. मात्र, या प्रकारामुळे अजून किती जणांच्या नोकरीवर शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनी गदा आणली, हे सत्य बाहेर येणार आहे.

Last Updated : Sep 17, 2020, 7:37 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.