ETV Bharat / state

शाब्दिक चुकीमुळे रखडली होती जलक्रीडाप्रकारांची परवानगी, आता व्यवसाय करण्यास मुभा

जिल्हाधिकाऱ्यांनी काढलेल्या आदेशातील एका शाब्दिक चुकीमुळे जलक्रीडा व्यवसायिकांचा व्यवसाय बुडाला होता. ही चुक शब्दांच्या रचनेमुळे झाल्याचा खुलासा जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी केला. त्यानंतर जलक्रीडा व्यावसायिकांना व्यवसाय करण्यास कोणतीही हरकत नसल्याचेही जिल्हाधिकारी चौधरी यांनी सांगितले आहे.

जिल्हाधिकारी निधी चौधरी
जिल्हाधिकारी निधी चौधरी
author img

By

Published : Dec 2, 2020, 5:24 PM IST

रायगड - शासनाने पर्यटनाला परवानगी दिल्यानंतर समुद्रकिनारी व्यवसाय करणारे व्यवसायिक हे आनंदित झाले. मात्र, जलक्रीडा प्रकारात मोडणाऱ्या व्यासायिकांचा व्यवसाय जिल्हाधिकारी यांनी काढलेल्या आदेश पत्रातील एका छोट्याशा शाब्दीक चुकीमुळे जलक्रीडा व्यवसायिकांचा व्यवसाय बुडाला होता. अखेर ही चुक शब्दांच्या रचनेमुळे झालेली आहे, असा खुलासा करत जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी जलक्रीडा व्यावसायिकांना व्यवसाय करण्यास कोणतीही हरकत नसल्याचे सांगितले आहे.

'सर्व जिल्ह्यातील समुद्रकिनारे' ही आदेशातील शाब्दिक चूक

शासनाने टाळेबंदीत शिथिलता केल्यानंतर पर्यटन सुरू करण्यास परवानगी दिली. त्यामुळे समुद्र किनारी व्यवसाय करणारे घोडागाडी, एटीव्ही चालक, उंट, घोडा सफारी यांनी आपले व्यवसाय सुरू केले. 20 नोव्हेंबरला जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी समुद्रकिनारी व्यवसाय सुरू करण्याचे आदेश काढले. या आदेशपत्रात 'सर्व जिल्ह्यातील समुद्रकिनारी चालविले जाणारे विविध जलक्रिडा प्रकार', असा गोंधळात आणि अर्थ स्पष्ट न होणारा शब्द वापरला होता. वास्तविक, या ठिकाणी 'रायगड जिल्ह्यातील सर्व समुद्र किनारे' असा शब्द वापरणे आवश्यक होता. या चुकीच्या वाक्यामुळे जलक्रीडा प्रकारात मोडत असलेल्या व्यवसायिकांना बंदर विभागाने परवानगी नाकारली.

बंदर विभागाने नाकारली परवानगी

जिल्हाधिकाऱ्यांच्या चुकीच्या आदेशातील वाक्यामुळे जलक्रीडा व्यवसायिक याचा व्यवसाय दोन महिन्यांपासून बुडाला. किनारपट्टीचे जिल्हे वगळता इतर जिल्ह्यांमध्ये समुद्र किनारे नाहीत. त्याचबरोबर मुंबईमध्ये कोरोनाची स्थिती गंभीर असल्याने तेथे जलक्रीडा प्रकारांना परवानगी देण्यात आलेली नाही. इतर जिल्ह्यातील समुद्र किनाऱ्यावर रायगडच्या जिल्हाधिकाऱ्यांना परवानगी देता येत नसल्याने बंदर विभागाने जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाची अंमलबजावणी करण्यास नकार दर्शविला होता. या शब्दीक चुकीमुळे बंदर विभागाने रायगड जिल्ह्यातील जलक्रीडा प्रकारांना परवानगी नाकारली होती.

शाब्दिक चूक असल्याची जिल्हाधिकाऱ्यांची कबुली

अखेर जलक्रीडा व्यावसायिक अलिबाग येथील शिवनाथ पाटील, परेश पाटील, अमित पेरेकर, नागाव येथील प्रफुल्ल बानकर यांनी पालकमंत्री अदिती तटकरे यांच्या समक्ष जिल्हाधिकारी निधी चौधरी यांची भेट घेत परवानगी मिळण्यासाठी विनंती केली होती. यावेळी हा सर्व प्रकार शाब्दिक रचनेमुळे झालेला असून बंदर विभागाला याची अंमलबजावणी करणे गरज असल्याचे जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी स्पष्ट केले आहे. यामुळे मागील 20 नोव्हेंबरला आदेश मिळूनही व्यवसाय सुरू न करु शकलेल्या जलक्रीडा व्यावसायिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

आदेशातील शाब्दिक चुकीमुळे जलक्रीडा व्यवसायिकाना आर्थिक फटका

जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी काढलेल्या आदेशातील शाब्दिक चुकीमुळे जलक्रीडा व्यावसायिक याना आर्थिक फटका सहन करावा लागला आहे. आधीच कोरोनामुळे सात महिने व्यवसाय बंद असल्याने आर्थिक चणचण निर्माण झाली होती. जिल्हाधिकाऱ्यांनी जलक्रीडा सुरू करण्याचे आदेश दिले. मात्र, शाब्दिक चुकीमुळे बंदर विभागाने अडवणूक केल्याने पर्यटन सुरू होऊनही दोन महिने वाया गेले. त्यामुळे प्रशासनाच्या चुकीमुळे जलक्रीडा व्यवसायिकांना फटका बसला.

हेही वाचा - 'त्रिसूत्रीचे पालन केल्यास पुन्हा लॉकडाऊन नाही'

हेही वाचा - अलिबागला मेडिकल हब बनवणार - पालकमंत्री

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.