ETV Bharat / state

बोगस डॉक्टर प्रकरण : डॉ. रुपेश म्हात्रे पोलिसांसमोर हजर झालेच नाही - कंपाउंडर झाला बोगस डॉक्टर

वडखळ पोलीस निरीक्षक बाळा कुंभार यांनी बोगस डॉक्टर जयेश म्हात्रे यांचे बंधू डॉ. रुपेश म्हात्रे यांना आज गुरुवार दुपारी 2 वाजता चौकशीकरिता वडखळ पोलीस ठाण्यात बोलाविले होते. परंतु, डॉ. रुपेश म्हात्रे हे पोलीस चौकशीला हजर झालेच नाहीत. त्यामुळे या प्रकरणात नक्कीच काहीतरी काळेबेरे असल्याची चर्चा पेण तालुक्यात सुरू झाली आहे.

पेण
पेण
author img

By

Published : Mar 18, 2021, 8:21 PM IST

पेण (रायगड) - तालुक्यातील वाशी या गावातील 'कंपाउंडर झाला बोगस डॉक्टर' या मथळ्याखाली वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर सदरचा बोगस डॉक्टर जयेश म्हात्रे याच्या चौकशीचे चक्रे वेगाने फिरू लागले. वडखळ पोलीस निरीक्षक बाळा कुंभार यांनी बोगस डॉक्टर जयेश म्हात्रे यांचे बंधू डॉ. रुपेश म्हात्रे यांना आज गुरुवार दुपारी 2 वाजता चौकशीकरिता वडखळ पोलीस ठाण्यात बोलाविले होते. परंतु, डॉ. रुपेश म्हात्रे हे पोलीस चौकशीला हजर झालेच नाहीत. त्यामुळे या प्रकरणात नक्कीच काहीतरी काळेबेरे असल्याची चर्चा पेण तालुक्यात सुरू झाली आहे.

पेण

जयश म्हात्रे हे दंतवैद्य नसून त्यांच्याकडे फक्त दंतवैद्य सहायकाचे प्रमाणपत्र आहे. असे असताना सुद्धा आपला भाऊ डॉ. रुपेश म्हात्रे यांच्या नावाचा वापर करून सदरचा बोगस डॉक्टर पेण तालुक्यातील वाशी येथे मागील सुमारे 10 ते 12 वर्षांपासून दातांच्या डॉक्टरकीचा व्यवसाय करीत होता. या प्रकरणात पेणच्या पत्रकारांनी विभागीय पोलीस अधिकारी विभा चव्हाण यांची भेट घेऊन बोगस डॉक्टरावर कायदेशीर कारवाई करण्याची लेखी मागणी केली.

यावेळी पेण मेडिकल असोसिएशनचे डॉ.अर्चना केसकर, डॉ.अमोल पाटील, डॉ.तेजस पाटील, डॉ.तेजस गावंड, डॉ.अनुप लवाटे, डॉ.पल्लवी पाटील, डॉ.अदिती म्हात्रे, डॉ.माधवी ठाकूर, डॉ.तन्वी चव्हाण, डॉ.रेश्मा पाटील यांच्यासह आरोग्य अधिकारी मनीषा म्हात्रे, बीडीओ चंद्रकांत पाटील, वडखळ पोलीस ठाण्याचे निरीक्षक बाळा कुंभार यांच्यासह पेण प्रेस क्लब अध्यक्ष देवा पेरवी, पत्रकार कमलेश ठाकूर, राजेश प्रधान, सुनील पाटील, संतोष पाटील, नरेश पवार, राजेश कांबळे, दीपक लोके व स्वप्नील पाटील आदी उपस्थित होते.

बोगस डॉक्टर जयेश म्हात्रे याच्या विरोधातील पुरावे

याप्रसंगी पेणच्या पत्रकारांच्या वतीने बोगस डॉक्टर जयेश म्हात्रे याच्या विरोधातील काही पुरावे उप विभागीय पोलीस अधिकारी विभा चव्हाण यांच्या समोर तालुका आरोग्य अधिकारी मनीषा म्हात्रे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले. या अनुषंगाने गुरुवार दिनांक 18 रोजी जिल्हा स्तरावरून चौकशी करिता आलेल्या समितीमध्ये डॉ.अभिजीत घासे, निरीक्षक नरेश नागवेकर, निरीक्षक राजेंद्र भिसे, सानप, दीपक म्हात्रे व तालुका आरोग्य अधिकारी मनीषा म्हात्रे यांनी वाशी येथील "त्या" दातांच्या दवाखान्याला भेट दिली. यावेळी बोगस डॉक्टर जयेश म्हात्रे यांचे बंंधू डॉ. रुपेश म्हात्रे यांनी त्यांची मानसोपचार तज्ञांकडे तपासणी सुरू असून आपण कोणत्याही प्रकारचे माहिती द्यायला मानसिकदृष्ट्या सक्षम नसल्याचा हवाला देऊन चौकशी समितीला कोणत्याही प्रकारचे सहकार्य केले नाही, अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी मनीषा म्हात्रे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.

पेण तालुका आरोग्य अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, डॉक्टर रुपेश म्हात्रे हे मानसिकदृष्ट्या सक्षम नसल्यास अशा डॉक्टरमुळे रुग्णांच्या जीवाला धोका संभवित आहे. त्यामुळे त्यांच्या नावावर सुरू असलेले पनवेल, पेण, वाशी येथील दातांचा दवाखाना जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी तातडीने बंद करण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी पेण प्रेस क्लबचे अध्यक्ष देवा पेरवी यांनी केली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.