ETV Bharat / state

राज्याचा मुख्यमंत्री अलिबागकर ठरवणार ?

शिवसेना नेते, खासदार संजय राऊत हे अलिबाग तालुक्यातील आगरसुरे येथील रहिवासी असून शिवसेनेची भूमिका ते माध्यमांसमोर लावून धरत आहेत. त्यामुळे रोज माध्यमांवर संजय राऊत हेच दिसत आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री कोणीही बसला तरी त्यामागे अलिबागकराचा हात असणार हे मात्र नक्की.

संजय राऊत
author img

By

Published : Nov 6, 2019, 3:28 PM IST

रायगड- अलिबागमधील शेतकरी भवनातूनच राज्याचा मुख्यमंत्री बनविला जाणार, अशी घोषणा काही वर्षांपूर्वी शेकापचे सरचिटणीस आमदार जयंत पाटील यांनी केली होती. मात्र, असे काही त्यावेळी घडले नसले तरी, यावेळेच्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर अलिबागचे शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांच्या कणखर भूमिकेमुळे राज्याचा मुख्यमंत्री हा अलिबागकरच ठरवणार हे मात्र नक्की.

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत मतदारांनी शिवसेना भाजप युतीला बहुमत दिले आहे. मात्र, १३ दिवस झाले तरी, अद्याप युतीचे सरकार स्थापन झालेले नाही. शिवसेनेने यावेळी आमचाच मुख्यमंत्री बसणार, अशी कणखर भूमिका घेतली आहे. शिवसेना नेते, खासदार संजय राऊत हे माध्यमांसमोर शिवसेनेची भूमिका मांडत आहे. त्यामुळे राज्यातील राजकारण ढवळून निघाले आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री होणार असे भाजप नेतृत्वाने निवडणुकीपूर्वी जाहीर केले होते. मात्र, २०१४ च्या तुलनेत भाजपचा आकडा घटला आहे. तर, यावेळी शिवसेनेचा मुख्यमंत्री करण्यासाठी शिवसेना आग्रही आहे. त्यामुळे राज्यतील सत्तेचे गणित बदलण्याची शक्यता निर्माण झालेली आहे.

शिवसेना नेते, खासदार संजय राऊत हे अलिबाग तालुक्यातील आगरसुरे येथील रहिवासी असून शिवसेनेची भूमिका ते माध्यमांसमोर लावून धरत आहेत. त्यामुळे रोज माध्यमांवर संजय राऊत हेच दिसत आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री कोणीही बसला तरी त्यामागे अलिबागकराचा हात असणार हे मात्र नक्की. शेकापचे सरचिटणीस आमदार जयंत पाटील यांनीही राज्याचा मुख्यमंत्री शेतकरी भवनातून ठरेल, अशी इच्छा व्यक्त केली होती. ती पूर्ण झाली नसली तरी, अलिबागचे संजय राऊत यांच्यामुळे राज्याचा मुख्यमंत्री ठरणार असल्याचे चित्र राज्यात निर्माण झाले आहे.

हेही वाचा- अलिबाग, मांडवामध्ये अनधिकृत बांधकाम बांधणाऱ्यांना नोटीस, उद्योजकांसह फिल्मस्टारचाही समावेश

Intro:
राज्याचा मुख्यमंत्री अलिबागकरच ठरवणार

रायगड : अलिबागमधील शेतकरी भवनातूनच राज्याचा मुख्यमंत्री बनविला जाणार अशी घोषणा काही वर्षांपूर्वी शेकापचे सरचिटणीस आमदार जयंत पाटील यांनी केली होती. मात्र असे काही त्यावेळी घडले नसले तरी यावेळेच्या विधानसभा निवडणुक निकालानंतर अलिबागचे असलेले शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांच्या कणखर भूमिकेमुळे राज्याचा मुख्यमंत्री हा अलिबागकरच ठरवणार हे मात्र नक्की.

Body:2019 च्या विधानसभा निवडणुकीत मतदारांनी शिवसेना भाजप युतीला बहुमत दिले आहे. मात्र तेरा दिवस झाले तरी अद्याप युतीचे सरकार स्थापन झालेले नाही. शिवसेनेने यावेळी आमचाच मुख्यमंत्री बसणार अशी कणखर भूमिका घेतली आहे. शिवसेना नेते, खासदार संजय राऊत हे माध्यमांसमोर शिवसेनेची भूमिका मांडत आहे. त्यामुळे राज्यातील राजकारण हे ढवळून गेले आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री होणार असे भाजप नेतृत्वाने निवडणुकीपूर्वी जाहीर केले होते. मात्र 2014 च्या तुलनेत भाजपचा आकडा घटला आहे. तर यावेळी शिवसेनेचा मुख्यमंत्री करण्यासाठी शिवसेना आग्रही आहे. त्यामुळे राज्यतील सत्तेचे गणित बदलण्याची शक्यता निर्माण झालेली आहे.

Conclusion:शिवसेना नेते, खासदार संजय राऊत हे अलिबाग तालुक्यातील आगरसुरे येथील रहिवासी असून शिवसेनेची भूमिका ते माध्यमांसमोर लावून धरत आहेत. त्यामुळे रोज माध्यमावर संजय राऊत हेच दिसत आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री कोणीही बसला तरी त्यामागे अलिबागकराचा हात असणार हे मात्र नक्की. शेकापचे सरचिटणीस आमदार जयंत पाटील यांनीही राज्याचा मुख्यमंत्री शेतकरी भवनातून ठरेल अशी इच्छा व्यक्त केली होती. ती पूर्ण झाली नसली तरी अलिबागच्याच संजय राऊत यांच्यामुळे राज्याचा मुख्यमंत्री ठरणार असल्याचे चित्र राज्यात निर्माण झाले आहे.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.