ETV Bharat / state

पेण एसटी आगारात घोटाळा, तिघांचे निलंबन - बसच्या मासिक पासमध्ये घोटाळा

पेन एसटी आगारामध्ये लाखो रुपयांचा पास घोटाळा झाल्याचे उघडकीस आले आहे. या घोटाळा प्रकरणी 3 आरोपी कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.

बस (संग्रहित छायाचित्र)
बस (संग्रहित छायाचित्र)
author img

By

Published : Aug 18, 2020, 6:20 PM IST

पेण (रायगड) - येथील एसटी आगारामध्ये लाखो रुपयांचा पास घोटाळा झाल्याचे उघडकीस आले आहे. या घोटाळा प्रकरणी 3 आरोपी कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. पेण एसटी स्थानकातील वाहक जनार्दन गंगाराम म्हात्रे, जितेंद्र जयेंद्र देशपांडे, रमेश भाऊराव पाटील या तीन कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे.

कोरोनामुळे उघड झाला घोटाळा -
कोरोनामुळे एसटीच्या पास मधील अफरातफर उघड होण्यास मदत मिळाली आहे. एसटीमध्ये प्रवास करण्याकरिता 1 महिन्याचे व 3 महिन्याचे पास दिले जातात. सदरचे पास काढताना एसटीकडून प्रवाशांना प्रवासी तिकिटाच्या रकमेमध्ये काही प्रमाणात सूट दिली जाते. त्यामुळे वारंवार व रोजच प्रवास करणारे प्रवासी तिकिटाची रक्कम आगाऊ भरून पासेस काढतात. अशाच प्रकारे अनेक प्रवाशांनी एसटीच्या प्रवासाकरिता आगाऊ रक्कम देऊन पासेस काढले होते. परंतु कोरोनाच्या महामारी मुळे 22 मार्चपासून लॉकडाऊन घोषित झाल्याने या प्रवाशांना आपला प्रवास करता आला नाही. त्यामुळे अशा प्रवाशांना त्यांचे हक्काचे पैसे परत करण्याचा निर्णय एसटी महामंडळाने घेतला.

अनेक प्रवाशांनी आपल्या रकमेच्या परताव्या करिता एसटी आगाराशी संपर्क साधला. यावेळी रक्कम परत करीत असताना सदरच्या पास धारकांची नोंद एसटी कार्यालयात न आढळल्याने या प्रकरणाची चौकशी करण्यात आली. यावेळी या पासधारकांचे पैसे एसटी कार्यालयात जमा न झाल्याचे उघडकीस आले.

असा झाला घोटाळा -
एसटीमध्ये प्रवाशांना पास देताना एकाच पासच्या 3 प्रती बनविल्या जातात. एक प्रत प्रवाश्याला दिली जाते. तर दुसरी प्रत अकाउंट विभागाला पाठवली जाते. व तिसरी प्रत आगार कार्यालयात ठेवली जाते. यावेळी पास देणाऱ्या कर्मचाऱ्यांनी पहिल्या दोन प्रतींवर प्रवाशांची नोंद केली व तिसरी प्रत मात्र कोरी ठेवली. सदरची तिसरी प्रत दुसऱ्या प्रवाशाला देऊन त्या रक्कमेची अफरातफर करण्याचा प्रकार घडला आहे. आपला घोटाळा समोर येऊ नये म्हणून पास देणाऱ्या कर्मचाऱ्यांनी या दिलेल्या पासचे अनेक बुकही गहाळ केले.

आरोपींवर गुन्हा दाखल करणार -
एसटीचा पासमध्ये घोटाळा करणाऱ्या आरोपींविरोधात विभागीय नियंत्रण कार्यालयात या पूर्वीच चौकशी करण्यात आली असून या आरोपींविरोधात पोलिसात गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याची माहिती पेण विभागीय नियंत्रक अनघा बारटक्के यांनी दिली आहे.

एसटीने स्मार्ट कार्ड योजना लागू केली असून या स्मार्ट कार्डद्वारे एसटीचे पास देण्यात येत आहेत. त्यामुळे प्रवाशांनीही स्मार्ट कार्डचा आग्रह धरावा. ज्या प्रवाशांना आपला पास अधिकृत आहे की नाही हे तपासून पहायचे असेल त्यांनी संबंधित आगाराशी संपर्क साधावा, असे आवाहन पेण विभागीय नियंत्रक अनघा बारटक्के यांनी केले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.